अवांतर

पाळीव प्राण्यांना स्वच्छतेच्या सवयी कशा लावाव्यात?

Submitted by गायत्री१३ on 30 September, 2013 - 01:43

मांजराचं छोटं पिल्लू या आठवड्यात घरी आणणार आहे. तर
- त्याला स्वच्छतेच्या सवयी उदा. शी-शू करण्याबद्दल, स्वयंपाकघरात/ओट्यावर जायचं नाही इ. कशा लावाव्यात?
- घरी छोटी मुलगी आहे, तिच्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागेल का?

कोणाचे काय अनुभव आहेत ते वाचायला आवडेल. त्यातून बरंच शिकायला मिळेल अशी खात्री आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

कोकण

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

यो रॉक्स च्या को़कण फोटो वरुन पेंटींग केलेय. २० ते २५ मिनटात बहुतेक रंग स्प्लॅश आणी पाणी स्प्रे करुन पेंटींग केल्याने येक बोल्ड रीझल्ट मिळालाय जो मला स्वतःला समाधान देऊन गेला.
Picture 023.jpg

विषय: 
प्रकार: 

संतोष माने केस -पुन्हा सूनावणी आवश्यक आहे का ?

Submitted by टिंबक टू on 23 September, 2013 - 04:22

२५ जानेवारी २०१२ , तब्बल ९ ठार , ३७ जखमी - हा कोणता अपघात नव्हता , जाणूनबुझून केलेला मुर्खपणा
, आरोपी संतोष माने, बसचालक याने या एवढ्या लोकांच्या अंगावर शुद्धीत बस चढवली. त्या दिवशीचा तांडव थरार आणणारा होता .

पुणे कोर्टाने आरोप निश्चित करुन फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पुन्हा सूनावणीची खरच आवश्यकता आहे का ?

आरोपींना शिक्षा होण्यासाठी करावी लागणारी खटाटोप पोलीसांबरोबरच मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना मनस्ताप देणारी असते.

विषय: 

अशी तू...

Submitted by स्वाकु on 23 September, 2013 - 01:47

अशी तू......

फुलांफुलांवर भिरभिरणारी प्रत्येकाची नजर,
तुला बघताच क्षणी शांत होते |
व्याकूळ झालेल्या प्रत्येक मनाला मग,
तुझ्या अस्तित्वाची जणीव होते ||
सभोवतालचे आसुसलेले कान फक्त,
तुझ्या मंजूळ वाणीची वाट बघतात |
तुझे ते मधाळ हास्य बघून ,
सगळेच स्वर्गसूख अनुभवतात ||

शब्दखुणा: 

प्रयोगशाळेतली काचेची भांडी कुठे मिळतील?

Submitted by सावली on 20 September, 2013 - 01:55

ठाणे मुंबई येथे प्रयोगशाळेतली काचेची भांडी कुठे मिळतील?

मिळाली इथे
Neha Enterprises
Mr. Narendra Kale
G-5, Ground Floor, West View Building, Hindu Colony, Near Karve Hospital, Brahmin Society, Naupada
Thane - 400602, Maharashtra , India
Mobile:
+(91)-9004032862

विषय: 

अशाश्वत

Submitted by मुग्धटली on 19 September, 2013 - 06:27

आपलं आयुष्य, हे जग एकुण सगळच किती अशाश्वत, क्षणभंगुर आहे याची प्रचिती काल परत आली. काल रात्री साधारण ९च्या आसपास आईचा फोन आला मावसभावाच्या निधनाची वार्ता देण्यासाठी. बाहेर गणपतीची मिरवणुक चालु असल्याने नीट ऐकु आले नाही म्हणा किंवा ऐकुन विश्वास न बसल्याने म्हणा मी तिला परत विचारल काय म्हणालीस म्हणुन, या वेळेस आतल्या खोलीत जाउन बोलले त्यामुळे नीट ऐकु आल आणि खात्री पटली की मगशी जे ऐकल ते खर होत.

विषय: 

केनियाच्या आजीबाई...

Submitted by medhaa on 18 September, 2013 - 19:01

बसमधे एक अफ्रिकन आजीबाई चढल्या... boycut, skirt, हातात पर्स, बॅग एकदम टापटीप...ड्रायव्हरशी हसुन बोलुन तिकिट घेउन आत आल्या, जागा शोधत माझ्या शेजारी येऊन बसल्या.

माझ्या पलिकडच्या सीटवर माझा नवरा आणि पोरगी खिडकीतून बाहेर बघत, गप्पा मारत होते...
आजी एकदम शांत आणि साध्या वाटत होत्या... सगळी बस शांत होती. एकदम रस्त्याच्या कडेला गर्दी दिसली.. NRI Punjabi लग्न सुरू होत..सजवलेला शुभ्र घोडा, सरदारजी रंगीत पगड्या घातलेले, छान साड्या, ड्रेस घातलेल्या बायका आणि बॅन्ड... बस मधले सगळे लोक गंमत बघत होते. मी खिडकीत बसले होते आणि शेजारच्या आजींनी डोकावुन बाहेर बघीतलं आणि हासल्या.. Indian wedding...

शब्दखुणा: 

वेगळा

Submitted by श्रीवल्लभ खंडाळीकर on 18 September, 2013 - 13:40

राहिलो तुम्हात पण राहिलो मी आगळा
स्वप्न हे गुंफीत जातो छंद माझा वेगळा

कार्य हे अर्पित असतो दूर देशीच्या स्थळा
अंतरी शोधीत असतो छत्रपतींचा मावळा

उत्तरे शोधीत असतो, मार्ग क्रमितो स्वबळा
अंतरी विनवीत असतो गोकुळीचा सावळा

विनोदी बोल बोलतो हासवाया वर्तुळा
ज्याची त्याला असती मग अंतरीच्या या कळा

वर्ण हे सोडीत जातो भेदीत जातो या मळा
ओलांडतो सीमा श्वास घ्याया मोकळा

http://gujmanatle.blogspot.in/2013/09/blog-post_16.html

शब्दखुणा: 

संयम

Submitted by विद्या भुतकर on 15 September, 2013 - 23:54

सकाळी ७ चा गजर झाला आणि आरती घाईघाईने उठली. आज औफिसमध्ये एक महत्त्वाची मिटींग होती. पटापट आवरून तिने कंपनीची बस पकडली. ती बसमध्येच कामांची यादी उघडून बसली. मिटींगनंतर जो काही निर्णय होईल तो सांगण्यासाठी सिनीयर म्यनेजर बरोबर अजून एक मिटींग. वैतागून तिने डायरी बंद केली. या मिटिंगमुळे काम करायला वेळच मिळायचा नाही, मग संध्याकाळी उशीरपर्यंत थांबून कामं पूर्ण करायला लागायची. असो. आरती एका सॊफ्ट्वेअर कंपनीत नोकरी करत होती आणि बाकीच्या लाखो लोकांप्रमाणेच तिलाही दिवसाचे १२-१४ तास नोकरीत घालवायची सवय लावून घ्यायला लागली होती.

विषय: 

मी आणि माबो

Submitted by मुग्धटली on 13 September, 2013 - 03:58

मित्रहो!

आज मी माझ्या मनातल तुम्हाला सांगाव या विचाराने लेखन करत आहे. तस ललित वगैरे लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर