अवांतर

सवय

Submitted by विजय देशमुख on 19 February, 2014 - 00:06

"काय घाणेरडी असतात ना माणसं?"
"अं"
"तुझं लक्ष कुठे आहे? बघितलस ना कसे केळाचे सालं फेकले त्या बाईने. काहीच कसं वाटत नाही या लोकांना"
"हम्म"
"आणि आपले घरचे तर अजुनच महान. मी म्हटलं की कचरा वेगवेगळा करुन पॉलिथिन बॅगमध्ये फेका, तर मलाच वेड्यात काढलं. आणि वरुन डोस... तुमचे परदेशातले नियम तुमच्याजवळ ठेवा."
"हं"
"हं, काय? तु का नाही सांगत त्यांना? मीही शेवटी कंटाळून कचर्‍याच्या ढिगातच फेकले रॅपर्स"
"हे मात्र तू बरोबर केलं नाहीस."
"अच्छा, मी केलं ते चुकलं अन ते करत आहेत त्याचं काय?"
"तुला लहानपणी आपल्याला एक गोष्ट होती ती आठवते?"
"कोणती गोष्ट?"

मी कसा?

Submitted by राजेश्वर on 13 February, 2014 - 04:13

मी कसा?

खालील प्रश्र्न बघा... जमलेच तर उत्तर द्या नाहीतर चर्चा.....

मी कॉर्पोरेशनच्या नळाला माझ्या घरी पाणीयेत नाही म्हणुन मोटर पंप लावुन पाणी खेचत नाही. -
मी विज मिटर मध्ये गडबड करुन विज चोरत नाही.
मी कधीच खोटे बोलत नाही
मी कधीच भ्रष्टाचार करित नाही.
मी घरातला कचरा कधीच रस्त्यावर टाकत नाही.
माझे माझ्या शेजार्‍याशी भांडण होत नाही.
मी सार्वजनीक कामात जबाबदारी उचलत नाही. मला काय त्याचे म्हणून गप्प राह्तो.
मी अन्यायाला विरोध करीत नाही.
मी जसा जगासमोर दिसतो तसा मी नाही
मी अनावश्यक साठा करित नाही. उदा. पेट्रोल मध्यरात्रीपासुन वाढत असेल तर आजच पेट्रोल टॅ़क भरून ठेवत नाही.

विषय: 

रोझ डे

Submitted by विजय देशमुख on 13 February, 2014 - 01:36

"मॅडम, हॅपी रोज डे... हे तुमच्यासाठी..."
"माझ्यासाठी?" नताशाने वर पाहिजे. ८-१० ताजे पिवळे धम्म गुलाबाची फुलं, एका खाकी कागदात गुंडाळलेले. अचानक ती किंचाळत म्हणाली,
"हिंमत कशी झाली तुझी... आताच्या आत्ता चालता हो तू....आणि जाताना दांडेकरकडुन तुझा पगार घेउन जा... यू आर फायर्ड"
राजुला ती काय म्हणाली ते काही सेकंद कळलच नाही. तो चुपचाप बाहेर गेला. दांडेकरला तोपर्यंत फोन गेला होताच. त्याने नाईलाजाने राजुला एक पाकिट दिले.

***************************************************************************
"गुडमॉर्निंग मॅडम"
"गुडमॉर्निंग दांडेकर. कालचे पेपर्स तयार झालेत?"
"हो मॅडम."

विषय: 

बिग बझार : स्कीम

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 12 February, 2014 - 23:52

बिग बझारमध्ये कूपनची स्कीम आलेली आहे, असे ऐकले. खरे आहे का?

६०० + १०० असे सातशे रुपये दिले की २५०० चे कूपन मिळते. त्यावर बिग बझारमध्ये वस्तू घेता येतात. ६ महिन्याची वॅलिडिटी असते.

आमच्या कंपनीतील बर्‍याच लोकानी अशी कूपने घेतली आहेत. कपडे, ग्रोसरी, इतर वस्तू मिळतात. पण एलेक्टृऑनिक वस्तू, मोबाइल, सोने, काही क्रोकरी आयटेम घेता येत नाहीत, असे ऐकून आहे.

याबाबत कुणाचा काय अनुभव आहे? कोणत्या वस्तू घेता येतात, कोणत्या नाहीत याची पूर्ण यादी आहे का?

शब्दखुणा: 

एक खून झाला, त्याची कथा

Submitted by साजिरा on 11 February, 2014 - 03:10

लांबच लांब पसरलेली पोपडे धरलेली जमीन आणि भक्क ऊन. अंगाची लाही लाही करणारं. पिवळ्यापासून नारंगी-तांबड्या-लालभडक रंगांच्या असतील नसतील तेवढ्या छटा प्रदर्शन मांडून बसल्यागतच. एखादं माणूस, झाड किंवा सावलीचा तर प्रश्नच नाही. जिवंतपणाचं कुठचंही चिन्ह नाही. ते ओसाड माळरान होतं, की वाळवंट, की एखादं बेट की काहीतरी तसंच. पण या अशा वैराण जागेत त्याला स्वतःचं अस्तित्व एकदम भगभगीत आणि एखाद्या दुखर्‍या जागेसारखं किंवा जखमेसारखं सटसट करत कळवळायला लावणारं आणि एकदम क्षुद्र-क्षुल्लक वाटल्यागत. या सार्‍यात आपण का आहोत- असा विचार करत असतानाच जवळच ती पडकी खोली अचानक उगवल्यागत दिसल्यासारखी.

विषय: 

काय करशील ?

Submitted by विजय देशमुख on 9 February, 2014 - 22:10

"काय करशील?"
पुन्हा एकदा त्याच्या तोंडुन तेच ऐकुन राज कंटाळला होता, पण त्याच्या अखंड बडबडीला त्याच्याकडे आता तरी काही उपाय दिसत नव्हता.
"बोल न बे.... आता काहुन चुप बसला...."
राजनं डायरी उघडली अन त्यात डोकं खुपसलं. १० बाय १० च्या खोपटात एका बल्बवर राजचा हिशोब चालु होता. नक्कीच बापुने पैसे काढले असावे, असा संशय त्याला आला.
"ए.... xxxxx तुझ्या बापाचं खात नाही लेका... समजलं ना.... मी .. मी कमावतो आणि पितो"

CNG वर चालणार्‍या कारची उपयुक्तता - घ्यावी की न घ्यावी ?

Submitted by मेधावि on 6 February, 2014 - 22:15

माझ्या घरापासून माझे ऑ. पर्यंत रोजचा प्रवास ५५ कीमी आहे. कं. बस ने जाणे येणे फार कटकटीचे व वेळखाऊ आहे. त्यामुळे येण्याजाण्यासाठी स्वतंत्र कार घ्यावी असा विचार आहे. पण पेट्रोलच्या वाढलेल्या किमती पहाता गॅस किट वरची कार घ्यावी असे वाटते आहे. वॅगन आर हे ऑप्शन आहे ज्यात कं. फिटेड गॅस किट उपलब्ध आहे. मला फक्त ऑफिसला जाण्यायेण्याकरताच गाडी घ्यायची असल्यामुळे खरे तर जुनी कार पण चालणार आहे पण त्यात कं फिटेड गॅसवाल्या कार्स फारश्या उपलब्ध नसल्यामुळे नवी वॅगन आर घ्यावी असा विचार आहे. जाणकार काही प्रकाश टाकू शकतील का? (अधिक माहीती -ड्रायव्हींग हे माझे पॅशन नाही, लॉग ड्राईव्ह ही माझी हॉबी पण नाही.

विषय: 

झोकून देऊन प्रेम करावं !

Submitted by मी मी on 4 February, 2014 - 13:43

झोकून देऊन प्रेम बीम पुस्तकी भाषा वाटते नाही. पण प्रत्येकाच्या मनात हि असीम प्रेमाची अढी असतेच कुठेतरी. प्रेम हवंच असतं कुणाचतरी. आपल्यावरही अगदी कुणी झोकून देऊन प्रेम करावं अस वाटत असतंच. पण करतांना मात्र आपण प्रेम करतो ते हातचं राखूनच…. प्रेम मिळवण्यापेक्षा स्वतः प्रेमात असतांना मिळणार सुख अधिक असतं. मिळवतांना किती मिळतंय ह्याचा हिशेब आपल्या हातात कुठेय पण देतांना हातचा सुद्धा शिल्लक न ठेवता अगदी अगदी ऋणात राहूनही देता येतं. सतत २४/७ प्रेमात राहण्याचं सुख ते काय ना ?

विषय: 
शब्दखुणा: 

कार्यालयात उशीराने उपस्थितीची कारणे आणि त्यातुन घडलेले विनोद

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 4 February, 2014 - 00:42

सर्वच कार्यालयात उशीरा उपस्थित राहण्याचे प्रमाण बरेच आहे. त्यासाठी कार्यालयात लेट मस्टर ठेवण्यात येते. अशावेळी त्यात उशीराने उपस्थितीची कारणे व वेळ लिहावी लागातात. त्यात बरेच जण डु --- do----- असे लिहुन मोकळे होतात. एकदा एका महिला कर्मचार्‍यास कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला. सदर महिला गर्भवती असल्याने तीने लेट मस्टरमधे गर्भवती असल्याने पोटात दुखत होते असे लिहीले. त्यानंर एक पुरुष कर्मचारी आला सवईमे त्याने --- do----- असे--- do----- असे लिहुन मोकळा झाला. साहेबानी मस्टर पाहीले आणि त्याला बोलावले, म्हणाले तुम्हालाही डिलीव्हरीचा त्रास केव्हा पासुन होतोय.

कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर