अवांतर

हे काय शहाणपण झालं?

Submitted by मयुरा on 24 February, 2014 - 05:14

आपल्याला कोणी सांगतं, अबरचबर खा म्हणून! कोणी सांगतं, मोबाईलवर सारखी बकबक करा म्हणून! व्यायाम करु नका म्हणून! फिरायला जायला कोणी मनाई केलेली आहे का? तरीही आपण स्वत:साठी बदलायला तयार नाही. आरोग्याचे बारा वाजलेले चालतील . हे काय शहाणपण झालं?

प्रसंग क्रमांक 1
साध्याशा दुखण्यासाठी दवाखान्याची पायरी चढलेल्या व्यक्तीला विविध तपासण्या करायला सांगितल्या. ते ऐकून त्याची डोकेदुखी अजूनच वाढली. त्याने सगळ्या चाचण्या करून घेतल्या. आपल्याला काहीही झालेलं नसताना सुद्धा या चाचण्या करायला सांगितल्याचं त्याचं म्हणणं होतं...
प्रसंग क्रमांक 2

विषय: 

कारण अभ्यास...

Submitted by pankajkoparde on 21 February, 2014 - 09:44

आभाळाला एक भोक पडलेलं. मगरी आणि सुसरी, पांढऱ्या मानेचे करकोचे, heartbreak झालेले बोके, चिकट गोगलगाया, आत्मा हरवलेल्या काया, कुत्र्यासारख्या पडत होत्या अंगावर! हे एकदा घडलेलं नव्हतं; सतत घडत राहिलेलं. भोकाची त्रिज्या कमी-जास्त आणि पडणारे प्राणी चित्र-विचित्र, इतकाच काय तो फरक. मी चुकीच्या जागी बसलोय किंवा बसवलो गेलोय अशी भिती तोंडावर सतत बाळगलेली. बाळगलेली बरी म्हणजे शंकेला वाव उरत नाही. कपाळावरचा घाम पुसला आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या फळ्यावरती रेघोट्या मारणाऱ्या पाठीकडे पाहिलं.

लंडन आणि बॉलीवूड

Submitted by शबाना on 21 February, 2014 - 07:49

माझा लंडनमध्ये अगदी पहिलाच आठवडा! वसंत ऋतू इथे एक एप्रिलला सुरु होतो. पण अजूनही काळवंडलेले आकाश आणि बोचरी थंडी यामुळे लंडन काही फार आकर्षक वाटत नव्हते. लंडनला येण्याआधी जी उत्सुकता आणि उत्साह होता तो फार काही जाणवत नव्हता. सहा वर्षाच्या मनुला सोडून आले होते. शिवाय माझी जिथे रहायची व्यवस्था होती ते बेड अँड ब्रेकफास्ट ठिकाण फारच अनाकर्षक होते -- त्यामुळे कदाचित घरची आठवण फार येत होती -- सलग चौथ्या दिवशी थंड सँडविच खावे लागल्यामुळेही त्या दिवशी संध्याकाळी फारच मलूल वाटत होते. बँक स्टेशनात जाऊन ग्रीनिचची ट्रेन घेऊन परत चालले होते. लंडनच्या अंडरग्राउंड ट्यूबवर जाण्याचाही तसा पहिलाच अनुभव.

सोसतो कालचा आजही नाट द्या

Submitted by अ. अ. जोशी on 21 February, 2014 - 02:13

हात द्या, मात द्या वा कुणी काट द्या
सोसतो कालचा आजही नाट द्या

भावना ओतल्या घागरी साठल्या
धावण्या शब्द हे सागरी लाट द्या

दान जे चोरले भासलो क्रूर मी
सज्जना पाहण्या मोकळी वाट द्या

मानपाना दिली पांघरा शाल ही
येतसे लाटण्या त्यास बोभाट द्या

भ्रांत या जीवनी साधले नेमके
शांतता द्या वरी, आंत गोंगाट द्या

थाट मांडू नका बोलण्या पोरका
आणि उष्टे नको.. मोकळे ताट द्या

वासरे लागली दूध चाटावया
पीडितां एक अश्रू तरी दाट द्या

'अजय' अंती तुला काय रे पाहिजे ?
मागणे हेच की शेवटी खाट द्या

कुक्कुटपालना मधले “कॉर्पोरेट” धडे!!

Submitted by व्यत्यय on 20 February, 2014 - 09:47

धडा पहिला:
एकदा एक कुक्कुटपालन केंद्र असतं. तिथे दोन कोंबड्या एकमेकींशी बोलत असतात.
पहिली कोंबडी: काय ग तुझं हल्ली कामात लक्ष नसतं हं. किती छोटी अंडी देतेस. कोणी चार रुपयाला पण विकत नाही घेणार. माझी अंडी बघ. साडेचार रुपयाला सहज विकली जातात.
दुसरी कोंबडी: (एखाद्या बाईसारखा मानेला हलकेच झटका देऊन) जाउदे ग. आठ आण्यांसाठी एवढा जास्त बोचा ताणायला कोणी सांगितलंय.

शब्दखुणा: 

माझे तुझे नाते कसे?

Submitted by मिल्या on 20 February, 2014 - 05:25

माझे तुझे नाते कसे?
शोलेतले नाणे जसे

झिडकारले त्यांनी मला
कवटाळले मी आरसे

मी सत्य साधे बोललो
धावून आली माणसे

रडलो जगासाठी जरा
झाले जगामध्ये हसे

मिळताच टाळ्यांची गुटी
धरले अहंने बाळसे

सोयरसुतक का बाळगू?
हा देह तर माझा नसे

होऊ कसा पडसाद मी?
बसले पहाडांचे घसे

अश्रूंस ओहोटी तरी
डोळ्यातले मिटले ठसे

विषय: 

बाली - उलुवाटु

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

bali -uuluwatu temple.jpg
उलुवाटु मंदिर बाली ,इंडोनेशिआ

विषय: 
प्रकार: 

खेळ विचित्र नियतीचा

Submitted by मुग्धटली on 19 February, 2014 - 03:32

आपल आयुष्य कधी कधी आपल्याला अशा एका स्थानावर आणुन की खरच हसाव की रडाव हेच कळत नाही... आनंद मोठा मानावा की दु:ख? अगदी अशाच परिस्थितीत दोन दिवस गेले आहेत.

विषय: 

सवय

Submitted by विजय देशमुख on 19 February, 2014 - 00:06

"काय घाणेरडी असतात ना माणसं?"
"अं"
"तुझं लक्ष कुठे आहे? बघितलस ना कसे केळाचे सालं फेकले त्या बाईने. काहीच कसं वाटत नाही या लोकांना"
"हम्म"
"आणि आपले घरचे तर अजुनच महान. मी म्हटलं की कचरा वेगवेगळा करुन पॉलिथिन बॅगमध्ये फेका, तर मलाच वेड्यात काढलं. आणि वरुन डोस... तुमचे परदेशातले नियम तुमच्याजवळ ठेवा."
"हं"
"हं, काय? तु का नाही सांगत त्यांना? मीही शेवटी कंटाळून कचर्‍याच्या ढिगातच फेकले रॅपर्स"
"हे मात्र तू बरोबर केलं नाहीस."
"अच्छा, मी केलं ते चुकलं अन ते करत आहेत त्याचं काय?"
"तुला लहानपणी आपल्याला एक गोष्ट होती ती आठवते?"
"कोणती गोष्ट?"

Pages

Subscribe to RSS - अवांतर