love story

प्रेम की crush?

Submitted by प्रिया खोत on 20 October, 2019 - 09:54

सुकन्या पाचवीला असताना मध्यातच सहा माही नंतर एका मुलाचं शाळेत तिच्याच वर्गात ऍडमिशन होत. नवीन ऍडमिशन असल्यामुळे आणि तेही वर्षाच्या मधेच आल्यामुळे शिक्षक त्याच्यासाठी थोडे उजवेच होते. सर्वं वर्गाशी त्याची ओळख करून दिली, त्याच कौतुक केलं.
"तर हा आहे ओंकार पाटील खूप हुशार आहे वडलांची बदली मुंबईत झाली म्हणून तो गावावरून मुंबई ला आला,आणि आता आपल्या शाळेत आला आहे त्याला अभ्यासात मदत करा आणि त्याचे मित्र मैत्रिणी बना" अस खुद्द मुख्याध्यापक बाईंनी येऊन वर्गात सांगितलं.

विषय: 
शब्दखुणा: 

तिची प्रेमकहाणी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 17 September, 2014 - 13:51

देह मन आणि जाणीवेवर
झालेले कृतघ्न निर्दयी वार
सोसुनही उभी आहेस तू यार
सलाम तुला !
अन तुझ्या प्रेमाच्या लढाईला !
सुटणार जीवन पुन्हा घट्ट पकडून
वादळाला तोंड देत आहेस तू
सोप नव्हते ते
वेदनात असह्य असे तडफडणे
वेड्यागत रात्र रात्र जळत जागे राहणे
कधी प्रेमाची शपथ देत
त्याला पुन्हा साद घातली असशील तू
कधी विरहाने व्याकूळ होत
त्याची अजीजीही केली असशील तू
कधी बेभान रागाने खदखदत
त्याच्याशी खूप खूप भांडली असशील तू
तर कधी नाही त्या धमक्या देत
टोकाच्या शत्रुत्वा उतरली असशील तू
आणि हातातील सारे उपाय सरल्यावर
हाताशेने अंधारात एकटी रडली असशील तू

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - love story