पाककला

प्रॉन्स पुलाव इन श्रावण कलर्स (अर्थात हिरवा मसाला)

Submitted by अमेय२८०८०७ on 17 March, 2013 - 13:38

श्रावणाशी कोळंबीची घातलेली 'अब्रह्मण्यम' सांगड पाहून काही भुवया वक्र होणार याची कल्पना आहे. पण एकदा कलासाधना म्हटली की प्रसंगी तळहातावर शीर घेऊन लढायची तयारी ठेवावी म्हणतात. प्रस्तुत लेख पाककलेवर (उर्फ खादाडीवर) असल्याने थोडीफार साधना यातही अन्तर्भूत आहे. तिला स्मरूनच धीराने पुढे लिहितो.

विषय: 
शब्दखुणा: 

बीट सूप : आमच्या घरातील खाद्यक्रांतीचा साक्षीदार

Submitted by अमेय२८०८०७ on 9 March, 2013 - 10:51

बालपणीचा काळ खाण्यापिण्याच्या बाबतीत खरेच सुखात गेला. मिसळ, वडे, भजी यांसारख्या जिभेचे चोचले पुरवणार्‍या 'जहाल' पदार्थांवर बालवयातच श्रद्धा बसल्याने बाकी वरण-भात, कच्च्या भाज्या, सलाड्स वगैरे 'मवाळ' गोष्टी एकदम 'ह्या' वाटायच्या. त्यातून डाएट बिएटचे फॅड घरात शिरलेले नव्हते. मायाजालाची क्रान्तीही दूर होती त्यामुळे कॅलरीज, मेटाबॉलिझम, लीन मीट, लो फॅट असे शब्द घराघरात अजून मुरलेले नव्हते. दुधातून साय काढून टाकणारा 'येडा' वाटावा असे दिवस होते. बासुंदीला लावण्यासाठी पेढ्यांचे पाकीट फोडताना 'कॅलरीच्या' भीतीने गृहिणीचा हात थरथरत नसे.

विषय: 

घरी केलेल्या पदार्थांना बाहेरच्या पदार्थांसारखी चव कशी आणावी?

Submitted by हेलबॉय on 9 March, 2013 - 02:42

घरी तयार केलेले पदार्थ आणि बाहेर मिळणारे पदार्थ यांच्या चवीत फरक असण्याचे कारण काय असते? बाहेरचे पदार्थ प्रामुख्याने चवीसाठी खाल्ले जातात .
बाहेरचे पदार्थ उदा- सामोसे ,ढोकळा, कचोरी, भेळ, बटाटेवडे, भजी पावभाजी, मटण चिकनच्या डीशेस, बिर्याणी ई ई घरी करुन बघितल्यास बाहेरसारखी चव येत नाहि .याचे काय कारण असावे?....काही सिक्रेट इनग्रेडीएन्ट किंवा पद्धत असते का..?
आपणास जर असे सिक्रेट इनग्रेडीएन्ट किंवा प्रोसेस माहीती असतील काही फंडे ठाऊक असतील तर जरुर इथे द्यावेत... धन्यवाद

विषय: 

स्मरणिका आवाहन

Submitted by eliza on 6 March, 2013 - 15:28

BMM अधिवेशनाचा अविभाज्य भाग म्हणजे 'स्मरणिका'. स्मरणिका साहित्यासाठी आवाहन हे BMM संकेत स्थळावर येथे http://bmm2013.org/conventionactivities/bmm-smaranika.html उपलब्ध आहे. आम्हाला आतापर्यंत साहित्य मिळालेले आहे पण जूनही दर्जेदार साहित्याची नितांत गरज आहे. आपण स्मरणिकेसाठी साहित्य पाठविले तर आम्हाला मदत होईल. ह्याबरोबरच काही व्यंगचित्रे पण हवी आहेत.

खाण्यापिण्यातील चुकीचे संयोग!!!!

Submitted by हर्ट on 4 March, 2013 - 02:51

बर्‍याचदा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कडधान्ये, मसाले एकत्रित करुन भाज्या करतो. पण असा संयोग....मिश्रण योग्य कि अयोग्य हे आपल्याला माहिती नसते.

इथे आपण अशा चुकीच्या संयोगाबद्दल...मिश्रणाबद्दल लिहिणार आहोत.

विषय: 

वांग्याची भाजी, खरडा, भाकरी : एक हिट्ट मेनू

Submitted by अमेय२८०८०७ on 3 March, 2013 - 08:58

अंड्यातला 'अ' जरी काढला तरी हाहाकार उडेल, मेरूमंडळ ढळेल आणि एकंदरीत मायन लोक जिची आतुरतेने वाट पहायचे ती जगबुडी साक्षात येईल असे घरचे पारंपारिक वातावरण होते. 'अ' 'आ' मध्येच इतका प्रॉब्लेम असल्याने 'च' चिकनचा, 'म' मटणातला वगैरे तर फारच दूरचे दिवे. बाबा - काका यांची पिढी बाहेर 'चोरून' खायला शिकली होती पण आजीच्या धाकामुळे वर तोंड करून कबूल करायची प्राज्ञा नव्हती. लग्नानंतर आपले दिवस पालटतील आणि सासूबाईंना 'नॉन वेज शिवाय कसं जेवणच जात नाही' असं सांगणार्‍या मॉडर्न मत्स्यगंधा छाप सुना येऊन घरात चिकन, मासे यांच्या सुगंधाचे 'खारे' वारे वाहायला लागेल असा त्या दोघांचा कोंडीफोडू आशावादही फोल ठरला.

विषय: 

मोड आलेले धान्य बोटचेपे कसे शिजवावे?

Submitted by हर्ट on 1 March, 2013 - 04:47

मटकी, मुग, चवळी, हिरवे चणे, पिवळे चणे, छोले, रेड बीन्स इत्यादी धान्य मी नियमित मोड आणून वाफवतो. एक वा दोन शिट्या मोड आलेल्या धान्याच्या आत पाणी न घालता होऊ देतो. पण ते बोटचेपे होत नाहीत. जर कुकर मधेच फोडणी घालून मग पाणी ओतून शिजवले तर एक गच्च होऊन नक्की कुठले धान्य मोड आलेले होते हे कळणार नाही इतके शिजतात!!!

थोड्या टिप्स मिळतील का? धन्स.

विषय: 

पाऊस - एक प्रियकर

Submitted by नीत्सुश on 28 February, 2013 - 07:12

Paus – ek priyakar…

Aata tari yena - Kiti ant pahashil
Mi chatakasarakhi tahanlele nahi
Morasarakhe thui thui nachtahi mala yet nahi
Tu yavas mhanun Tansenasarakha gatahi nahi..

Tu janatos - ya saryanpeksha vegali mazi priti
Antarichya olavyache apule nate
Mazya aat khup aat- tu daba dharun baslela- veli aveli kadhihi barasanara

Tu dhund kosalavas aani mala chimb mithit bhijvavas
Pahila aavesh sampalyavar tu nusatach barsavas
an mi tuzyakade pahat rahava – dole band karun tula anubhavava

Kadhi tu khup khup garjavas, vijanbarobar tandavnrutya karun mala ghabravavas,

सुकटीची चटनी

Submitted by प्रगती जाधव on 27 February, 2013 - 23:33

सहित्यः
१ मुठ सुकट, २ चमचे मिर्ची पावडर, १कान्दा, १ लसुनाचा कान्दा, मीठ,तेल.

क्रुती:
प्रथम सुकटिची डोकी काढुन घ्यावीत.
गरम तव्यावर ती सुकट परतुन घ्यावी. भाजलेल्या सुकटिला आणखिन जास्त चव येते.
मग ती सुकट,मिर्ची पावडर, कान्द्याच्या फोडी,लसनाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ एकत्र घेउन मिक्सर मधुन बारीक करुन काढावे.
आता गरम तव्यात थोडेसे तेल गरम करुन त्यात बनवलेली चटनी परतुन घ्यावी.
ही चटनी ताण्दळाच्या भाकरी (भाकर ही उकडीची आणी चुलिवरील खापरीची असावी) बरो बर छान लागते.

विषय: 
शब्दखुणा: 

चटण्या

Submitted by गोपिका on 25 February, 2013 - 13:33

ह्या पाकशास्त्रा चा ग्रुप मध्ये चटणि बद्दल थ्रेड असलेले मला दिसले नाहि, म्हणुन वाटलं हा थ्रेड सुरु करावा(अणि असेल तर मला लिंक नक्कि पाठवा).चटणि हि अशि गोष्ट आहे जि कुणाला आवडत नाहि असे होणार नाहि.अणि हि असेल तर एखाद दिवशि भाजि किव्वा आमटि नसेल तरि जेवण छानच होते.हा धाग जर चालु झाला अणि राहिला तर कित्ति प्रकारचा च्टण्या आपल्याला शिकयला मिळतिल!!!!
आपल्याला महित आसलेल्या चटण्या इथे शेर करुयात

काल मि कैरी चि चटणि बनवलि होति ति अशि

वेळ : साधारण २० मिन

१ कैरी
गूळ - ३/४ वाटि(किसलेला किवा फोडुन बारिक केलेला)
तिखट पूड - २ चमचे (तिखट जास्त असेल तर ३/४ चमचा)
मीठ - चविनुसार

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककला