पाककला

खाराच्या मिरच्या (मिरची लोणचे)

Submitted by प्रमोद् ताम्बे on 1 April, 2014 - 19:54

खाराच्या मिरच्या (मिरची लोणचे)
 लोणचे xxx.jpg
साहित्य : अर्धा किलो जाड मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या , १००ग्राम मोहरीची डाळ , एक वाटी मीठ , केप्र किंवा प्रवीणचा मिरची मसाला एक पाकीट , एक डझन लिंबे , ५० ग्राम आले , एक वाटी तेल.फोडणीसाठी मोहोरी, हळद,हिंग व मेथीची पूड

विषय: 

पालक पनीरचे पॅटीस

Submitted by प्रमोद् ताम्बे on 1 April, 2014 - 07:36

पालक पनीरचे पॅटीस

-पालक कटलेट xxx.jpg

साहित्य : एक जुडी पालक, एक वाटी पनीरचे बारीक तुकडे , एक वाटी भरून बारीक चिरलेला कांदा, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे धने-जिरेपूड, मीठ, साखर, चवीनुसार लिंबाचा रस, बेसन पीठ.

विषय: 

लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 31 March, 2014 - 08:45

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

विषय: 

कोबीचे मुटके (मुठिया)

Submitted by प्रमोद् ताम्बे on 27 March, 2014 - 23:13

साहित्य : एक वाटी कोबीचा कीस , एक वाटी ज्वारीचे पीठ ,अर्धी वाटी दही ,मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , एक चमचा लिंबाचा रस , एक चमचा मिरची-आले – लसूण पेस्ट , एक छोटा चमचा जिरे पूड,एक टेबल स्पून पांढरे तीळ ( भाजून), चिमूटभर खायचा सोडा , चवीनुसार मीठ व साखर , अर्धी वाटी तेल , फोडणीसाठी हळद , हिंग , जीरे , ८ – १० कढीपत्त्याची पाने ,
कृती : किसलेला कोबी व मुटक्याचे इतर साहित्य एकत्र करुन कडकडीत तेलाचे मोहन घालून मळून घेऊन नंतर मुटके करुन घ्यावेत व ते वाफवावे. वाफावलेले मुटके तेलात जीरे, हिंग, कढीपत्ता घालून परतावेत व कोथिंबीर पेरुन गरम गरम खायला द्यावेत.

विषय: 

झटपट मश्रूम

Submitted by शबाना on 26 March, 2014 - 10:26

कोकोनट पावडर घालून

साहित्य

२५० ग्रम मश्रूम - nutty किंवा साधे पांढरे

लाल तिखट, हिंग, हळद, मीठ आणि कोकोनट पावडर तीन चमचे - म्यागी किंवा इतर ब्रांड आणि कोथिंबीर.
झटपट असल्यामुळे बाकी मसाले लसुन किंवा ओले खोबरे नाही घातले., पण वेळ असेल तर घालू शकता.

वेळ - दहा मिनिटे

कृती

तेल गरम करून कडीपत्ता, हिंग आणि हळद फोडणीला टाकायची. यावर कापलेले मश्रूम टाकून झाकण ठेवून एक वाफ आली की लाल तिखट आणि कोकोनट पावडर घालून परत वाफवायचे. मश्रूमला पाणी सुटतेच त्यामुळे पाणी घालू नका. ५-७ मिनिटात कोथिम्बिर घालून थोडे हलवले कीरस्सादार मश्रूम तयार. पोळी किंवा भातावर वाढून छान लागते

विषय: 
शब्दखुणा: 

गव्हाचा उपमा (खिचडा)

Submitted by मी कोल्हापुरी on 15 February, 2014 - 12:13

लागणारा वेळ:
२० मिनिटे, पुर्व तैयारी ( ३ दिवस )

लागणारे जिन्नस:
२ वाटी गहू,
जिरे,
मोहरी,
हिन्ग,
हळद,
तेल,
हिरव्या मिरच्या
कडी पत्ता,
आले लसूण पेष्ट,
गाजर,
कान्दा,
मटार
कोथिंबीर
मीठ
पाणी
पाककृती:

१. गहू पाण्यात भिजत घालायचे.
२. दोन ते तीन दिवस, ते स्वच्छ धुवून पुन्हा भिजत घालायचे.
३. दोन ते तीन दिवसानी ते दाबुन बघा. त्यातून थोडासा चिक बाहेर यायला हवा.
४. नन्तर त्यातून पाणी काढून, गव्हाचे मिश्रण भरडून घ्या.
५. त्या मिश्रणाच्या कुकर मधुन तीन शिट्ट्य करुन घ्या.

विषय: 

Pina Colada (non-alcoholic)

Submitted by वेदिका२१ on 14 February, 2014 - 20:16

प्रस्तावना-
भारतात बाहेर जेवायला गेलं की ड्रिन्क्स मिळणाऱ्या हाटिलांत दोन मेन्यूकार्डे असतात. एक खाण्याचं, एक पिण्याचं. मी ड्रिन्क्स घेत नसल्याने त्या पिण्याच्या कार्डातलं मला चालेल असं पेय म्हणजे दारुविरहित मॉकटेल्स. या मॉकटेलची किंमत शंभर-दोनशे काहीही असते- जवळजवळ मेन डिश इतकीच.
तरीही कधीतरी मॉकटेल घेतलं जातं आणि चव आवडली असली तरी ’अरे बापरे दीडशे रुपये या एका ग्लाससाठी’ हा विचार डोक्यातून हलत नसतो!

साहित्य
परवा फ्रिजमध्ये पनीरच्या भाजीत घालून उरलेलं थोडं हेवी क्रीम होतं. फिशकरीत घालून उरलेलं कोकोनट मिल्क होतं. तयार अननस ज्यूस होता.

कृती

विषय: 
शब्दखुणा: 

किन्वा (Quinoa) पाककृती

Submitted by .. on 4 February, 2014 - 17:31

किन्वा (Quinoa) वापरुन करता येणार्‍या पाककृती, किन्वाचे गुणधर्म वगैरे बद्दल इथे एकत्र चर्चा करण्यासाठी हा धागा. नंतर शोधायला सोपे जाईल म्हणून वेगळा धागा काढत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

नैरोबीतले दिवस - भाग २

Submitted by दिनेश. on 24 January, 2014 - 13:27

४ ) नैरोबीचा निसर्ग

या सुंदर हवामानामूळे निसर्गाचे एक अनोखे रुप नैरोबीत दिसत राहते. शहरभर मोठमोठे वृक्ष जोपासलेले दिसतात. तिथल्या वृक्षांच्या आकारमानाची कल्पना आपल्याला येणे कठीण आहे, कारण अगदी सहाव्या मजल्यावरच्या घरातूनदेखील मला मोठे मोठे वृक्ष बसल्याबसल्या दिसत असत.
तसे बघायला गेलो तर केनया प्रसिद्ध आहे तो गवताळ प्रदेश आणि त्यामधल्या तृणभक्षी प्राण्यांसाठी पण नैरोबीत मात्र वेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत.

डाळ तांदूळाची खिचडी - कमलाबाई ओगले पद्धत (फोटोसहीत)

Submitted by दक्षिणा on 23 January, 2014 - 13:17

लागणारा वेळ - एकूण खिचडीसाठी तसा वेळ कमी लागतो अगदी. १५ मिनिटं.

लागणारे जिन्नस - तांदूळ, डाळ (कोणतीही मूग किंवा तूर) मी तूरीची घेतली आहे. (दोन्ही मिळून अर्धी वाटी, धणे, सुकं खोबरं, जिरे, मीठ, गुळ, कोथिंबिर, ओलं खोबरं. बाकी नेहमीचं फोडणीचं साहित्य. (तेल, मोहरी, हिंग आणि हळद. आणि कढिलिंबाची पानं.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककला