पाककला

वांगे फॅन क्लब : वांगे अमर रहे !

Submitted by काउ on 19 December, 2014 - 09:45

संक्रांती जवळ आली.

आज वांगे पावटे भाजी केली. तेलाच्या फोडणीत कढीपत्ता , लसुण ,कांदा , टोमटो यांचा किस घालुन त्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजत ठेवल्या. मग त्यात आधीच शिजवलेले पावटे घातले. थोडे पावटे क्रश करुन मिसळले. तिखट , मीठ, गूळ ,मसाला गरजेनुसार. शेवटी ग्यास बंद करताना दोन चमचे दही घालुन मिसळुन घेतले.

हा धागा वांगे फॅन क्लबसाठी.

वांग्याच्या भाज्या , भरीत , काप ..

इ इ

vangepavte.jpg

करायला गेलो...

Submitted by दिनेश. on 17 November, 2014 - 04:56

आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतलेही कसावा हे एक महत्वाचे पिक आहे. पूर्व आफिकेत तो प्रकार एक स्नॅक म्हणून खातात तर पश्चिम आफ्रिकेत ते मुख्य अन्न आहे.

या पिकाची शेती अगदी सोपी, फारसे काही करावे लागत नाही. उत्पन्नही भरपूर. पण या मूळांवर काही प्रक्रिया केल्याशिवाय ती खाता येत नाहीत. त्यात, खास करून सालीत काही विषारी घटक असतात.

आपल्याकडे याचे प्रचलित रुप म्हणजे साबुदाणा. साबुदाणा खिचडी म्हणजे आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय !
माझ्या भारतातून आणायच्या सामानात साबुदाणा ( जास्त नाही, दोन वेळा खिचडी होईल इतकाच ) असतो. तशी ती
दोनवेळा करूनही झाली.

मूंगर्‍याची भाजी ( रॅडिश पोड्स)

Submitted by स्नू on 13 November, 2014 - 02:41

लागणारा वेळ:
४५ मिनिटे

लागणारे जिन्नस:

मूंगरे - पाव किलो
बटाटा - 1 मध्यम - साले काढून फोडी केलेला
हिंग -चिमूटभर
हळद - पाव चमचा
लाल तिखट - पाव चमचा
मीठ - चवीनुसार
धन्याची पूड -एक चमचा
जीरे - १/२ चमचा
तेल - फोडणीपुरते

क्रमवार पाककृती:

1. तर असे दिसतात हे मूंगरे.

11.jpg

2. मूंगर्‍यांची टोके तोडून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.

12.jpg

3. १ बटाटा सोलून फोडी करून घ्यावा

विषय: 
शब्दखुणा: 

माहिती हवी आहे - मासे बनवन्या संबधी.

Submitted by सहि on 6 November, 2014 - 02:30

मला मासे बनवायला शिकायचे आहे.
मासे कसे आणायचे, कसे स्वछ करायचे, कसे बनवायचे, सगळे सविस्तर सांगा.
घरी कधी कोणी non - veg केले नही आहे, तरी मला सोपा जास्त अवघड नसेल असे काही सांगा.
तसे आमच्या ह्यांना paplate, surmai मासे आवडतात.

क्रुपया मदत करा.

Thanks In Advance.....

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

इडली-डोश्याचे ओले तयार बॅटर

Submitted by हर्ट on 3 November, 2014 - 01:30

इतर ठिकाणी माहिती नाही पण पुण्यात खूपशा ठिकाणी इडली डोशाचे तयार सारण मिळते. मी एक दोनदा विकत आणले. पण, इडलीचा वास नासका येत होता आणि उरलेले पिठ परत वापरता आले नाही. नक्की कुठे हे पिठ चांगले मिळते?

विषय: 

दिवाळीची मेजवानी - २०१४

Submitted by दिनेश. on 20 October, 2014 - 08:47

परवा सईने आठवण काढली होती म्हणून.. साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या.

प्रसादाचे लाडू.. केळ्याचे लाडू

साधेसे सलाद

दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ! सुका मेवा घ्या !

Submitted by दिनेश. on 14 October, 2014 - 05:10

बघता बघता दिवाळी आली कि तोंडावर. तूम्हा सर्वांना शुभेच्छा आणि वेळेवर पोहोचावा म्हणून देशोदेशीचा सुका मेवा आधीच पाठवतोय..

१) कॅलिफोर्नियाचे बदाम

२) इराणी " अनारदाणा". हा प्रकार मला दुबईला मिळाला. दुकानदाराला नाव विचारले तर त्याने अरबी नाव सांगितले.

शब्दखुणा: 

उदयोन्मुख शेफ व हवाईसुंदरी तेजल देशपांडे : संयुक्ता मुलाखत (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 September, 2014 - 08:37

सध्याच्या तरुणाईत स्वतःच्या हिमतीवर शिकण्याची व स्वतःच्या पायांवर उभे राहून आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात पुढे काम करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते. हे चित्र निश्चितच सुखावह आहे. याच पिढीच्या एका एकवीस वर्षांच्या तरुणीशी माझी काही दिवसांपूर्वी ओळख झाली. तेजल देशपांडे! एक हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व. पंचतारांकित हॉटेलमधील कामाचा अनुभव गाठीशी असलेली ही एक उदयोन्मुख शेफ, पर्यटन विषयातील पदवीधर आणि काही दिवसांतच एका आंतरराष्ट्रीय एअरलाईन्समध्ये रुजू होणारी हवाईसुंदरी. शिवाय हे सर्व शिक्षण तिने स्वतःच्या हिमतीवर, 'कमवा व शिका' या तत्वावर घेतले आहे हे विशेष!

Arancini - ईटालिअन पकोडे

Submitted by गोगो on 10 September, 2014 - 13:35

साहित्यः
उरलेला भात
बेसिल पाने
ओरेगानो, थाईम
चिली फ्लेक्स
चविपुरते मीठ
केच-अप
ब्रेड
चीज क्युब

कृती:
भात हाताने मोकळा करुन घ्यावा. त्यात केच-अप व इतर हर्ब्स तसेच बेसिल्ची पाने चिरुन घालावी. ब्रेड मिक्सर्मधुन बारिक करुन घ्यावा व या मिश्रणात बाईंडिंगपुरता घालावा. सगळ्या मिश्रणाचा गोळा मळून छोट्या पार्‍या कराव्या.
एका चीजक्युबचे समान ८ तुकडे करुन प्रत्येक तुकडा एका पारीत घालून बंद करावा. हे गोळे हवे असल्यास अंड्यात व ब्रेड्क्रम्ब्स किंवा रव्यात घोळवून किंवा नुस्तेच डीप-फ्राय करावे.

स्रोतः

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककला