आरोग्य

हळदी चे पान

Submitted by Rupali Akole on 7 June, 2017 - 08:37

हळदी ची कुंडीत लागवड,त्याच्या पानांन ची पाककृती,आयुर्वेदिक महत्व इत्यादि ची माहिती हवी आहे.

बाबांचा मित्र

Submitted by सई केसकर on 23 May, 2017 - 05:09

मी अगदी लहान असल्यापासून घरात एक शब्द नेहमी ऐकू यायचा. मी शिकलेल्या पहिल्या काही शब्दांमधील तो एक होता. तो शब्द म्हणजे डायबेटीस.
माझ्या बाबांना त्यांच्या लग्नाआधीच पाच वर्षं मधुमेहाचे निदान झाले. तेव्हा ते फक्त वीस वर्षांचे होते. यावर्षी त्यांची एकसष्ठी आहे. बाबा मधुमेहाला त्यांचा मित्र म्हणतात. या वर्षी त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर तब्बल ४१ वर्ष साजरी केली. इतक्या वर्षांचा सहवास माझ्या आईला सुद्धा मिळाला नाहीये असा विनोद आम्ही नेहमी करतो. पण बाबांची गोष्ट अगदी लिहून ठेवण्यासारखी आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

अंधत्वनिवारण : आधुनिकोत्तर भारतीय विदा निर्माण पद्धती व तदनुषंगाने

Submitted by आ.रा.रा. on 27 April, 2017 - 10:19

India has changed its over four- decade-old definition of blindness, bringing it in line with the WHO criteria, a step that would drastically bring down the number of people considered "blind" in the country.

According to the new definition, a person who is unable to count fingers from a distance of three metres would be considered "blind" as against the earlier stipulation of six metres, which was adopted in 1976.

शब्दखुणा: 

आर्टीफिशियल स्वीटनर अर्थात शुगर फ्री आरोग्यासाठी घातक, का?

Submitted by नलिनी on 26 April, 2017 - 08:05

आर्टीफिशियल स्वीटनर अर्थात शुगर फ्री हे साखरेऐवजी पर्याय म्हणून वापरावे का?
तर नाही.

आर्टीफिशियल स्वीटनर अर्थात शुगर फ्री हे आरोग्यासाठी का बरं घातक असते? त्याचे आहारवर कोणते विपरीत परीणाम होतात?

विषय: 

शीतपेय आणि आपले आरोग्य

Submitted by नलिनी on 26 April, 2017 - 07:37

आपल्याला नेहमीच वाचनात / ऐकण्यात येते की शीतपेयं आरोग्यासाठी हाणीकारक आहेत, पण कसे?
साधारण एक कॅन शीतपेय प्यायले तर काय होते ते पाहू -
साधारण १० टिस्पून साखर शरीरात जाते. एवढी साखर एकदाच खाल्ली तर ओकारीच व्हायला हवी पण त्यातले phosphoric acid तसे होऊ देत नाही.

विषय: 

इंटरमिटंट फास्टिंग ( IF ) - अनुभव

Submitted by केदार on 25 April, 2017 - 10:05

ओके ! इंटरमिटंट फास्टिंग ! IF

* * * * * फॅ़क्ट * * * * *
१. तुमच्याच भल्याकरता, तुम्हाला त्या अवधीत काही न खाता उपाशी राहावे लागते!
२. IF ही लाईफस्टाईल आहे. वेटलॉस प्रोग्रॅम नाही !
३. IF च्या आधीचे वजन ७३ किलो, सध्याचे वजन - ६९.८ आधीच्या बॉडीफॅट २० / IF नंतर १६%, सध्याच्या रिव्हाईज गोल - १०%

विषय: 

कशी लावायची भाज्यांची गोडी?

Submitted by सई केसकर on 22 April, 2017 - 01:55

माझा मुलगा ६ महिन्याचा झाला तेव्हापासून तो ८ महिन्यांचा होईपर्यंत मी आदर्श माता होते. कारण मी जे देईन ते तो बकाबका खायचा. नाचणी, अंडे, चिकन सूप, भाज्यांचे सूप, कुस्करलेली भाकरी, दही, फळं काही नाही म्हणून नाही. पण ८ महिन्यांचा झाला आणि त्याला जीभ फुटली. त्यानंतर त्यानी जे काय खाण्याचे नखरे सुरु केले ते कमाल होते. तरीसुद्धा १-२ या वयात त्याला थोडीतरी समज होती. २ वर्षांचा झाल्यापासून थयथयाट करणे हे एक नवीन अस्त्र त्याच्या हाती लागले आहे. त्यामुळे कुठलीही अप्रिय सवय लावताना आमच्या घरात प्रचंड दंगा होतो. आधी तो तीन बाजूंनी असायचा. मी, माझा नवरा आणि मुलगा तिघेही एकमेकांवर चिडायचो.

विषय: 

एक वर्ष इंटरमिटंट फास्टिंगचे

Submitted by सई केसकर on 21 April, 2017 - 07:05

या महिन्यात मला इंटरमिटंट फास्टिंग सुरु करून एक वर्षं झाले. या एका वर्षात माझे वजन १४ किलो कमी झाले. पहिले दोन ते तीन महिने वजन झपाट्याने कमी झाले आणि नंतर मात्र व्यायाम आणि काटेकोर आहार यांच्या जोडीने कमी झाले. या आधी मी कित्येक वेळा ६ महिन्याच्या वेटलॉस प्रोग्रॅम मध्ये ५-८ किलो वजन कमी केलेले आहे. पण ते नेहमी एका वर्षाच्या आतच वाढायचे. एवढे जास्त वजन कमी करायची आणि सलग एक वर्ष तो ग्राफ टिकवून ठेवायची माझी पहिलीच वेळ आहे. आणि त्यात फक्त इंटरमिटंट फास्टिंगचा वाटा नसून काही लावून घेतलेल्या सवयी आहेत. त्याबद्दलही लिहिणार आहे.

इंटरमिटंट फास्टिंगमुळे झालेले फायदे:

विषय: 

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

Submitted by मार्गी on 19 April, 2017 - 10:51

नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

दि. ३ जुलै २०१६
प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी!

चांगला डॉक्टर कसा शोधायचा?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 13 April, 2017 - 06:07

शास्त्रीय, नैतिक पायावर व्यवसाय करू बघणारे, रुग्ण-संवादी, पारदर्शक डॉक्टर्स व समंजस नागरिक यांनी एकत्र येण्यासाठीचे एक पाउल म्हणून 'पुणे सिटीझन डॉक्टर फोरम' हे व्यासपीठ सुरु झाले आहे. आपल्याला ज्या डॉक्टर बाबत चांगला अनुभव आला आहे अशा डॉक्टर्सची इतर रुग्णांना शिफारस करण्यासाठी कृपया मेडिमित्र  या संकेत-स्थळाला भेट देऊन त्यांचीनावे नोंदवा. या संकेत-स्थळावर खालील प्रकारचे प्रश्न दिले आहेत - डॉक्टरांनी पुरेसा वेळ दिला का; आजार व त्यावरील उपचार याबाबत पुरेशी माहिती दिली का;प्रश्नांना नीट उत्तरे दिली का? विशिष्ट दुकानातून औषध खर

विषय: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य