अमेरिका

सांज अमेरिका

Submitted by अमितव on 6 June, 2018 - 13:23

भारतात असताना सांज लोकसत्तातल्या सासूने सुनेचा छळ करायला वापरलेल्या नामी क्लुप्त्या, गावकर्‍यांनी हिंसक जनावरांना हुसकवायला लावलेला फास आणि त्यात चुकुन अडकलेले उंदीर छाप बातम्या वाचायला जाम मजा यायची.
देश बदलला तरी असल्या गमतीशीर बातम्या रोज कानावर पडतातच. तर अमेरिकेतल्या ट्रिविअल, मजेशिर, विअर्ड बातम्या शेअर करायला हा धागा.
अमेरिका लिहिलं असलं आणि अमेरिकेतील आयुष्यात धागा असला तरी तुमच्या देशातल्या, वाचनातल्या बातम्यांचं स्वागतच आहे!

बागकाम अमेरिका - २०१८

Submitted by मेधा on 2 March, 2018 - 08:31

मिनू* आईला म्हणाली " आई, मार्च महिना सुरु झाला . फ्लावर शो च्या जाहिराती झळकतायत जिथे तिथे. बियांचे, कंद मुळांचे कॅट्लॉग्ज यायला लागलेत. फोर्सिथिया, विच हेझल फुललेत इकडे तिकडे. क्रोकस आणि डॅफोडिल्स ची हिरवी पाती डोकावयला लागले. होस्टाचे कोंब उगवून आले. अजून मायबोलीवर धागा कसा आला नाही यंदाच्या बागकामाचा ? "

कोण कोण येणार फ्लावर शो बघायला यंदा ? बागकामाचे काय प्लान्स? लिहा इथे पटापट

https://theflowershow.com/plan-your-visit/show-info/

विषय: 
शब्दखुणा: 

झहिरा

Submitted by सायली मोकाटे-जोग on 3 October, 2017 - 16:00

झहिरा भेटली मला मुंबईला ‘ग्रँड ह्यॅटस्’ मध्ये. साल २००६. आमचं विमान रद्द झाल्यामुळे ३ दिवस सहप्रवासी या नात्याने आमची प्रथम तोंड ओळख झाली. जुजबी नाव-गाव बोलणे झाले आणि काही तासातच आमच्या गप्पा रंगल्या. बुजऱ्या स्वभावाची झहिरा खूप बोलकी झाली. “तुझा स्वभाव आवडला मला… मागच्या काही वर्षात मी इतकं कुणाशीच बोलले नाहीये… ” ती म्हणाली. मला आनंद वाटला आणि कुतूहलही!

विषय: 

अमेरिकेतला गन व्हायोलन्स, गन कंट्रोल आणि राजकारण

Submitted by माने गुरुजी on 2 October, 2017 - 13:50

काल व्हेगासमधे झालेल्या शूटींगनंतर हा धागा काढावासा वाटला. खरंतर ती दुर्घटना राजकारणापलीकडे असायला हवी. पण गन्स आणि अमेरिकेतलं राजकारण इतकं जवळ आहे की हा धागा नुसता चालू घडामोडीत चालणार नाही.
cnn वर एक वाचनीय लेख आहे.
http://www.cnn.com/2017/10/02/politics/guns-maps-las-vegas/index.html

विषय: 
शब्दखुणा: 

मु. पो. १६०० पेन्सिल्व्हानिआ अ‍ॅव्हेन्यू (आणि मार-अ-लागो फ्लो. , बेडमिन्स्टर न्यू. जर्सी)

Submitted by अमितव on 15 September, 2017 - 14:06

डॉनल्ड ट्रंप आणि अमेरिकेतील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी हा धागा. फक्त राजकीय घडामोडी आणि त्यांचे परिणाम यांची चर्चा करायला हा धागा वापरा.

विषय: 

ट्रंपच्या राज्यात...

Submitted by राज on 15 September, 2017 - 09:52

अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष डानल्ड टृंप यांच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी हा धागा. राष्ट्राध्यक्षाच्या निर्णयाचा परिणाम तळागाळातल्या माणसांपासुन "टू बिग टु फेल" संस्थांवर होत असल्याने इथे अगदि एलिमेंटरी शाळेच्या बाकापासुन ते इमिग्रेशनच्या डाका पर्यंत आणि झालंच तर रशियन कॉल पासुन मेक्सिकन वॉल पर्यंत चर्चा करायला हरकत नाहि.

शब्दखुणा: 

ओम्निव्होर्स डिलेमा -- मायकल पोलान

Submitted by सई केसकर on 15 September, 2017 - 07:28

नुकतेच मायकल पोलान यांचे 'द ऑम्निव्होर्स डिलेमा' हे चारशे पानी पुस्तक वाचले.
हे पुस्तक घेतल्यानंतर आणि ते वाचायला सुरुवात करायच्या आधी मी याची परीक्षणं आणि त्यावर झालेली टीका वाचली. ती इथे आधी लिहायला हवी असे मला वाटते.

विषय: 

महा- ज्वालामुखीच्या प्रदेशात फ़ुलले जीवन : येलो स्टोन नॅशनल पार्क

Submitted by दीपा जोशी on 16 August, 2017 - 06:00

महा- ज्वालामुखीच्या प्रदेशात फ़ुलले जीवन : येलो स्टोन नॅशनल पार्क

(टिपः- हा लेख ७जुलै २०१७ च्या लोकप्रभा अन्कात प्रसिद्ध झाला आहे.)

yellow stone spring 2 IMG_20160702_214616301_HDR.jpg

अमेरिकन भाज्या, फळं आणि मी

Submitted by दीपा जोशी on 27 May, 2017 - 03:05

अमेरिकन भाज्या, फळं आणि मी (बदलून, फोटोंसहित.)

romanesko broccoli 4.jpgरोमनेस्को ब्रोकोली

'ट्रम्पणे' म्हणजे काय रे भाऊ? ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!

Submitted by राफा on 6 November, 2016 - 11:26

आधुनिक शब्दकोशातून:

ट्र्म्पणे!

क्रियापद.

अर्थ:

१. बोलताना आय (I) व माय (My) ह्याच्याशिवाय दुसरे काही न बोलणे.

२. दुस-याविषयी बोललेच तर त्याची किंवा तिची आयमाय काढतच बोलणे.

३. सार्वजनिक नळावरील भांडणात एखाद्याने ‘ठेव तर कळशी पुढे… मग तुझं काय करीन सांगता येणार नाही!’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल?’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’ असे लाडीक उत्तर देणे.
(अर्थछटा: मूलतत्ववाद्यांशी लढायला स्वत: ‘मूल’तत्ववादी होऊन पोरकट उपाय सुचवणे)

Pages

Subscribe to RSS - अमेरिका