कथा

रणांगण

Submitted by हर्षल_चव्हाण on 23 October, 2012 - 08:07

--------------तारवटलेल्या डोळ्यांनी कृष्णा उठला. उठल्या-उठल्या; स्लीप मोडमध्ये असलेल्या लॅपटॉपला त्याने जागवले. काल रात्री ज्या मुलीच्या प्रोफाईल पेजवर होता, तिचा चेहेरा पाहून दिवसाची सुरुवात झाली. खरंतर, सुरूवात म्हणजे काही विशेष काम असं नव्हतंच. मुरली मनोहर काही करो अथवा न करो, सार्‍या जगाची चिंता तो मनोमन करून सर्व चिंतांचे हरण करतोच, अशी नागरीकांची श्रद्धा होती. त्या श्रद्धेमुळे कृष्णाची मात्र पंचाईत झाली होती. नको त्या वयात; नको तो पराक्रम करून बसल्यामुळे योग्य त्या वयात; योग्य ते करतांना लोकापवादाची सारखी भिती बाळगत त्याला आता जगावं लागत होतं.

शब्दखुणा: 

सुरेश

Submitted by आशयगुणे on 18 October, 2012 - 08:56

समोर उभ्या असलेल्या शाळेच्या इमारतीच्या साक्षीने दामोदर हॉटेलच्या छोट्याशा जागेने तिशीत पदार्पण केले. शाळेची इमारत ह्या जागेपेक्षा १० वर्ष मोठी. आणि म्हणून कदाचित मोठेपणाचा आव आणीत त्या छोट्या जागेकडे सदैव डोळे वटारून बघत असते. शाळेच्या इमारतीला माहिती आहे - मोठी होऊन होऊन किती मोठी होणार ही जागा? मोठेपणाचा हक्क आणि ठेका आपल्याकडेच असणार आहे - सतत! शाळेची इमारत दहा वर्षांची होती तेव्हा समोरच्या जागी, जिथे काहीही नव्हतं, थोडी हालचाल सुरु झाली. 'शाळेच्या ठिकाणी हे काय?' अशी बऱ्याच जणांची भावना त्या दिवसात होती. पण शेवटी थोडा संघर्ष करून दामोदर हॉटेल ह्या इमारतीने आपले अस्तित्व मिळवले.

विषय: 

निरभ्र

Submitted by तेजूकिरण on 15 October, 2012 - 15:16

"पुजा,पुजा आहेस कुठे ?" धावत,धावत पुर्णिमा आणि पुनीत तिच्यासमोर येउन उभे राहीले. दोघांच्या हातात भरपूर shopping bags आणि चेहयावर ओसंडून चाललेला उत्साह.

"हे बघ, मी सकाळ्च्या विधींसाठी हा dress घेतलाय, अगदी TV मधल्या त्या serial च्या नायिकेसारखा आहे ना? आणि हा necklace बघ ना, हा ना मी खास, हळदीच्या कार्यक्रमाला माझ्या निळ्या dress वर घालायला आणला आहे. छान आहे ना गं, आणि हा चुडीदार मी reception ला घालणार..." पुर्णिमा ची बड्बड चालूच होती. पुनीत सुद्धा काही काही दाखवत होता उत्साहात. सर्व घर आंनदाने भरलं होतं. कारणच तसं होतं. पुजाचं लग्नं आता काही दिवसांवर आलं होतं.

विषय: 
शब्दखुणा: 

चकवा

Submitted by Mandar Katre on 29 September, 2012 - 13:40

चकवा

कुवेत एअरवेज चे फ्लाईट ३११ मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावरून आकाशात झेप घेत होते ,तसतसे आशिष चे विचारही मणामणाचे ओझे उतरावे तसे हलके होत होते . गेले१० महिने आणि त्या काळातल्या घडामोडी एखाद्या चित्रपटासारख्या त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या .गेले एकदोन दिवस नव्हे,तर चक्क १० महिने आपण असे झपाटल्यागत कसे काय वागत होतो? याचा वचार करूनही त्याला उत्तर सापडेना !

विषय: 
शब्दखुणा: 

वर्तुळ : भाग ३

Submitted by विशाल कुलकर्णी on 20 September, 2012 - 02:06

वर्तुळ : मागील भाग

***************************************************************

इतके दिवस मनात उगीचच वाटायचे की त्याचे माझ्यावर प्रेमच नाही. म्हणुनच तो घरात विचारायचे टाळतोय माझ्याबद्दल. पण आता मरण समोर दिसत असताना कळत होते तो का टाळाटाळ करत होता ते? कुठल्या दुष्टचक्रात अडकलाय तो? आनंद एकाच गोष्टीचा आहे की लग्न करुन त्याच्या समवेत सुखाने आयुष्य काढने नशिबात नाहीये, पण निदान .....

विषय: 

वर्तुळ : भाग २

Submitted by विशाल कुलकर्णी on 11 September, 2012 - 00:32

काकु पुन्हा तेच भेसुर हसली...

हं... वेडा आहेस ! तू काय किंवा तुझे बाबा काय तिच्यासाठी फक्त एक माध्यम आहात. शहाणा असशील तर तुझे बाबा म्हणतात ते ऐक. हे घर, मी तर म्हणते घरच काय गावसुद्धा सोडून जा. तरच वाचशील.

वर्तुळ : भाग १
आता पुढे....

*******************************************************************************

नक्कीच काही तरी बिनसलय त्याचं. गेले तीन दिवस झाले रोज मी तळ्याकाठी वाट बघतेय त्याची, पण साहेबांचा पत्ताच नाही. शेवटी वैतागून ठरवलं की आज त्याच्या घरी जायचच, अगदी जायचं म्हणजे जायचं.'

विषय: 
शब्दखुणा: 

वर्तुळ

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 September, 2012 - 05:13

श्शी ssssssss

श्श्या ssssssssss

हम्म्म...

ह्म्म्म्म्....

’जाम कंटाळा आलाय आता...’

’मलाही...तू काय ठरवलयस?’

’कशाबद्दल?’

’कशाबद्दल म्हणजे काय? तुझं लक्ष कुठेय?’

का?

’तू बोलणार आहेस की नाही?’

’बोलतोच तर आहे...’

’माझ्याशी नाही म्हणत आहे मी...’

’मग काय तिच्याशी बोलू?’

त्याने जरा अंतर राखून बसलेल्या, बर्‍याच वेळापासून आजुबाजुच्या गर्दीची पर्वा न करता आपल्याच चाळ्यात दंगलेल्या त्या जोडप्यातील 'ती'च्याकडे बोट दाखवत मिश्किल स्वरात विचारलं.

’भंकस नकोय हा. मी थट्टेच्या मुडमध्ये अजिबात नाहीये.’

विषय: 
शब्दखुणा: 

आसवांना वेळ नाही!

Submitted by अमेलिया on 7 September, 2012 - 01:49

पुन्हा कुठूनशी ती गाण्याची धून पमीला ऐकू आली. एक मस्त ठेका होता त्या गाण्याला. ते ऐकला की पमीच्या हृदयाचे ठोके जलद व्हायचे, अंगभर एक विजेची लहर सळसळत जायची आणि पाय आपसूकच ठेका धरायचे. मग ती हवेतच हात हालवायची, टाळ्या वाजवायची उभी राहून एखादी गिरकीही घेऊन पहिली होती तिने. पण तेवढ्यात आक्काची हाक कानावर येऊन आदळायची. "पमे, गधडे, धडपडायचे हाय का? एका जागी बसून रहावं त्ये बी समजंना का बे तुला आता? आमाला काय कामं-धामं न्हाय्ती का? का तुझ्याकडच बघत बसू दिसभर? ते समुर काम दिल्यालं हाय न्हवं, कर की मुकाट... ना धड कामाची..

शब्दखुणा: 

हेल्पर

Submitted by pradyumnasantu on 30 August, 2012 - 20:04

कोल्हापूरचा शाहू-मिल परिसर. चांगलाच राडा झाला असावा तिथं जवळपास. बहुधा शाहु-मिलच्या कामगारांच्यात असावा. पलीकडेच डोंबारवाडा आहे. शाहू-मिल व डोंबारवाड्याच्यामधून राजारामपुरीकडे, व पुढे शिवाजी विद्यापीठाकडे जाणारा रस्ता जातो. या रस्त्याच्या कडेकडेनं पुष्कळशा झोपड्या आहेत. भाडे देणे घेणे, किरकोळ कर्जांची देवघेव, व्याजांची वसुली, बायाबापड्यांकडे वाकडा डोळा करून पहाणे, या ना त्या अनेक कारणांनी तिथं नेहमीच राडे चालतात. कोल्हापूरचा प्रसिद्ध कोटीतीर्थ तलाव पलिकडेच आहे. खरे तर गणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध पवित्र तलाव हा. विसर्जनाच्या दिवसांत त्याची शान काय वर्णावी.

शब्दखुणा: 

कायापालट

Submitted by प्रकाश कर्णिक on 15 August, 2012 - 06:35

ठेंगण्या दुस्तरला आज उठायला खूप उशीर झाला होता. अजूनही तो त्याच्या लोखंडी कॉटवर भकासपणे छताकडे आणि त्या अतिशय जुन्या थकलेल्या पंख्याकडे पहात पडला होता. त्याच्या सेल मधील दुसरी कॉट रिकामी होती. त्यावरचं पांघरून व्यवस्थित घडी करून ठवलेलं होतं. सत्या इतका वेळ सेल मध्ये असणं शक्यच नव्हतं. सत्या लवकर उठून तुरुंगाच्या जिम मध्ये व्यायामाला जातो आणि त्या नंतर त्याला भटारखान्यात डूटी असते हे गेल्या तीन वर्षांचे वेळापत्रकच होते.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कथा