वैद्यकशास्त्र

डिप्रेशन .. जगण्याचा कंटाळा

Submitted by राधानिशा on 14 October, 2020 - 11:16

हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..

40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..

शब्दखुणा: 

संवाद

Submitted by आनन्दिनी on 6 August, 2020 - 13:41

संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा!

हर्ड इम्युनिटी जगाला / भारताला खरंच वाचवू शकेल ?

Submitted by छज्जातील बंडीही... on 15 May, 2020 - 10:38

जगातले प्रगत देश हर्ड इम्युनिटीचा दाखला देऊन लॉकडाऊनला विरोध करत आहेत. ८०% लोक आपोआप बरे होत आहे हे अगदी बरोबर आहे. पण आजवर जे तीन लाख दोन हजार मृत्यू झाले आहेत ती प्रत्येक केस कुठल्या ना कुठल्या कुटुंबावर कोसळलेले आभाळ आहे. यातले ८६०००+ एकट्या अमेरिकेतले आहेत.

वुहान मधले मृत्यूचे तांडव लॉकडाऊन नंतरच नियंत्रणात आले. जर्मनीची साथ लॉकडाऊनने आटोक्यात आली. दक्षिण कोरियानेही नियंत्रण मिळवले.
व्हिएतनाम या देशाचे कौतुक. वैद्यकीय सुविधा तुटपुंज्या असतानाही शून्य मृत्यू.
चीनच्या आजूबाजूच्या अनेक राष्ट्रांनी कोरोना नियंत्रणात ठेवला.

शब्दखुणा: 

आदरणिय श्री मोदीजींचे कालचे भाषण

Submitted by छज्जातील बंडीही... on 12 May, 2020 - 22:44

भारताचे पंतप्रधान आदरणिय श्रीयुत नरेंद्रजी मोदीजी यांचे कालचे भाषण समजले नाही. कालचे भाषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असावे हे माझे गृहीतक आहे. हे चुकीचे असेल तर माझी चूक झाली हे कबूल करतो.

जर गृहीतक योग्य असेल तर
चालत जाणा-या मजुरांची व्यवस्था
पीपीई कीट्सचे वाटप
महाराष्ट्र राज्यासहीत प्रत्येक राज्याच्या वाट्याला येणारा निधी अथवा मदत किती व कशी
झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न

या मुद्द्यांवर ते काय बोलले हे मला समजलेले नाही. ज्यांना यातली माहिती असेल त्यांनी कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती.

‘कोरोना’मुळे मला झालेली वैराग्य प्राप्ती

Submitted by Dr Raju Kasambe on 4 April, 2020 - 00:25

‘कोरोना’मुळे मला झालेली वैराग्य प्राप्ती

गेले काही दिवस ‘कोरोना’ नावाच्या राक्षसाच्या भीतीने आम्ही स्वतःला घरात कोंडून घेतल्यामुळे आम्हाला वैराग्याची भावना प्राप्त व्हायला लागली. आम्ही आयुष्यातल्या बहुतेक सुखसुविधांचा त्याग केला. त्याचा आम्ही इतक्या सहजपणे त्याग करू शकू असे आम्हाला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. तेव्हा आता आपण आयुष्यातील पुढील वाटचाली बाबत ज्ञानी गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे असे अस्मादिकांच्या डोक्यात आले.

दिवस घरी हे काढायचे (विडंबन)

Submitted by Dr Raju Kasambe on 29 March, 2020 - 23:56

दिवस घरी हे काढायचे

फेसबुकात गुंतत जाणे
व्हाट्सऍप वर 'चॅट'त जाणे
कोरोनाचे संदेश धाडायचे
दिवस घरी हे काढायचे

मोजावे तांदळाचे दाणे
मोजावी पंख्याची आवर्तने
खिडकीतुन चांदणे मोजायचे
दिवस घरी हे काढायचे

माझ्या ह्या चाळी पाशी
थांबू नको अजिबात अशी
‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायचे
दिवस घरी हे काढायचे

दिवसभर हाततोंड धुणे
आठवणींना उजाळा देणे
कुटुंबासोबत खिदळायचे
दिवस घरी हे काढायचे

चणचण सुविधांची फार
बंद झाले हॉटेल बार
लिंबू पाणीही गोड मानायचे
दिवस घरी हे काढायचे

पुस्तक परिचय : शल्य कौशल्य - डॉ. भा. नी. पुरंदरे

Submitted by प्राचीन on 26 November, 2019 - 09:21

मी वाचलेले पुस्तक : शल्य कौशल्य - डॉ. भा. नी. पुरंदरे
प्रकाशन - अश्वमेध
वर्ष - १९८३.

व्हर्टिगो आणि विमानप्रवास

Submitted by वत्सला on 29 October, 2019 - 06:29

या विषयावर चर्चा झाली असल्यास कृपया मला लिंक द्या.

एका ज्येष्ठ नागरिक बाईना व्हर्टिगोचा त्रास आहे. त्यांना विमानप्रवासात काही त्रास होऊ शकतो का? तसेच विमानप्रवासात अजून काय काळजी घ्यावी? इथे या संदर्भात कोणाचे काही अनुभव असल्यास सांगाल का?
धन्यवाद!

विकतचे दुखणे

Submitted by सामो on 15 October, 2019 - 15:12

काही वर्षांपूर्वी, टेक्सासला रहातेवेळी, एके दिवशी, माझ्या रूममेट्च्या एका मैत्रिणीला भेटून आले. आदल्या शुक्रवारी तिने लिपोसक्शनची "मायनर(?)" सर्जरी करून घेतली होती म्हणून तिची विचारपूस करण्यासाठी आम्ही ५ मिनीटे जाऊन आलो.

बायपोलर डिसॉर्डर - माहीती

Submitted by सामो on 13 September, 2019 - 11:05

- मी वैद्यकियशास्त्राशी दुरान्वयानेही संबंधित नाही. ही माहीती अन्यत्र गोळा करुन येथे दिलेली आहे. तेव्हा जर काही शंका असतील तर त्यांवर आपल्या डॉक्टरांकडुनच सल्ला घावा.
https://cdn.psychologytoday.com/sites/default/files/blogs/89816/2012/06/98951-96374.jpg
.

Pages

Subscribe to RSS - वैद्यकशास्त्र