लेखन

पावा....

Submitted by मुग्धमानसी on 5 February, 2013 - 06:42

निळंशार आभाळ... त्याखाली निळाशार खळाळणारा स्वच्छ समुद्र. समुद्राच्या लाटा केवढ्या उंच! सोनेरी मऊशार वाळूवर पाय पोटाशी घेऊन पाठमोरं बसलेलं कुणीतरी. समुद्राकडे बघत. तीचं शरीर कमनीय. अंगावर रेशमी वस्त्र. मोकळे लांबसडक काळेभोर केस थेट वार्‍याशी गप्पा करणारे. डाव्या खांद्यावरून हवेत बेदरकारपणे उडणारा निळाशार पदर. ती हलत नाही, डुलत नाही. युगानुयुगे पुतळ्यासारखी ती जणू तिथंच थांबून राहिली आहे! थोडं पुढे होऊन तिला हलवुयात का? कोण बाई तु? कुठुन आलीस? इथे अशी का बसलीयस? विचारावे का? तिच्या दिशेने थोडेसे पाऊल पुढे टाकावे तर.... पोचलो तो थेट....

शब्दखुणा: 

रोमानियन स्त्रीचे जागतिक स्तरावरील स्थान

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 4 February, 2013 - 13:49

१९७६ मध्ये पहिल्यांदाच घरातल्या tv वरून मोंट्रियल येथील ऑलिम्पिक खेळांचं प्रसारण पाहताना अंगावर रोमांच आले होते !
आणि त्यातही ‘अनईव्हन बार्स’चा डोळ्याचं पारणं फेडणारा performance-एका छोट्या –केवळ १४ वर्षांच्या मुलीचा !
जजेसनी तिला ‘परफेक्ट टेन’ दिले होते !

विषय: 

लाल पेरू

Submitted by सुज्ञ माणुस on 4 February, 2013 - 06:34

लाल पेरू

"अरे, मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ." असे म्हणत मित्राने मला जवळ जवळ ओढतच दुकानात नेले. मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता. त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार नाही म्हणून दुःख हि झाले होते.त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो.

एअर पोर्ट

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 4 February, 2013 - 02:34

एअर पोर्ट

मार्च २७ , १९९२ ! माझा पहिला परदेश प्रवास ! अरुणच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही भारत सोडून निघालो होतो परदेशी वास्तव्यासाठी . उत्सुकता , काळजी , थोडी भीती आणि खूप सारा आनंद होता या प्रवासात . ९ तासांचा विमानप्रवास – तोही पहिल्यांदाच केलेला !पहिल्यांदाच झालेले आकाशातून मुंबापुरीचे आणि भारताचे रम्य दर्शन. आणि मग आकाशातून – ढगांतून केलेला मुक्त प्रवास !मी जणू तरंगत होते- मंतरलेल्या जगात !

विषय: 

गुलमोहोर

Submitted by योगितापाटील on 4 February, 2013 - 02:25

डोळ्यांसमोर असणारा गुलमोहोर
दिसला कसा नाही मला इतके दिवस?
त्याचा लाल,भरगच्च बहर आजच का येउन भिडला डोळ्यांना?
बरोबर.....
आजच ऐकवलस ना तू मला गाण...
गुलमोहोर गर तुम्हारा नाम होता....
तेंव्हापासून प्रेमातच पडलेय बघ त्या गुलमोहोराच्या
तू नसलास ना तरी....तो असतो रोज डोळ्यांसमोर
तासन तास गप्पा चालतात माझ्या त्याच्याशी
सुखावत राहतो त्याचा बहर डोळ्यांना
आणि तू आल्यापासून तसाच बहर
माझ्याही आयुष्यात आलाय याचीपण जाणीव करून देत राहतो बघ
तू मनात भरून राहतोस ना तसाच.....
अगदी तसाच
तोही भरून राहतो मनात
देत राहतो मला उर्जा तशीच ....
जगण्याचा दिलासा.....
थोडासा गारवा....

विषय: 

गणेशोत्सव-बुखारेस्टमधला !

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 2 February, 2013 - 12:32

"अगं मारिया, उद्या अनंत चतुर्दशी. दयाळ काकान्कडे जायचंय उद्याचे नैवेद्याचे मोदक करायला. येतीयेस ना?" माया फोन वर आपल्या चेक मैत्रिणीशी बोलत होती (चेकोस्लोवाकिया ह्या देशाचे स्लोवाकिया व चेक रिपब्लिक असे विभाजन झाले.)

"आटोपलं आहे माझं, माया. आता निघतेच आहे. मोदक झाल्यावर मुलींना शाळेतून आणायला जाऊ." असं म्हणत मारियाने रिसिव्हर ठेवला. बुखारेस्टला आल्या पासून गेली चार वर्षे ती नैवेद्याचे मोदक करायला दयाळ काकांकडे जात असे.

विषय: 

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

Submitted by तुमचा अभिषेक on 2 February, 2013 - 02:54

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खरे तर नावातच ऑर्कुट असल्याने हे वेगळे सांगायला नकोच, तरी साधारण २००७ सालाची असावी. नक्की महिना आठवत नाही पण वातावरणनिर्मितीसाठी थंडीचा पकडून चला. मी २००६ साली कॉलेज पासआउट होऊन माझा पहिलाच जॉब करत होतो, ज्याला साधारण वर्ष झाले होते आणि आयुष्यात बर्‍यापैकी आर्थिक स्थिरता आल्याने सामाजिक गरजा भागवायला म्हणून ऑर्कुटवर पदार्पण केले होते. त्यामुळे तसा मी ऑर्कुटवर अगदी नवाकोराच होतो. आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो, पण तेव्हा दोन कवडीचा सामान्य ऑर्कुटर्सही नव्हतो.

विषय: 

प्रेम करणं सोपंच असतं...!!!

Submitted by मुग्धमानसी on 1 February, 2013 - 00:23

प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतं एक मन
मनात थोडं ओलं काही
बीज कुणाचे रुजेल सहजी
अशी कोवळी जमिन काही
नातं रुजणं, उमलुन येणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतो एक पाट
पुजेचं ताम्हण नी नैवेद्य ताट
रिकामा गाभारा करावा स्वच्छ
सोवळ्या आशेची तेवावी वात
देवाचं येणं, श्रद्धेचं रुजणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतं एक घर
भिंती नसल्या तरी चालेल
घरापुढच्या अंगणात
कुणीही येऊन रोप लावेल
घर भरणं, बहर फुलणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतं एक आभाळ
गद्गदणारं, गुदमरणारं
फक्त एका हाकेसाठी

शब्दखुणा: 

उपाय

Submitted by छायाचित्रकार on 31 January, 2013 - 23:53

पहाटे सारं शहर
चांदण्यांची चादर लपेटून
निपचीत पसरून गेलेलं
...
त्याची पावलं मात्र त्या जीवघेण्या थंडीत
आसरा शोधत पुन्हा पुन्हा
स्वतःची समजूत घालत होती...
अखेर थोडीशी उब मिळालीच त्याला
एक एक चित्र राख होत राहिल
सुर्य ऊगवे पर्यंत .....

विषय: 
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - लेखन