लेखन

भुले बिसरे धागे

Submitted by मार्क ट्वेन on 16 August, 2013 - 11:01

या संस्थळावर आत्तापर्यंत चाळीसेक हजार धागे आलेले आहेत. मात्र मायबोलीवर जुनं लिखाण बघण्याची तितकीशी चांगली सोय नाही(माझ्या माहितीप्रमाणे). काही ठराविक दिवसांमागे जाण्याची सोय उपलब्ध नाही.
बर्‍याच वेळा गप्पागोष्टींचे धागे, किंवा अमक्यातमक्या ठिकाणचे मायबोलीकर अशा प्रकारच्या धाग्यांच्या गदारोळात चांगले वाचनीय लेख, ललित लिखाण, कविता इत्यादी धागे बघताबघता मागे जातात. तसेच अतिशय चांगले जुने धागे नव्या सदस्यांना तितकेसे सहजी सापडत नाहीत.

विषय: 

मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार

Submitted by दिनेश. on 15 August, 2013 - 05:30

मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार - हे एका पुस्तकाचे नाव आहे Happy
संपादक - अभ्यासक अ. द. मराठे, ग्रंथाली प्रकाशन.
हे पुस्तक विदुषी दुर्गा भागवत यांना अर्पण केले आहे आणि हे संपादनही त्यांच्याच मार्गदर्शनाने झाले आहे.
त्यामूळे हे लेखन पुरेश्या गांभीर्याने झाले आहे.
संपादकांच्या सांगण्यानुसार त्यांना दुर्गाबाईंनी असा सल्ला दिला होता कि त्यांना अश्या म्हणी, जास्त करुन स्त्रियांकडूनच मिळतील. त्यांना तश्या त्या मिळाल्या पण त्या स्त्रियांनी त्यांचा नामोल्लेख करु नये, असे त्यांना
सांगितले होते.

धाडस ___ शतशब्दकथा

Submitted by तुमचा अभिषेक on 14 August, 2013 - 11:51

लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता..
मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते..
त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू..
खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती..

इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला..
काही काळासाठी सार्‍यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला..
वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!!

थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती..
इतक्यात कोणीतरी अ‍ॅम्ब्युलन्स आली म्हणून आवाज दिला..

विषय: 

कदाचित हे असंच असेल सगळीकडे...

Submitted by मुग्धमानसी on 14 August, 2013 - 08:28

तुला वाटतं तसंच कदाचित हे असंच असेल सगळीकडे...
तुला वाटतं... माझी तगतग, चिडणं, उद्रेक, संताप... अगदी नैराश्यही... अगदी नॉर्मल आहे.
काळजी करण्यासारखं काहिही नाही...
या सगळ्यातून जाऊनही... सगळी नाती टिकतातच की! आपलंही टिकेल.
सवयीनं हळूहळू मीही शिकेनच सगळं स्वीकारणं... तुलाही.
खरंय तुझं.

पण टिकवण्यासाठी ओतलेल्या भरभरून अश्रुंनी खारट झालेलं हे नातं...
चाखता येईल आता कधी असं वाटत नाही.

असो.
हेही असंच असेल कदाचित सगळिकडे!

पीएचडी पुराण - भाग १ :- पीएचडी म्हणजे काय?

Submitted by विजय देशमुख on 14 August, 2013 - 03:28

"सुटलं का तुमचं पीएचडी?" सासुबाईंच्या मैत्रीणीनं विचारलं अन मी जेलमधुन बाहेर पडलो की काय असं मला वाटुन गेलं.
एका अर्थाने तेही काही चुकीचं नव्हतं. पीएचडी केलेल्या अन करणार्‍या प्रत्येकाला असच वाटत असावं. पण पीएचडी म्हणजे नेमकं काय, याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत.
"आता तू पीएचडी करणार म्हणजे तुला नोबेल मिळणार का?" मला अ‍ॅडमिशन झाली तेव्हा माझ्या भाचीनं विचारलं होतं. तिला लहानपणापासुन नोबेल लॉरेटच्या गोष्टी सांगण्याचा परिणाम असावा.
"भाऊ मग तुम्ही नेमकं काय करणार आहे, पीएचडी म्हणजे एकदम धासू काम असेल ना"
"हां. मी लेजरवर काम करणार आहे."
"पण त्याचा तर खूप वास येत असेल ना"

शिव श्रावण आणि आपण

Submitted by अनिल तापकीर on 13 August, 2013 - 09:24

नमस्कार सज्जनहो, सध्या श्रावण महिना चालू आहे सर्व साधकांसाठी पर्वकालच जणू या महिन्यात कुठल्याही देवतेची केलेली साधना अधिक फलदायी असते. परंतु त्यातल्या त्यात हा श्रावण महिना भगवान शिवशंकरासाठी खूपच महत्वाचा मानला जातो .
नेहमी म्हणजे रोजच्या जीवनात प्रत्येकजण 'जो आस्तिक आहे तो' सकाळी स्नानानंतर पूजा जमली नाही तर देवाला नुसता नमस्कार का होईना करूनच घराच्या बाहेर पडतो.
परंतु श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या या कृतीत जास्त सुधारणा होत असते. म्हणजे उपवास किंवा ठराविक दिवशी देवाला जाऊन येणे आदी. जमले तर एखाद्या सद्ग्रंथाचे वाचन आणि दिवसातून जमेल तसे देवाचे नामस्मरण अश्या गोष्टी आपोआपच होतात.

विषय: 

वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा

Submitted by तुमचा अभिषेक on 9 August, 2013 - 12:04

सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच..
निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते..

कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले...
आणखी काय लागते..!

गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता..
यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली..

टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला..
अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते !

ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली..
पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..

विषय: 

गुणगुणारा भोवरा

Submitted by मधुरा आपटे on 9 August, 2013 - 07:01

दोस्तांनो तुमची शाळा किती छान आणि रंगेबीरंगी असते की नाही? सगळीकडे छान छान चित्र, त्या चित्रातले छान छान रंग, मस्त असतात नै? पण तुमच्या शाळेत एक खास गोष्ट असते. कोणती माहिती आहे? खेळण्यांचं कपाट! वेगवेगळी खेळणी त्या कपाटात असतात. ससे असतात, बाहूल्या असतात, भातुकली असते. हो की नाही? पण ह्या गोष्टीतल्या कपाटात काय आहे माहिती आहे? गुणगुणारा भोवरा. एका पायावर फिरणारा, लाल, जांभळ्या आणि पिवळ्या रंगाचा तो भोवरा कपाटातल्या सगळ्या खेळण्यांचा खूप लाडका होता. एका पायावर फिरताना तो गुणगुणायचा. आणि ते त्याचं गुणगुणं सगळ्या खेळण्यांना फार आवडायचं.

विषय: 

विषय क्रमांक २ :- स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - स्वातंत्र्यवीर सावरकर

Submitted by अनघा कुलकर्णी on 8 August, 2013 - 11:24

विषय क्रमांक २ :- स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - स्वातंत्र्यवीर सावरकर

“धगधगत्या ज्वाला पेटवून ह्र्दयात,
स्वातंत्र्य चे स्वप्न पाहिले क्रांतिविरांनी त्यात ,
कितीएक प्राणाच्या आहुत्या पडल्या ,
त्या स्वातंत्र्याच्या महासंग्रात ”

ब्रिटीशांच्या तावडीतून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणपणाने लढा दिला, त्या क्रांतिवीरची नावे किती घेणार ?
मंगल पांडे, गांधीजींना सत्य, अहिंसा, प्रेम मार्गें स्वातंत्र हवे होते .

विषय: 
शब्दखुणा: 

मी अता तुला हे निर्वाणीचे सांगणार आहे!

Submitted by मुग्धमानसी on 8 August, 2013 - 07:36

मी अता तुला हे निर्वाणीचे सांगणार आहे!
नकोस लागू नादी माझ्या बजवणार आहे!

असोत ते जे तुला मस्तकी धरून करती पूजा
मी मात्र तुला नेहमी उशाशी ठेवणार आहे!

पटूदे अथवा न पटो तुजला माझे हे जगणे
हाच श्वास बघ तुझ्या गळीही उतरणार आहे!

तू काटे दे वा उन्ह, वादळे, चटके दे मजला
तरी शेवटी मीच तुला बघ दमवणार आहे!

तुझे नियम पाळूनही जेंव्हा मी ठरते खोटी
त्या नियमांवर तुला लादूनी पळवणार आहे!

धाव धाव रे आयुष्या जा माझ्यापासून दूर
अखेर तुला मी त्या वळणावर गाठणार आहे!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन