लेखन

हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..

Submitted by दुसरबीडकर on 7 September, 2014 - 08:26

पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो..
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!!

म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!

सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!

नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!

इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७

निर्मल - मलाही कोतबो: भागीरथी गोखले

Submitted by निर्मल on 5 September, 2014 - 12:34

केव्हापासून बोलायचय मला. तसं बोलत असतेच म्हणा मी नेहमी आणि सगळे चुपचाप ऐकत सुद्धा असतात. पण हे बोलणं त्यांच्याजवळ नाही बोलता येत. त्यांच्याजवळ म्हणजे आमच्या कुटुंबातले हो. एवढं मोठं कुटुंब आहे आमचं. दोन मुलगे, एक मुलगी, तीन सुना, एक सुनेची बहिण, एक नातू, एक नातसून आणि आमचा गृहउद्योगाचा पसारा.

विषय: 

४८ तास

Submitted by सुबोध खरे on 1 September, 2014 - 11:13

हि गोष्ट माझ्या मित्राची आहे.(सर्जन लेफ्टनंट शिवा नायर याने प्रत्यक्ष अनुभवलेली.)ऑपरेशन ब्रासटांक्स १९८६-८७ मधील गोष्ट आहे. हा लष्करी सराव दुसर्या महायुद्धानंतर झालेला सर्वात मोठा सराव होता.तो नौदलाच्या शंकुश या HDW कंपनीच्या जर्मन पाणबुडी मध्ये डॉक्टर म्हणून पोस्टेड होता.त्या सरावासाठी त्यांनी ती पाणबुडी मुंबई बंदराच्या बाहेर काढली आणि त्यानंतर ते पाण्याखाली डुबकी मारून पाकिस्तान च्या दिशेने रवाना झाले.war patrol वर जेंव्हा पाणबुड्या जातात तेंव्हा त्या एक महिना भर पूर्ण पाण्याखालीच राहतात.

विषय: 
शब्दखुणा: 

इतकंच

Submitted by गण्या. on 31 August, 2014 - 03:31

हौस नाही आली

कविता लिहीत सुटायची

नक्षलवादी, अतिरेकी

बनायचं नव्हतं

मशीनगन घेऊन

सूड उगवायचा नव्हता

बस्स इतकंच..

च्यामारी !!!

गण्या

दरवळ

Submitted by गण्या. on 31 August, 2014 - 03:26

तुझ्या घरातून हल्ली

रातराणीचा गंध येत नाही पहाटे

ना मोगरा दरवळतो सकाळी

दुपारच्याला पारीजातकाखाली

सावली येत नाही

म्हणायला यातलं राह्यलंय काय ?

उध्वस्त बाग आणि रानगवत

पाऊल टाकलंच आत

तर चुरगळलेल्या मोग-याचा उग्र दर्प

आणि तुझ्या भकास चेह-याने

वाहीलेल्या लाखोल्या

हेच दरवळतंय इथं आताशा

सभ्य लोक हल्ली

टाळू लागलेत हा रस्ता

तू बदनाम झालीहेस बयो

पुन्हा एकदा

गण्या

चंद्रमोहन शर्मा त्याचा गुन्हा आणि तपास

Submitted by नितीनचंद्र on 29 August, 2014 - 23:51

चंद्रमोहन शर्मा कालच्या आणि आजच्या क्राईम रिपोर्ट मधे झळकतो आहे त्याच्या कृष्ण कृत्यांच्या यादीमुळे. हिचकॉक ला लाजवेल असा हा प्लॅन केवळ बायकोला सोडुन गर्लफ्रेंड मिळावी इतकाच नव्हता तर बायकोला पोटगी द्यायला लागु नये. पहिल्या बायकोला अनुकंपा तत्वावर आपल्या कंपनीत नोकरी मिळावी. कंपनीकडुन विम्याची रक्कम मिळावी यासाठी त्याने एका माणसाला कारमध्ये ठेऊन ती पेटवुन दिली.

लग्न

Submitted by सारंग पात्रुडकर on 28 August, 2014 - 23:40

लग्न ही लग्न जमलेल्या जोडप्यांसाठी खास बाब आहे.
एकदा लग्न निच्शित झालं की पुरुषांच्याही मनाला पंख फुटतात, दोघेही वेगळ्या विश्वात प्रवेशतात, खचितच त्यांना व्यावहारीक जगाचं भान उरते आणि ठरवुनही ते त्यामधुन बाहेर पडु शकत नाही.

पुरुषासारखा पुरुष हळवा बनतो, कंजुसही अगदि कर्ण होतो तिच्यासाठी.
त्याच्यामनाचे कधीहि समोर न आलेले नाजुक कंगोरे उलगडतात. नकळत तो तिला काय वाटेल, आत्ता तिच्या इथे असण्याने अजुन मजा येईल असे विचार करायला लागतो किंवा ती नसेल तर काही करायची इच्छाच उरत नाही.

शब्दखुणा: 

ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा

Submitted by BMM2015 on 28 August, 2014 - 09:58

BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे

अधिवेशन गीत स्पर्धा

हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे.
गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी.

विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
निवडलेले गीत अधिवेशनात वाजवले जाईल, तसेच अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी / promotionसाठी वापरले जाईल

वर्धमान ते महावीर

Submitted by राज जैन on 28 August, 2014 - 02:03

सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले...

प्रेमाच दुखणं

Submitted by सत्यजित on 26 August, 2014 - 02:06

इतकी साधी सरळ गोष्ट
इतकी अवघड होउन बसते
रोजच तर बोलतो आम्ही
आजच का ती इतकी हसते?

सहजच हसता हसता
सहजच हाती देते हात
सहजच सहजच म्हणता म्हणता
वणवा पेटतो खोल आत

सहजच सहजच म्हणते ती
पण इतकं काही सहज नसतं
मेंदू छाती ह्रुदय या हून
मन काही तरी वेगळच असतं

का हा मनीचा नवा छंद
की हा मनीचा चाळा आहे
तिच्या आठवांच्या तरू खाली
स्वप्नांची भरली शाळा आहे

माझच मला कळतय की
हे माझ असं होऊ नये
आणि समजुन उमजुन झालं
तर प्रेम त्याला म्हणू नये

पण सांगाव तरी तिला कसं?
एकवार वाटतं होईल हसं
सांगुन टाकलं जरी कसं बसं
नाही म्हणाली तर होईल कसं?

"TO BE OR NOT TO BE?"

Pages

Subscribe to RSS - लेखन