लेखन

राया...

Submitted by राजेंद्र देवी on 11 March, 2015 - 01:18

राया...

मखमली मंचकी पसरली, मखमली काया,
नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥

करून बसले मंचकी थाट
किती दिवस पाहिली वाट
उगवेल आता चैत्री पहाट
सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट
अत्तराच्या लावल्या या समया
नका सोडून जाऊ.... ॥१॥

ल्याले शालू भरजरी
देह झाला आज शेवरी
ठेवा बाजूला तुम्ही शेला
घ्या अलगद कवेत मजला
जाईल ज्वानी माझी वाया
नका सोडून जाऊ.... ॥२॥

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

वेळ

Submitted by प्रतिनिमि on 10 March, 2015 - 08:47

"आदित्य..., ऐ आदित्य, आदित्या....."

"काय आहे ग" laptop वरून लक्ष न हटवता आदित्य बोलला.

नेहा खूप आनंदात स्व:त बनवलेला एक नवा पदाथ घऊन आली होती. आदित्यला प्रेमाने भरवण्यासाठी. पण आदित्यच नीट लक्षच नव्हता. नेहा हिरमुसली.

आदित्य एक software engineer होता. नामांकित कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्या वर काम करत असलेला. आदित्य नेहा ला वेळ च देऊ शकत नव्हता. घरी सुद्धा तो ऑफिस ची काम करत बसलेला असायचा. नेहाशी त्याच एक वर्षापूवी लग्न झाल होत. पण आजून हि ते दोघे एकमेकांना अपरिचितच होते आणि औपचारिक बोलायचे. आदित्य दिवसभर स्व:ताच्या कामा मध्ये व्यस्त असायचा.

वेळ

Submitted by प्रतिनिमि on 10 March, 2015 - 08:38

समुद्रकिनार्‍यावरची भयानक रात्र

Submitted by स्वीट टॉकर on 10 March, 2015 - 06:17

माझी सुट्टी संपून बोटीवर परत जायची वेळ जवळ येत चालली होती. तेव्हां मुलीला (पुनवला) तिच्या ट्रेनिंगमधून अनपेक्षितपणे पंधरा दिवसाची सुट्टी मिळाली. पत्नीचा (शुभदाचा)स्वतःचा व्यवसाय असल्यानं तिचं वेळापत्रक तिच्याच हातात होतं. शांत ठिकाणी एखादा आठवडा मजेत एकत्र घालवावा असं ठरवून एका लोकप्रिय कंपनीच्या ‘कोस्टल कर्नाटक’ च्या कन्डक्टेड टूरमध्ये सामील झालो. सगळे मिळून चाळीस जण असू.

अपेक्षे प्रमाणे मला दरवळू दे !

Submitted by शशिकांत on 10 March, 2015 - 03:39

गजल....
अपेक्षे प्रमाणे मला दरवळू दे !
मला जे हवे ते तुलाही कळू दे !!

सुन्या मैफिली या जरी सोबतीला,
तिच्या आठवांनी दिवस हा ढळू दे !!

तिचे स्पर्श माझ्या उरी साठलेले,
तिचे हात हाती पुन्हा सळसळू दे !!

नको दु:ख देवू दिलेल्या फुलांना,
मनाने मनाला कितीही छळू दे !!

फिरोनी मला ती पुन्हा साद घाली,
मलाही जरासेच मागे वळू दे !!

जरी एकटा देह माझा चितेवर ,
तिच्या आसवांनी सरण हे जळू दे !!
-शशिकांत कोळी (शशी)

विषय: 

गजल...

Submitted by शशिकांत on 10 March, 2015 - 03:26

गजल...
ते भावतील डोळे पाणावतील डोळे !!
हलकेच ओलसर मग रागावतील डोळे !!
तेव्हा तिला न कळले माझ्या मनातले रे,
यादेत आज माझ्या ताणावतील डोळे !!
कैफात या सुडाच्या ते घालतील दंगा,
नजरेतली करारी मग दावतील डोळे !!
शोधू नकोस आता मजला उगाच तेथे,
वाटेवरी पुन्हा त्या ओलावतील डोळे !!
परदा नकोस ओढू डोळ्यांस घातलेला,
विसरून लाख दु:खे नादावतील डोळे !!
- शशिकांत कोळी (शशी)

विषय: 

एक शून्यं

Submitted by राजेंद्र देवी on 9 March, 2015 - 04:17

एक शून्यं

ना जिंकलो मी, ना हरलो मी,
उरलो मात्र एक शून्यं मी

या जगात एकमात्र आहे तुझी किंमत
तुझ्याविना माझी मात्र एक शून्यं

तुझ्या पुढे असतो जेव्हा शून्यं म्हणुनी
वाढते तुझी किंमत दहादा वा हजारदा

तुझ्या मागे मात्र असेल तेव्हा
फक्त भले मोठे एक शून्यं

या शून्यं जगात एक मात्र तुझाच आधार
शून्याशिवाय जग मात्र निराधार

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

‘थक्क, थुंय्य !!

Submitted by bnlele on 9 March, 2015 - 01:41

‘थक्क, थुंय्य !!
आज धुळवड ! एकाकी आयुष्यात भूतकाळातील आठवणी पींजून काढणं हा हमखास विरुंगळा.
ढगाळ वातावरण. आजुबाजूला निरव शांतता. थंडीमुळे सणाची सुरवात नक्कीच उशिरानी होणार.
बाहेर तर पडायच नाहिए, रंग केव्हांच उडून गेलेत अन्‌ परत भरणारही नाहीए. फक्त आठवणींचा
पींजा उडणार - धुरकट-मळकट, मन व्यापून टकणार्र ! धनुष्याच्या तांतीवर घासटून आदळणार्‍या
घोट्याच्या धुंद तालावर __ थक्क_थूंय्य !
दिवा लावून संगणकावर आठवणी पिंजायच ठरवल. जवळची खिडकी उघडली. आजकाल कुठलाही संदेश न आणणारी
कबुतर थैमान घालतात म्हणून बंद ठेवलेली. सैरावैरा वाढलेल्या कडुलिंबाची कोवळ्या पानांची फादी

स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.

Pages

Subscribe to RSS - लेखन