लेखन

पहाट

Submitted by bnlele on 4 May, 2015 - 01:24

पांघरून चांदण्यांची चादर,
स्वप्न सुगंधी असे उशीला,
मोरपिसांची ढाळी चंवरी,
खट्याळ-मिश्किल मंद वारा.

क्षितिजावर्ती किल्बिल किरणे
चिमण्यांचे अ‌न्‌ चिवचिव गाणे,
सुवर्णरथाचे खळखळ हंसणे,
तल्लीन स्वरांची ती भूपाळी
कुणी गातसे नित्य सकाळी

सूर्य-चंद्र असता साक्षिला
दुरून खुणा कां करते मजला?
भावफुलांची करून उधळण,
सत्वर सुचावे काव्य मनाला,
टिपू नये ती घार क्षणाला !

विषय: 
शब्दखुणा: 

पहाट

Submitted by bnlele on 4 May, 2015 - 01:24

पांघरून चांदण्यांची चादर,
स्वप्न सुगंधी असे उशीला,
मोरपिसांची ढाळी चंवरी,
खट्याळ-मिश्किल मंद वारा.

क्षितिजावर्ती किल्बिल किरणे
चिमण्यांचे अ‌न्‌ चिवचिव गाणे,
सुवर्णरथाचे खळखळ हंसणे,
तल्लीन स्वरांची ती भूपाळी
कुणी गातसे नित्य सकाळी

सूर्य-चंद्र असता साक्षिला
दुरून खुणा कां करते मजला?
भावफुलांची करून उधळण,
सत्वर सुचावे काव्य मनाला,
टिपू नये ती घार क्षणाला !

विषय: 
शब्दखुणा: 

नभनाट्याचा थरार

Submitted by bnlele on 4 May, 2015 - 01:04

नभनाट्याचा थरार ...

काल विश्वात शुक्र आणि सूर्यानी घडवला तो थरार प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही.
नासानी केली भरपाई आणि टीव्हीवर दाखविलेल्या फिति बघता आल्या.
जगातल्या विभिन्न देशांमधे वेगवेगळ्या रंगाचा सूर्य दिसला- कुठे हिरवा तर कुठे लाल,
शेंदरी,धुरकट पांढरा, निळा,पिवळा असे अनेक रंग !
कुठे तो लाल-काळ्या चट्ट्यांनी वेढलेलाही दिसला, किंवा त्य्यावर काळे डाग दिसले.
भरतात मात्र काहीच जागी ढगांतून डोकावला- ढुअरकट आणि काळा डाग असलेला.
ती दृष्य बघताना विविध रंग आपल्याकडे दिसले नाहीत याची खंत होती-- पण ...
एका क्षणात, कां घडल असं याचा खुलासा पण चमकला.

विषय: 

लोकल डायरी -- १२

Submitted by मिलिंद महांगडे on 3 May, 2015 - 09:38

अँटी व्हायरसच्या एंगेजमेंटची बातमी कोपऱ्यात लपून बसून ओरडत असलेल्या रातकिड्यासारखी माझ्या डोक्यात वाजत राहिली. त्याने मला जास्तच अस्वस्थ वाटू लागलं . डोक्यातून तिचा विचार जाता जाईना . मुश्किलीने एक मुलगी आवडली होती , पण त्याचा आता काहीच उपयोग नव्हता . आपलं म्हणून बिनधास्त शिरावं आणि ते दुसऱ्याचं घर निघावं असं झालं होतं . माझ्याच बाबतीत असं का व्हावं ? नशीबच खराब आपलं ... ! मी माझ्या नशिबाला शिव्या देत स्टेशनच्या दिशेने निघालो . चालता चालता माझ्या डोक्यात सहज विचार आला , आपण किती दिवस अँटी व्हायरसला पहात होतो ...?

विषय: 

तडका - संवाद गायी-बाईचा

Submitted by vishal maske on 2 May, 2015 - 21:29

संवाद गायी-बाईचा,...!

एकदा गायी म्हणाली बाईला
माझ्यापोटी ३३ कोटी देव आहेत
जिथं तुला किंमतच नाही तिथेही
आम्हा गायींच्या उठाठेव आहेत

मग बाई पण म्हणाली गायीला
हा माझ्या नशिबाचा दोष नाही
पण माणसांच्याच कुकर्माचा
इथे माणसांनाच होश नाही

आज जे तुला किंमत देतात
त्यांनीही मोठा जुल्म केलाय
विसरले आहेत की त्यांनाही
एका बाईनंच जन्म दिलाय

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - मान-पान

Submitted by vishal maske on 1 May, 2015 - 11:09

मान-पान,...!

संधीचा लाभ घेण्यासाठी
हळदीने पिवळे असतात
मान-पान मिळावा म्हणून
सारेच उतावळे असतात

मान-पान मिळवण्यासाठी
अतोनात धडपडू शकतात
तर कधी माना-पानासाठी
नाराजीनाट्यही घडू शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - महाराष्ट्र माझा

Submitted by vishal maske on 30 April, 2015 - 22:40

महाराष्ट्र माझा

घडले कित्तेक पराक्रम
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये
किंचितही ना पडला मागे
जगाच्याही या गतीमध्ये

या महाराष्ट्रातल्या किर्तीचा
जगभरातही पडघम आहे
असाच होईल गौरव सदैव
अहो या मातीतच दम आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गझल

Submitted by मोहन ब. शिंदे on 30 April, 2015 - 04:17

इथे..
चालले आयुष्य आहेच साधारण इथे
काय घेवू मोजमापे, विनाकारण इथे..

वाटेवरी थांबली सावलीपेक्षा उन्हे
ठेवते नियती कुठे दुःख हे तारण इथे..

सरळ मार्गाची किती ही पराकाष्ठा तुझी
ऐकतो दुसरेच कां नांव उच्चारण इथे..

यायचा त्यांचा कुणी ओळखीचा राहिला
ते तुला करतील कां सांग पाचारण इथे..

हा असा हळवेपणा.. हा तुझा साधेपणा
थांबवेना हे तुझे मुक्त संचारण इथे..

तो असो वैशाख किंवा असो श्रावण कधी
कर दयाळा वाटते रूप जे धारण इथे..

------मोहन ब. शिंदे

विषय: 

लोकल डायरी -- ११

Submitted by मिलिंद महांगडे on 29 April, 2015 - 13:54

http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html --- लोकल डायरी -१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html --- लोकल डायरी - २
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html --- लोकल डायरी - ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_8.html --- लोकल डायरी - ४
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_10.html --- लोकल डायरी - ५
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html --- लोकल डायरी - ६

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन