लेखन

बकुळाबाय

Submitted by धनुर्धर on 3 June, 2015 - 06:09

"काय नानीआजी काय चाललय?" एका हातात मिसरीची पुढी घेऊन बकुळाबायने घरात पाऊल टाकले तसा शिकार् या कुत्रा थोडासा गुरगुरला. "बकुळे तु हायेस व्हय. एवढ्या सक्काळी काय काम काढल ग! ये हाडऽऽ" हे शेवटच 'हाड' कुत्र्याला करत नानीन बकुळबाईला विचारलं. "काय नाय जरा इस्तू हाय का चुलीत? ही मिसरी भाजायची व्हती"
"ये की बस". नानीन बसायचा पाट पुढे सरकवला आणि हातातील भाकर तव्यावर टाकली. बकुळाबायने पाट ओढला व "आय आई गऽऽ" करत पाटावर बसली.
"झाल्या का भाकरी थापून" बकुळाबाय मिसरीची पुडी सोडत म्हणाली.
"हे काय चाललंय" नानी म्हणाली.
"सखू कुठ दिसना?"

विषय: 

बिनधास्त जगा यार....

Submitted by योगेश चव्हाण on 2 June, 2015 - 01:36

मला नेहमी एक कुतुहुल आहे...
लहान मुल गोट्या...विटी दांडु..अस खेळत
असली की आपण त्यांना रागावतो...
त्याच्याहुन मोठी मुल चिंचा..आवळे ..पेरु..कैऱ्या.
.दगड मारुन पाडु लागली ..की आपण त्यांना
शिक्षा करतो..
तारुण्यात आलेली मुल..तारुण्यसुलभतेने प्रेमात
पडली की आपण त्यांना विरोध करतो...
मला एक समजत नाही...यातल काहीच ..कधीच
करायच नसत का??कींवा नक्की ते कोणत्या
वयात करायच असत..??का आपण स्वत: सोडुन
..इतरांनी ते करायच नसत??
त्या त्या वयात ..ते ते करण हे जर पुढची पिढी
बिघडण्याच लक्षण असेल ..अस वागण चुकीच
असेल..तर आपण श्रीकृष्णाच्या बाललीलांना
का नाही चुकीच मानत..??श्रीकृष्णाच्या

विषय: 

मायबोली वर प्रकाशित होणार्‍या लेख व प्रतिसादांची लांबी किती असावी?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 30 May, 2015 - 01:02

मायबोलीवर कुणी किती लांबीचा लेख अथवा प्रतिसाद प्रकाशित करावा असा काही नियम आहे का? प्रत्येकच बाबीत मर्यादा ही असावी लागते. भ्रमणध्वनी (मोबाईल) वापरून केल्या जाणार्‍या लघु संदेशात (स्मॉल मेसेज) ही मर्यादा १६० अक्षरांची असते. साधारण एवढीच मर्यादा ट्विटरसारख्या संकेतस्थळावर एका वेळी व्यक्त होण्याकरिता मिळते.

'फिक्शन' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

काही केल्या घरामध्ये ब्लेड सापडत नव्हतं. मी आधी बेसिनच्या वरचं कपाट उघडलं. मग कपड्यांचे कप्पे शोधले, स्वयंपाकघर शोधलं. घरामध्ये ब्लेड नव्हतंच. पण माझा चडफडाट झाला नाही. घरामध्ये ब्लेड नसणं स्वाभाविकच होतं, कारण धारदार पात्याचं चकाकणारं ब्लेड आपण हल्ली कशाला वापरतो? दाढी करताना सेफ्टी रेझर्स वापरतात, ज्यामुळे त्वचेला इजा पोहोचत नाही. हरकत नाही. मी चपला चढवल्या आणि लिफ्टमधून एकेक मजला पार होताना बघत खाली जायला लागलो. मी त्या दिवशी निळी शॉर्ट आणि काळा टी-शर्ट घातला होता हे मला उगीचच लक्षात आहे.

विषय: 
प्रकार: 

उदासिन मध्यंतरं...

Submitted by मुग्धमानसी on 29 May, 2015 - 04:31

ही अशी उदासिन मध्यंतरं यापुढे टाळुयात आपण!
वेळ खुप कमी आहे आणि करण्यासारखं, भोगण्यासारखं खुप जास्त!

माझ्या असण्या-नसण्यावर तुझ्या विचारांची प्रक्रीया अवलंबुन नाही. तुझ्या डोक्यातली विचारांची प्रयोगशाळा अशीच निरंतर कार्यरत राहणार. माझ्या नसण्याने किंवा गप्प असण्याने ती काही थांबणार नाही.

पण विचार म्हणजे पाणी....! विश्वाचा फेरा केला तरी पाणी शेवटी पाण्याकडेच परततं... आणि जन्माला येण्यारा प्रत्येक विचारही अंती एका विचाराशीच जाऊन मिळतो! दरम्यानचे सगळे उतार, कडेलोट, खळगे, बांध, बाष्पीभवनं, कोसळणं, मुरणं वगैरे वगैरे... फक्त एक प्रवास! पाण्यापासून पाण्याकडे.... विचारांपासून विचारांकडे!

शब्दखुणा: 

खेळ काही आठवणीतले

Submitted by धनुर्धर on 27 May, 2015 - 08:41

लहानपणी आम्ही मुले जेंव्हा मातीत खेळत असू तेंव्हा मोठी माणसे ओरडत असत, "मातीत खेळू नका.रे" हल्ली च्या मुलांना 'मातीत खेळा' अशी म्हणायची वेळ आलीय. कारण कॉम्पुटर, मोबाईल, व्हिडीओ गेम्स या सगळ्यामध्ये मुले एवढी गुरफटली गेली आहेत की, त्यांचा या मातीतील खेळांशी काही संबंध उरलाय का? असा प्रश्न पडतो. या निमित्ताने लहानपणी खेळलेल्या काही खेळांच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. आमच्या गावात घर शाकारायच्या निमित्ताने घरावरची जुनी कौले काढून नवीन कौले टाकली जायची व जुनी कौले तिथेच रचून ठेवलेली असायची. त्या कौलाचा खालचा भाग खडबडीत असायचा. वरचा भाग सपाट व पुढे निमुळता होत गेलेला असायचा.

विषय: 

माझी आई

Submitted by rakhee_siji on 26 May, 2015 - 11:28

प्रत्येकासाठी आई हे अगदी जिव्हाळ्याचं स्थान असतं. प्रत्येकासाठी आई हे एक दैवतच असतं.
माझ्यासाठीही माझी आई म्हणजे प्रेम आणि जिव्हाळा आहे.
कशी आहे माझी आई? साधी भोळी आम्हा मुलांवर प्रेम करणारी आणि माझ्या पप्पांना कायमच साथ देणारी .

विषय: 

गट्टु भाग १

Submitted by संतोष वाटपाडे on 26 May, 2015 - 02:44

"गट्टु "
हातातली कपड्याची बाहुली फ़ेकून ती दुडुदुडु पुढे पळाली....मला भिती वाटत होती तिच्या नाजुकशा पायात खडे तर टोचणार नाहीत !! गोबर्‍या गालात हसू मावत नव्हते ...तांबूस भुरकट केस वार्‍याच्या झुळकीवर उडून कपाळावर आलेले पाहून ऊर भरुन आला होता....तीन वर्षाची झाली होती माझी गट्टू... काही दातही चमकायला लागले होते...

साप

Submitted by धनुर्धर on 24 May, 2015 - 12:50

आभाळात सुर्याला ताप आला होता. त्याची धग जमीनीपर्यत जाणवत होती. रस्ते तापले होते. एखाद्या दगडावर पाण्याचे चार दोन थेंब जरी टाकले तरी, त्याची क्षणात वाफ होत होती. गरमीमुळे अंगावर कपडे नकोसे झाले होते. वारा पडला होता. हास्सऽऽ हूस्स करत पाटोळे गुरूजींनी दरवाजा आत लोटला व ते आत जाऊ लागले तोच फट् कन आवाज आला, पाठोपाठ गुरूजींची " आई ग ऽऽ" अशी किंकाळी एकू आली. त्यांचे डोके चौकटीला धडकले होते. इथे येऊन त्यांना महिना झाला होता. महिन्याभरात किमान दहा वेळा तरी त्यांचे डोके या चौकटीवर आपटले होते. दोनदा टेंगळे देखिल आली होती.

विषय: 

चिकतुळी

Submitted by धनुर्धर on 23 May, 2015 - 14:09

आमच्या शेताच्या थोडं पुढं गेल की एक डोंगराची रांग लागते. त्या डोंगरावर गेलं आणि आमच्या शेताकडे नजर टाकली की एक भलमोठं आंब्याच झाड नजरेत भरायचं तेच चिकतुळीच झाड. डोंगरावरूनच कशाला इतर कुठूनही त्या झाडाचा भारदस्तपणा नजरेत भरत असे. तसे बघायला गेल्यास आमच्या शेताच्या बांधावरील केळ्या आंबा सुद्धा खूप मोठा होता. पण चिकतुळीची गोष्टच वेगळी होती. तिच्या शेंड्याकडं बघायच म्हणजे मान पडायला व्हायची.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन