लेखन

तळमळ

Submitted by bnlele on 14 June, 2015 - 03:55

पोहोचलॉ नरकाच्या दारी- वाचली पाटी-
जागा नाही करू नका उगा दाटी
लायकी स्वर्गाची नाहीच पण तिथेही गर्दी
शहीद अन् शेतकरी वर्गाची -
अतिरेकींचे आणि पतसंस्थांचे बळी.
आलास कसा आजारी कि अपघाती /
मौन सांगे अपघाती- बनविता गोळ्या !
औषधी कि बंदुकीच्या ?
शिक्षा तर लागेल भोगावी
त्याच कारखान्यात बंदिवास कायम
जर होत्या बंदुकीच्या तर जाऊन बस
ए के ४७ च्या नळकांड्यात कर निकामी
तरच उद्धार संभव अन्यथा जा शिबिरात-
बिहार किंवा उत्तर प-रदेशात !
तळमळ आता थांबत नाही,
उपाय काही सुचत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

लोकल डायरी -- १६

Submitted by मिलिंद महांगडे on 13 June, 2015 - 04:33

ती खंत ...

Submitted by टीना on 11 June, 2015 - 13:13

परवा रात्री माझी रुममेट कम मैत्रीण ऑफिसमधुन आली . रात्री ११.३० १२ पर्यंत सतत फोनवर होती . एकुणच खुप वेगळी वागत होती . नेहमी घरच्यांसोबत बोलत असताना हसत खेळत ओरडत चालणार बोलणं त्या दिवशी गरजेपेक्षा जरा जास्तच शांत आणि गंभीर होत . सुरुवातच काय, कधी, कसं अश्या शब्दांनी झाली. काहितरी विपरित घडल्याचा स्पष्ट संकेत होता तो..

विषय: 
शब्दखुणा: 

'मोनोलॉग' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आज सकाळी तुमचं डेथ सर्टिफिकेट आणण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात गेलो होतो. हातातली कागदपत्रं छोट्या खिडकीतून आत सारल्यावर आतला कारकून मला म्हणाला, “कुठे जाळणार?” मी भांबावून जाऊन गप्पच राहिलो, तसा तो म्हणाला, ”बॉडी कुठे नेणारे जाळायला? वैकुंठातच ना?”

प्रकार: 

शाळा सुटली पाटी फुटली - पाउस

Submitted by सत्यजित on 9 June, 2015 - 00:39

शाळा सुटल्या पोरां सारखा
पाउस सैरावैरा धावला
शाळे मधल्या सरां सारखा
ढग त्यावर कावला

घाबरलेली पोरं मग 
पाना मागे बसली दडुन
खोड्या का अंगात थोड्या
खुदखुदता गेली पडुन

पोरी कशा साळसुद
तृणांवरती चिडीचूप
मुलांची मजा बघता 
खुदखुद करत त्याही गुडूप...

-सत्यजित.

तेजोमय स्वराकार - किशोरीताई आमोणकर

Submitted by आशयगुणे on 8 June, 2015 - 23:41

कुठलीही व्यक्ती भोवती घडणाऱ्या क्रियेला दोन प्रकारे सामोरे जाते. पहिला प्रकार म्हणजे ती क्रिया समजणे तर दुसरा प्रकार म्हणजे ती क्रिया अनुभवणे. समजण्याच्या क्रियेत आपल्या साथीला असतात शब्द. आणि आपण एका विशिष्ट भाषेत व्यक्त होतो. परंतु अनुभवण्याच्या स्थितीत आपल्या साथीला असतात बऱ्याच अनामिक भावना. आणि त्याच्या जोडीला असतात बरेच अमूर्त विचार आणि अगणित पैलू! त्यामुळे अनुभवण्याची स्थिती ही अधिक व्यापक आणि गूढ असते. उदाहरण द्यायचे झाले तर अशी कल्पना करूया की आपण एक रम्य भूप्रदेश पाहत आहोत. किंवा सूर्योदय होताना त्या ठिकाणी उपस्थित आहोत.

अंगणात माझिया ( आमचं खळं )

Submitted by मनीमोहोर on 6 June, 2015 - 13:20

मंजिरी, अगं निखिल किरकिरतोय का ग, जरा खळ्यात घेऊन बस त्याला म्हणजे शांत होईल ......
आता माजघरात आम्ही जेवायची पानं मांडतोय तेंव्हा सगळ्या मुलांनी खळ्यात जाऊन बसा ....
पोळ्या करताना गॅस जवळ उभं राहुन चिवचिवलयं अगदी, मी आता दहा मिनीटं खळ्यात जाऊन स्वस्थ बसतेय. ....
खळ्यात महादेश्वराच्या जीर्णोद्धारासाठी पंचायतीचे सभासद आलेत त्यांच्या साठी अमृत कोकम पाठवा.....

असं आमचं खळं ( कोकणात अंगणाला खळं हा शब्द प्रचलित आहे. ) घराचाच एक भाग असलेलं, घरापेक्षा ही अधिक वापरात असलेलं , सगळ्यांचचं लाडकं .... आमचं खळं

विषय: 
शब्दखुणा: 

पहिले प्रेम ….

Submitted by Vaishali Agre on 6 June, 2015 - 09:13

आज ऑफिस मधून लवकरच निघाले … दुपारी एका आलेल्या फोनेने फार भावूक झाले मी . माझ्या एका मैत्रिणीचा फोन होता परत त्या आठवणी ने मन भिजून गेल … बर नाही वाटत असे सागून निघाले ऑफिस मधून , सरांनी जरा नाराजीने परवानगी दिली .
घर ऑफिस पासून लांब , ट्रेन ने स्टेशन ला उतरून नंतर रिक्षा करून कसेबसे घरी आले . मला लवकर आलेले बघून आई ने काळजीने विचारले … "काय झाल , बर नाही वाटत का ? आज लवकर आली … आणी चेहरा असा का केला आहेस ?

विषय: 

Generation Gap

Submitted by प्रतिनिमि on 6 June, 2015 - 01:18

शाळा सुटल्याची बेल वाजली. सर्व मुले धावत बाहेर पडत होती पण सोहम मात्र रेंगाळतच शाळेबाहेर पडला. खरं तर त्याला घरी जाण्याची सुद्धा इच्छा नव्हती.
"सोहम, जरा थांब, माझी मम्मा आज तुला पण घरी सोडणार आहे" पाठीमागून शर्वरी बोलत होती. "अग कशाला, ड्राइव्हर काका आले आहेत."
"अरे हो पण मम्मानेच सांगितल आहे, तुला सांगायला. ती सोडणार आहे आज"
"अग पण....."
"ते काही नाही, तू ड्राइव्हर काकांना सांग तुम्ही पुढे जा"
"सोहम, मी बोलले आहे तुझ्या ड्राइव्हर काकांशी ते गेलेत घरी, चल आपण पण निघू" - सारिका टीचर बोलल्या.

दिवस...

Submitted by मुग्धमानसी on 5 June, 2015 - 03:44

दिवस संपून जाण्याचे
अणू-रेणू वितळण्याचे
उन्हाळे चिंब होताना
धगीला चेव येण्याचे!

दिवस भिजर्‍या स्वभावाचे
जरा हळवे कुढाव्याचे
जराश्या गार वार्‍याने
शहारे कुंद थिजण्याचे!

दिवस माझे न उरण्याचे
कुणा काही न कळण्याचे
तुझ्या गर्दीत हरवून मी
मुका एकांत जगण्याचे!

दिवस आजार स्वप्नांचे
दिवस आकार नसण्याचे
दिवस बेफाम वाटांनी
कुठेही ना पोहोचण्याचे!

दिवस बेभान गाण्याचे
उसास्यांचे नि पाण्याचे...
मने टाचून मेघांना
तुझ्या पाऊस होण्याचे!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन