लेखन

तडका - नाना,मकरंद

Submitted by vishal maske on 11 August, 2015 - 00:20

नाना मकरंद

या दुष्काळलेल्या माणसांना
त्यांनी माणूसकी वाटलेली आहे
या मातीतल्या त्या लेकरांची
मातीशी नाळ ना तुटलेली आहे

शेतकर्‍यांचे अश्रु पाहून
मन त्यांचं तळमळलं आहे
सरकारला जे कळलं नाही
ते नाना,मकरंदला कळलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

परेम कथा

Submitted by धनुर्धर on 9 August, 2015 - 01:49

माळाला जनावरं सोडून मी निवांत बसलो होतो. पावसाची भुरभुर चालूच होती. हिरव गवत भरपूर असल्याने जनावरं एकाच ठिकाणी चरत होती. मी तिथेच एका दगडावर ठिय्या दिला होता. येताना दोन मुठी भाजलेल्या शेंगा खिशात टाकल्या होत्या. एका हाताने छत्री धरत मी एक एक शेंग तोंडात टाकत होतो. त्या पावसाळी वातावरणात भाजलेले शेंगदाणे खाणे स्वर्गसुखाची अनुभुती देत होते. तेवढ्यात पायवाटेने एक छत्री वाकडी तिकडी होत माझ्याकडे येताना दिसली. तो जित्या होता. मी पटकन तिथे पडलेली शेंगांची टरफले पायाने दूर केली. हाताने तोंड पुसले, शेंगांनी भरलेला खिसा ठिकठाक केला.

विषय: 

शोषीत समाजातील आरक्षित वर्गाची वाटचाल, समाजापुढील आव्हाने आणि वास्तव

Submitted by खडी साखर on 8 August, 2015 - 12:08

प्रस्तावना : आरक्षित वर्गाच्या राजकारणाबद्दल बोलायचं तर आरक्षित वर्गाबद्दल बोलणं हे टाळता येण्यासारखं नाही. आरक्षित वर्ग हा असा वर्ग आहे की ज्याबद्दल उघड काही बोललं जात नाही पण सर्वात जास्त त्याविषयी खाजगीत बोललं जातं. त्याच चुकीचं किंवा बरोबर किती हे तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत त्यावर शांतपणे चर्चा होणार नाही.

विषय: 

मला गुरू भेटला...

Submitted by झुलेलाल on 7 August, 2015 - 03:39

मला गुरू भेटला!...

गुरुचे कोणत्याही रूपात दर्शन होते. म्हणजे, जटाभस्मांकित किंवा मस्तकामागे तेजोवलयांकित, गळाभर माळा, भाळी चंदनाचा टिळा, असेच गुरूचे रूप असले पाहिजे असे नाही...
जगातली, आसपासची चल वा अचल, सजीव वा निर्जीव वस्तूदेखील आपल्याला गुरुमंत्र देऊन जाते.
फक्त त्याच्या आकलनाची शक्ती हवी!
***-****-****
आज मी प्रयोगादाखल गुरुशोध सुरू केला, आणि माझ्याच मनातले हे माझे विचार मला तंतोतंत पटले.
.... मी विचार करत बसलो होतो. नजर निरुद्देशपणे जमिनीवर स्थिर होती.
तितक्यात एक मुंगी समोर आली. मला माझा विचार आठवला.
मुंगीच्या रूपाने गुरूच तर समोर आला नसेल?

रेघेवरची (ऑनलाईन) प्रेमकहाणी

Submitted by खडी साखर on 5 August, 2015 - 11:59

( ऑनलाईन प्रेमाची त-हा या ड्युएटमधून )

ती - जेव्हां मी पासवर्ड होईन
तो - तेव्हां मी लॉगिन होईन
ती - कॅची अकाउंट माझे
तो - खुषीने धरून ठेवीन
ती - मी तुला, तू मला
तो - चाटणखिडकीत भेटू
ती - रेघेवरी* हिरवा दिवा (*ऑनलाईन)
तो - पाहुन दिव्यांनी खेटू
ती - तासनतास मी बोलीन
तो - तेव्हां मी म्युटच राहीन
ती - जेव्हां मी पासवर्ड होईन
तो - तेव्हां मी लॉगिन होईन

ती - जेव्हां मी अबोल होईन
तो - तेव्हां मी सावध होईन
ती - जेव्हां मी सावध होईन
तो - तेव्हां मी अबोल होईन
ती - मी तुला, मी तुला
तो - नको ना काही सांगू
ती - बिझी का रे तुझा दिवा
तो - दुसरीशी झालोय लागू

खेडेगावातला तो तर शहरातली ती..

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 5 August, 2015 - 07:54

फ्रेंड लिस्ट मध्ये बरेच असतात ऑनलाईन, पण कोणाशीच बोलायची इच्छा नसते, बर्याच नवनवीन पोस्ट असतात पण नाही वाटत त्या वाचाव्या, कमेंट करावी.. होत अस कधी कधी ... कारण, वाटत असत ... फक्त आणि फक्त तिने किंवा त्याने रिप्लाय द्यावा. त्या एकाच व्यक्तीशी बोलायचं असत. खूप काही सांगायचं असत आणि बरच काही ऐकायचं असत. नेहमीच एका सारख्याच (विशिष्ट) वेळेला तीच ऑन लाईन येण हे माहित झालेलं असत त्याला, मग धडपड करून त्याच त्या वेळेला हजर होण आणि मग गप्पांच रंगत जाण... पाहिलेलं नसत दोघांनीही एकमेकांना पण तरीही विचारांचं जुळण जमलेलं असत. साधेसेच दररोजच्या आयुष्यातले तर विषय असायचे, कशाचाच कशाला ताळमेळ नाही..

विषय: 

मिठातले आवळे

Submitted by राफा on 5 August, 2015 - 01:25

कु. कुंजलतिका तनमुडपे यांचे ‘आवळा: कृती व विचार’ हे पाककृतींपलिकडे जाऊन जेवणानुभूतीबरोबरच जीवनानुभूती देणारे खास नवगृहिणींसाठीचे पुस्तक लवकरच बाजारात येत आहे. ‘खल व बत्ते’ हे त्यांचे वायव्य महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडवून दिलेले पुस्तक वाचकांच्या ओळखीचे आहेच.

दोन्ही पुस्तके घेतल्यास २५% टक्के सवलत तसेच आवळकाठीचे एक पाकिट (लहान साईज) मोफत मिळेल.

सर्वत्र उत्सुकता निर्माण करणा-या ह्याच पुस्तकातील एक कृती खास तुमच्यासाठी.

मिठातले आवळे

साहित्य:

५० ग्राम काजू (नसल्यास भाजलेले शेंगदाणे चालतील)

शब्दखुणा: 

व्हॉटसप एक समस्या - अश्लीलता, राजकारण, बदनामी आणि अफवांचे पंढरपूर.

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 August, 2015 - 12:31

बेफिकीर यांचा व्हॉट्स अ‍ॅप हा लेख आज वाचण्यात आला. आवडीचा विषय म्हणून त्यावर सविस्तर प्रतिसाद लिहायला घेतला आणि तो फारच मोठा झाला. तर आता ‘लेखापेक्षा प्रतिसाद मोठा’ असा टोमणा सहन करायची ताकद माझ्यात नसल्याने हा स्वतंत्र लेख म्हणून प्रकाशित करत आहे. अर्थात यात काही वेगळे मुद्दे आहेत जे त्या लेखात नव्हते. त्यामुळे कोणाला चर्चा करायची असल्यास माझी हरकत नाही.

..................................................

मुख्य विषयाकडे वळण्याआधी सर्वप्रथम थोडे माझ्या व्हॉटसपगिरीबद्दल.

विषय: 
शब्दखुणा: 

लोकल डायरी -- २२

Submitted by मिलिंद महांगडे on 3 August, 2015 - 12:24

भावपूर्ण श्रद्धांजली………..

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 3 August, 2015 - 07:43

भावपूर्ण श्रद्धांजली………..

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन