लेखन

शर्यत मैत्रीची...!!!!

Submitted by salgaonkar.anup on 1 September, 2015 - 01:20

एक घनदाट जंगल होत वृक्ष-वेलींनी वेढलेलं, पाना-फुलांनी बहरलेलं. निसर्गाच्या अप्रतिम सौदर्याने सजलेलं. अनेक पक्षी प्राणी या जंगलात आपलं घर बांधून राहत होते. अशा जंगलात राहत होता एक शुभ्र ससा. साश्याशेजारी नवीनच घर थाटल होत, ते एका कासवानी. ससा होता गोब-या गोब-या गालांचा, कासव काळ्याकुटट कवचाचा. ससा पांढ-या शुभ्र कापसाचा, कासव रखरखीत पावलांचा. ससा लबाड घाऱ्या डोळ्यांचा, कासव डोळे मिटून पाहिलेल्या स्वप्नांचा, सश्याच्या बुद्धीची दारं बंद, कासव चालायला थोडं संथ. कासवाची बुद्धी, त्याची प्रगल्भता, त्याचं वागण, बोलण या साऱ्याने ससा भारावून गेला होता.

शब्दखुणा: 

हरवलेला किनारा... (भाग ३)

Submitted by ईशुडी on 31 August, 2015 - 05:32

हरवलेला किनारा…….. (भाग १) http://
www.maayboli.com/node/54496

हरवलेला किनारा…….. (भाग 2) http://www.maayboli.com/node/54508

सोमवार उजाडला समीर मोठ्या ऐटीत लायब्ररीत आला, आज तो खूप खुश दिसत होता ,आल्याआल्या तो आकांक्षाला शोधू लागला .बघतो तर मिनू आणि आकांक्षा दोघी आतमध्ये अभ्यास करत बसल्या होत्या , दोघींचाही लक्ष त्याच्याकडे न्हवती तिला बघून त्याला जर समाधान वाटलं जणू त्याचादिवस आज खूप मजेत जाणार होता . मग त्याने त्याच्या

विषय: 

'हायवे' - एक सेल्फि आरपार!

Submitted by मुग्धमानसी on 31 August, 2015 - 03:20

कधी कधी आपण एकटेच घराबाहेर पडतो फ़िरायला. मॉर्निंग वॉक म्हणा किंवा पायी नुस्तीच चक्कर मारायला. एखाद्या निवांत शांत ठिकाणी! तिथे आपल्यासारखेच अनेक जण पाय मोकळे करत असतात. आपण फ़िरत असताना आपल्या पुढून येऊन मागे जाणारे किंवा मागून येऊन पुढे जाणारे अनेक जण आपण तिथे नसल्याचप्रमाणे आपापल्या सोबत्यांशी चाललेल्या गप्पांमध्ये रंगून गेलेले असतात. आपल्याला चालता चालता अश्या आत्ममग्न गप्पांचे अनेक छोटे-मोठे तुकडे ऐकू येतात. मुद्दाम कान देऊन ऐकलं नाही तरी काही वाक्यं, काही शब्द, काही प्रश्न, काही उसासे... आपसुक येऊन कानावर पडतात. कधी आपल्याला खुद्कन् हसू येतं तर कधी अगदिच "कैच्याकै" वाटतं.

शब्दखुणा: 

लंगडा भिंगाऱ्या

Submitted by जव्हेरगंज on 28 August, 2015 - 09:04

अंधारायला आलं होतं.
लंगडा भिंगाऱ्या वैरण घेउन आला.
आण्णा नांगरटीला गेला होता .
मंजु भाकऱ्या थापत होती .
लंगडा भिंगाऱ्यानं वैरण कापून गुरांना टाकली .
पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती .
वैरण टाकून भिंगाऱ्या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला .
दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला.
मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं.
त्यानं ते पडवीत बसून खाल्लं.
भिंगाऱ्या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.
चार गुरांचा चारा एका खेपेत आणायचा.
माजघरातील सतरंजी उचलून तो व्हरांड्यात येऊन पसरला.
त्याची नेहमीची गौळत म्हणत तसाच पडून राहिला.
तो गौळणी कुठे शिकला देवजाणे.

एकांत

Submitted by suryakiran on 27 August, 2015 - 03:03

आता एकांत हवा,
अगदी शांततेलाही गाढ,
झोप लागावी असा एकांत...
तू असशील याची खात्री सुद्धा,
त्या एकांताच्या कणाकणात असावी..!
एखाद्या उंच झाडाला शांत टेकून,
डोळे मिटून बसावं आणि,
तुझ्या माझ्यातल्या आठवणीच्या,
गुंत्यात आल्हाद गुरफटत,
एखादा कोष तयार व्हावा भोवती,

काळजी नको..
हल्ली तुझे भास आणि आठवणीच्या श्वासांनी,
जगणे आपसुक सुसहय करायला शिकलोय रे..!

विषय: 

परीकथा २ - (सव्वा ते दीड वर्ष) (facebook status)

Submitted by तुमचा अभिषेक on 26 August, 2015 - 14:15

..

परीकथेचे सव्वा वर्ष ..
..

२० जुलै २०१५

लहान मुले खरंच किती निरागस असतात..
जिथे गल्ली क्रिकेटमध्ये सारे जण बॅटींगसाठी मरत असतात,
फिल्डींग करतानाही आपली बॅटींग कधी येणार याचीच वाट बघत असतात,
अगदी टॉसही जिथे कोणाची बॅटींग पहिली असणार, हे ठरवण्यासाठीच उडवला जातो,
तिथे आमची परी बॅट पप्पांच्या हातात देते आणि स्वत: बॉलिंग टाकायला धावते.
खरंच., लहान मुले किती निरागस असतात Happy

.
.

२२ जुलै २०१५

विषय: 
शब्दखुणा: 

शृंगार ४

Submitted by अनाहुत on 26 August, 2015 - 12:48

मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .

" अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . "

" असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "

" ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "

ठिगळ

Submitted by धनुर्धर on 23 August, 2015 - 06:22

पाऊले शाळेच्या दिशेने झप झप पडत होती. शर्ट घामाने ओलाचिंब झाला होता. निम्म्या रस्त्यात असतानाच शाळा भरल्याची घंटा कानावर पडली होती त्यामुळे मनात धाकधुक वाढली होती. चालता चालता अचानक चपलेचा बंध निसटला, आणि दत्ता थोडासा अडखळला. रबरी चप्पला पार झिजून गेल्या होत्या. "तुलाबी आत्ताच तुटायंच व्हतं" स्वतःशीच वैतागून त्याने तुटलेली चप्पल हातात घेतली. तेवढ्यात पहिल्या तासाची घंटा त्याच्या कानावर पडली. त्याच्या काळजात चर्र झाले. पहिले सलग दोन तास कांटे सरांचे होते. कांटे सर त्यांना मराठी शिकवीत तसेच ते त्यांचे वर्गशिक्षक देखिल होते. अतिशय कडक शिस्तीचे म्हणून त्यांची संपूर्ण शाळेत ख्याती होती.

विषय: 

शृंगार २

Submitted by अनाहुत on 22 August, 2015 - 03:03

आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत . पुढे ती लोकल त्यातली ती गर्दी , सुरूवाती सुरूवातीला त्याचही थ्रील वाटायच . नंतर त्याची सवय झाली आणि आता तर उबग येतो त्याचा . एवढी माणस वाढली तेवढया लोकल नाही वाढल्या .

अन् मी ओशाळून जाते!

Submitted by मुग्धमानसी on 21 August, 2015 - 02:26

आठवांचा जाळ होतो
त्यात मी पोळून जाते
सांज होते... राख स्मरणांची
मला चोळून जाते!

तो इथे नव्हताच तेंव्हा
मी कुठे उध्वस्त होते?
कल्पना तो हरवल्याची
का मला जाळून जाते?

गीत जगण्याच्या स्वरांचे
त्यातला वर्जित स्वर मी!
मी मनाशीही स्वत:ला
नेमके गाळून गाते!

रात्र होताना उशाशी
ठेवते खंजीर नेहमी
स्वप्नभ्याली नीज माझी
रोज मज टाळून जाते!

रोज जी अस्वस्थ होते,
निघून जाताना घरी मी...
रोज मी केसांत माझ्या
नजर ती माळून जाते!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन