लेखन

श्री. विं.चं 'यक्षघर' - श्री. उमेश विनायक कुलकर्णी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

कर्‍हाडला सकाळी श्रीनिवास विनायक कुलकर्ण्यांकडे पोहोचलो तेव्हा दहा वाजून गेले होते. ब्रेकफास्टसाठी मंडळी आमच्यासाठी थांबली होती. स्वागत अत्यंत साध्या पद्धतीनं, पण खूप मनापासून केलेलं. ब्रेकफास्टला त्यांच्या पत्नीनं, ललिताकाकूंनी केलेला कणसाचा उपमा खूपच चवदार होता. त्या पाककृतीला त्यांनी एक आत्मीयतेचं बोट लावलं होतं, ज्यामुळे तो अजूनच आत कुठेतरी सुख निर्माण करत होता. आमचं छान जमणार आहे, याची खूण मला ब्रेकफास्टच्या टेबलावरच पटली. मला चटण्या-लोणच्यांमध्ये खूप रस आहे कळल्यावर श्री.

प्रकार: 

अमेरिकेचे मिशन जपान

Submitted by पराग१२२६३ on 3 January, 2016 - 01:28

हॅलो, ३ जानेवारीच्या दै. सामनामध्ये प्रकाशित झालेला माझा लेख आणि त्याची लिंक खाली दिलेली आहे. वेळ मिळेल तेव्हा हा लेख वाचावा ही। विनंती.
---
http://www.saamana.com/utsav/amerikeche-mission-japan

अमेरिकेचे मिशन जपान

बोट - चाचेगिरी

Submitted by स्वीट टॉकर on 31 December, 2015 - 04:28

समुद्रावरील वादळांप्रमाणे चाचेगिरी हा देखील कुतूहलाचा विषय.

निसर्गाशी हातमिळवणी असो अथवा दोन हात करणं असो, त्यात एक प्रकारचा रोमांच असतो कारण निसर्ग अफाट ताकदवान असला तरी नेहमीच नियमबद्ध वागतो. मात्र असं काही चाचेगिरीबद्दल म्हणता येत नाही.

भर समुद्रात चाचेगिरी चालते – याचं आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. खरं तर मधल्या काळात चाचेगिरी बंद का झाली होती? याचंच आश्चर्य वाटायला हवं.

अता मी नशेत आहे!

Submitted by मुग्धमानसी on 31 December, 2015 - 02:37

असले माझे उगा बरळणे मानु नका रे खरे... अता मी नशेत आहे!
ऐका माझे मला अता एकटे सोडणे बरे... अता मी नशेत आहे!

कसे रात्रभर अंधाराशी दोन हात केले मी?
नक्की कुठल्या प्रहरी जाणे अशी शांत निजले मी?
तुझे नाव पुटपुटले तेंव्हा उरी जाग होती का?
तुला पाहीले ती स्वप्नांची खुळी रांग होती का?
मलाच काही उमगेना ठग कोण कुणाचे खरे... अता मी नशेत आहे!
ऐका माझे मला अता एकटे सोडणे बरे... अता मी नशेत आहे!

इथे उशाशी ओल... छातीही खोल खोल भिजलेली...
स्वप्नांचा लगदा पायांशी, व्यथा क्लांत थिजलेली!
खरेच आलेले वादळ की तो फक्त भास झालेला...?
मला स्मरेना शेवटचा पाऊस कधी आलेला...

शब्दखुणा: 

माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2015 - 12:28

शिवी म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त संतापाच्या भावना व्यक्त करणारे शब्द ...
अशी काहीशी शिवीची व्याख्या ऐकली होती..
बस्स तिलाच खोटे ठरवायचो आम्ही..

विषय: 

या या मयाय्या

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

हाव खुप दीस चिततालो कित्ये तरी बरवया म्हणून पण कित्ये बरवपाचे ते कळ नशील्ले. बायल माका म्हणताली तू मराठीन इतले बरयता तर कोकणीन कीत्येच काय बरयणा नाय कित्याक. बायलेन इतले म्हळ्ळा झाल्यार बरवपाकच जाय म्हणून बरवपाक घेत्ल्ये रोकडेच. पडत्या फळाची आज्ञा म्हणचे पेक्षा प्रत्यक्ष झाडानच आज्ञा दिल्यार नाय म्हणपाचो प्रश्नच ना.

विषय: 
प्रकार: 

१५०

Submitted by जव्हेरगंज on 29 December, 2015 - 08:29

रात्रीच्या शांत काळोखात तुम्ही कधी 'धडाम्' असा आवाज ऐकला आहे काय? झोपेत असतानाही हा आवाज कधी कधी ऐकू येतो. मी जिथे राहतो तिथून जवळूनच एक हायवे गेलाय. आणि असे आवाज आम्हाला नेहमी ऐकायला येतात. थरकाप उडतो. तो नक्की ट्रक, टेम्पो, लक्झरी की अजून काही. मी एका झोपड्यात राहतो. झाडी तशी बरीच आहे. आणि हायवे इथून फारसा लांब नाहीये. कधी आवाज आलाच तर मी झोपड्याबाहेर येऊन दुरुनच कानोसा घेतो. आवाज तसा लहानच असतो. पण कधी कधी जमीन हादरते. आणि पुन्हा सगळे चिडीचूप. शांत. भयाण काळोख. आणि मग पुन्हा 'सायरन'चे आवाज. रात्रभर.

विषय: 
शब्दखुणा: 

फॅमिली क्रॉनिकल्स १ : लग्नाचा वाढदिवस - आमचं सेलिब्रेशन!

Submitted by रायगड on 28 December, 2015 - 20:49

ही आहे घर-घर की कहानी. माझ्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस! दरवर्षीच अजून एक वर्ष आपण एकमेकांबरोबर कसं काय घालवलं ह्या विचारानी आम्हालाच आश्चर्य वाटतं.

तर सकाळी सकाळी त्याला त्याच्या बहिणीचा का कोणाचा व्हॉटस अप आला वाटतं कारण त्याने घोषणा केली,
"१२ बरं का!"
"१२? काय १२ वाजले? एवढा वेळ झोपले मी आज?" तसा रविवार असल्याने घाई नव्हती पण १२?

विषय: 
शब्दखुणा: 

संकेत - भाग ६ (अंतिम)

Submitted by मुग्धमानसी on 27 December, 2015 - 23:50

याधीचे भागः
'संकेत' भाग १ - http://www.maayboli.com/node/56790
'संकेत' भाग २ - http://www.maayboli.com/node/56815
'संकेत' भाग ३ - http://www.maayboli.com/node/56845
'संकेत' भाग ४ - http://www.maayboli.com/node/56884
'संकेत' भाग ५ - http://www.maayboli.com/node/56917
__________________________________________

मी आरशासमोर उभी आहे.
कधीकधी स्वत:ला समोरासमोर भेटावसं वाटलं की मी अशीच आरशासमोर उभी राहते. त्यावेगळा आरशाचा माझ्या घरात दुसरा कुठलाच उपयोग नाही.
ही माझ्यासमोरच्या आरशात उभी असलेली एकमेव व्यक्ती आहे जी माझ्या चेहर्‍यावरचे विद्रूप डाग पाहून दचकत नाही. किळस करत नाही.

शब्दखुणा: 

आणखीे, एक पाऊल: लेखकः ई. झेड. खोब्रागडे (प्रकाशकः पद्मगंधा,पुणे)

Submitted by pkarandikar50 on 27 December, 2015 - 23:27

एक वाचनीय पुस्तक. मी लिहिलेले परीक्षण येथे वाचू शकता. :
http://www.loksatta.com/vismrutitgelelipusatke-news/marathi-books-review...

प्रभाकर ( बापू) करंदीकर

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन