लेखन

वेळ ही निराळी (भाग-दोन)

Submitted by कविता९८ on 22 September, 2016 - 11:51

वेळ ही निराळी
भाग - 2

केवलला माझ्यापेक्षा पण चांगली कुकींग येते हे माहित नव्हतं मला.
जेवुन झाल्यावर पुन्हा गप्पा मारायला सुरु करणार तेवढ्यातच कोणीतरी दरवाजा वाजवला.
केवलने दरवाजा उघडताच एक क्युट छोटी मुलगी आत आली.
मी आधी पण केवलच्या घरी आलेली आणि या मुलीला बघितलेलं सुध्दा..
पण नाव आठवत नव्हतं.
तस मला नाव आठवायची गरजच पडली नाही कारण केवलने तिला आवाज दिला..
"पियु काय ग आता आली दादा कडे.
शाळेतून कधीच घरी आलेली ना.."

"अरे दादु माझी ना मावशी आलेली.
हे बघ मला कँडी दिली.."
तिने कँडी हा शब्द बोलताच पुढे काय होणार याचा अंदाज आला मला.

"दादु तू खाणार का कँडी"
हातातली एक कँडी केवलला देत पियु बोलली.

विषय: 

वेळ ही निराळी (भाग-दोन)

Submitted by कविता९८ on 22 September, 2016 - 11:50

वेळ ही निराळी (भाग दोन)

केवलला माझ्यापेक्षा पण चांगली कुकींग येते हे माहित नव्हतं मला.जेवुन झाल्यावर पुन्हा गप्पा मारायला सुरु करणार तेवढ्यातच कोणीतरी दरवाजा वाजवला.
केवलने दरवाजा उघडताच एक क्युट छोटी मुलगी आत आली.मी आधी पण केवलच्या घरी आलेली आणि या मुलीला बघितलेलं सुध्दा..
पण नाव आठवत नव्हतं.
तस मला नाव आठवायची गरजच पडली नाही कारण केवलने तिला आवाज दिला..
"पियु काय ग आता आली दादा कडे.शाळेतून कधीच घरी आलेली ना.."

"अरे दादु माझी ना मावशी आलेली.हे बघ मला कँडी दिली.."तिने कँडी हा शब्द बोलताच पुढे काय होणार याचा अंदाज आला मला.

"दादु तू खाणार का कँडी"हातातली एक कँडी केवलला देत पियु बोलली.

केवल : "नको माझं पोट भरलयं ग,कऊ तु खाणार का?"

मी : मला पण नको..

"दादु तुला कँडी आवडत नाही का?"फक्त दहा अकरा वर्षाच्या पिऊ ने विचारलेला प्रश्न ऐकून हसू की रडू समजत नव्हत.पण केवल काय उत्तर देतोय याची उत्सुकता होती मला..आणि केवलने दिलेलं उत्तर ऐकून मी हसत हसत तोंडावर हात ठेवला..

"अग पिऊ मला कँडी खूप आवडते"केवल बोलत असताना हसत होता हे मी बघितलं.केवल पिऊ सोबत बिझी झाला आणि तेवढ्यात मला पण कॉल आला अन् मी कॉल वर बिझी.

मी : हा.बोल अजु..
अजय : कऊ यार आहेस कुठे.सकाळ पासुन ऑफलाईन.एवढी बिझी??

मी : अरे बाबा सकाळी कॉलेज मध्ये होती. आणि आता फ्रेंडच्या घरी
आहे.

अजय : 6 चा इवेंट आहे दादरला
तू 5.30 पर्यंत तरी दादरला ये.

मी : तु मला ऑर्डर नको देऊ हा..तुझी gf नाही मी..आणि बँड मेंबर पण नाही

अजय : टाईम वर ये बाय..आणि नीट ये आरामात.
सुमित, दिप,करण सर्व येणार आहे.

एवढ बोलून कॉल कट केला त्याने.
मागून केवल आला.."काय गं..कोणाचा कॉल?"

"अरे आहे एक फ्रेंड....अजय..ओळखतो ना त्याला..ते सोड.चल ना माझ्या सोबत.. प्लिज.."

"कुठे ते सांग.. येतो मी सोबत..डोन्ट वरी.."

"दादरला..चल ना निघुया आताच..पिऊ गेली घरी??मी ठिक दिसतेय ना??की घरी जाऊन चेंज करून मग जाउ??"

केवल : "अग हळू जरा..पिऊ गेली घरी.. आणि तु मस्त दिसतेयं..थोड फ्रेश हो मग निघु.."

शिवाजी पार्कला पोहचताच पाच पांडव दिसले.

पाच पांडव म्हणजे अजय,दुष्यंत,सुयोग,विराज आणि स्वप्निल..केवल पण या सर्वांना आधी पासून ओळखत असल्याने आणि आम्ही सर्व गप्पा मारत उभे होतो.
तेवढ्यात सुमित, दिप , करण आले.इवेंट सुरू होण्यास वेळ होता.सुमित, दिप , करण हे तिघं केवलला ओळखत नव्हते मग ओळख परेड सुरू झाली.

"केवल हा दिप ..हा सुमित आणि हा करण..तिघं पण लास्ट year ला आहेत.अँड तिघं पण कलाकार आहेत..N gyz हा केवल...."

करण : याला तर सर्व ओळखतात..याच ते साँग तर रोज ऐकतोआम्ही..

सुमित : उद्या रविवार आहे सो सर्व जण फ्री असणार..उद्या माझ्या घरी या..जरा मस्ती मजा करू..
केवल आणि तुमच्या बँडची जुगलबंदी पण होऊन जाईल.. अँड हा परवापासून गणपतीची सुट्टी..आमच्या घरचे सर्व गावी गेले आहेत..
कोण कोण येणार??दोन तीन दिवस चील करू असा विचार करून सर्वांनी होकार दिला..
सुयोग दादाची gf सलोनी आणि करणची gf ऐश्वर्या येत असल्याने मी पण तयार झाली.
इवेंट सुध्दा मस्त पार पडलं.पुढच्या दिवशी सकाळी सुमितच्या घरी भेटायचं , येताना दोन दिवसांसाठी लागणारे कपडे घेऊन यायच हे सर्व नक्की झाले.
लगेच WhatsApp group पण तयार केला.

पुढील भाग http://www.maayboli.com/node/60385

विषय: 

नाकासमोर म्हणजेच वळत वळत? हा काय चावटपणा?

Submitted by स्वीट टॉकर on 22 September, 2016 - 04:29

आपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (अ‍ॅटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार्गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत?

याच्या कारणाबद्दल काही गैरसमजुती आहेत. हवामानामुळे असेल, धोकादायक भाग टाळण्यासाठी असेल वगैरे.

प्रत्यक्षात कारण वेगळं आहे. जमलं तर तुम्हाला समजावतो.

माझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-२)

Submitted by पराग१२२६३ on 21 September, 2016 - 11:20

मथुरा सोडून दहा मिनिटे झाली होती. नव्या प्रवाशांना अटेंडंटने नॅपकीनही देऊन झाले होते. मथुऱ्याच्या आधी ऑनबोर्ड हाऊसकिपिंगवाले गाडीची साफसफाई करून गेले होते. त्यांचा प्रमुख आमच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन एकाकडून फिडबॅक फॉर्म भरून घेऊन गेला होता. त्याचवेळी तिकडे वातानुकूल रसोई यानामध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झालेली होती. मथुऱ्याच्या आधी सगळ्यांचे चहा-कॉफीच्या कीटसोबत आलेले मसाला शेंगदाणे, व्हेज सँडविच, कचोरी, मातीचूर लाडू आणि फ्रूटी असे सर्व काही खाऊन-पिऊन झालेले होते. जेवणाची वेळ होण्यासाठी अजून थोडा वेळ होता.

वेळ ही निराळी (भाग - एक )

Submitted by कविता९८ on 20 September, 2016 - 01:21

"वेळ ही निराळी"
भाग - 1

"यार हे readings बरोबर येतच नाही.
कँडी वोल्टमीटरकडे बघ ग जरा.
सर पण कुठे गायब झाले.
5.30 झाले ना यार"
सेजलची ही बडबड ऐकून डोक दुखायला लागलं.
आधीच 10.40-2.40 lectures 2.45 ला लगेचच practical . ते संपणार 5.45 वाजता आणि तोपर्यंत ट्रेनला मरणाची गर्दी.
सिरीयसली ही सेजल prac partner नसती तर शांत पणे practical केल असतं.
एरवी कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक practical म्हटलं की आम्हाला जरा हायसं वाटायचं.
Readings घ्या , लिहा , सबमिट करा आणि घरी जा.
पुढच्या आठवड्यात गणपतीची सुट्टी .
7 दिवस आराम.
पावसाळी वातावरण....बाहेर किती मस्त वाटतं..
कधी संपणार हे prac ..

विषय: 

प्रतिशोध भाग-दुसरा

Submitted by कविता९८ on 17 September, 2016 - 05:51

प्रतिशोध
भाग - दुसरा

"ओय , काऊ लक्ष कुठे आहे ग तुझं??
कॉफी थंड झाली..
हॉट कॉफी कशाला ऑडर केली मग "
जमेल तेवढ्या हळू आवाजात सियाल काव्याला ओरडत होता.
दर रविवारी यांचा कट्टा जमायचा..
आज काव्या आणि सियाल जरा लवकरच आले होते.
तोपर्यंत बबलु , श्रीकांत ऊर्फ श्री , संदेश ऊर्फ सँडी यांची स्वारी तिथे पोहचली.
बबलु : "काय रे कदम एरवी सांगतो की आमच्यात काही नाही आणि आज बरे दोघ ..
बोला तुम्ही ..आम्ही जातो..
आम्ही कशाला कबाब मे हड्डी.."

विषय: 

माझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-१)

Submitted by पराग१२२६३ on 14 September, 2016 - 11:19

गेल्या वर्षी त्या दिवशी मी जरा जास्तच उत्साहात होतो. माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक वर्षे अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होत होती. अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होत असताना पाहून कोणाचा उत्साह वाढणार नाही, नाही का! मागच्या वर्षी वाढदिवस दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन आतून पाहायला जाऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दिल्लीचा प्रवास जाता-येता मुंबईहून करण्याचा निर्णय घेतला. त्याची दोन कारणे होती. एक तर पश्चिम एक्सप्रेस आणि दुसरी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस. मग त्याप्रमाणे नियोजन करून तीन महिने आधीच पाहिजे त्या गाड्यांचे आरक्षण करून ठेवले.

कवडसा

Submitted by ऋषभ गि.कुलकर्णी on 14 September, 2016 - 08:53

तो लढत राहिला कसा होता?
उमटला नेहमीच ठसा होता !

ध्येय केव्हाच ठरवले आम्ही
पावलांचा कुठे वसा होता ?

पावसाशीच वैर धरले मी
पाळला एक कवडसा होता !

हे वयाचेच सोहळे होते
लाजला आज आरसा होता !

भेट वाटेत नेमकी झाली
तो नियोजीत हादसा होता ?

सोबतीने तुझ्या कुठे आला ?
तो तुझा काय राजसा होता !
.......
ऋषभ

विषय: 

तू मुकुल साजरी...

Submitted by सत्यजित on 13 September, 2016 - 09:10

मुकुल फुलांचा भार व्हावा तू इतुकी नाजूक फांदी गं
पुष्पदलांच्या तळव्यांवरती नाजूक साजूक मेहेंदी गं

डोळ्यां मधले भाव भाबडे ओल्या कडा पाणावती गं
डवरलेल्या आम्र तरु तळी स्पंदन घटिका दुणावती गं

हळद लागल्या गालांवरली लज्जित लाली केसंर गं
बांध घातल्या नयनजळातील प्रतिमा झाली धुंसर गं

रिंगण सावळे डोळ्यां भवती ती माय कावरी हसते गं
दीली तुळस जगदीशा घरी तरी धुकधुक मनी असते गं

कोकरां परी कुशीत शिरून घे जावळ तुझे कुरवाळून घे
गंध मायेचा उरात भरून घे स्पर्श मलमली गोंजारून घे

जपेल तुझा ती सारा पसारा राहिल सारे तुझे आहे तसे
आंगण प्रांगण तुझेच सारे लेक परकी ना कधी होत असे...

देह देवाचे मंदिर.

Submitted by Suyog Shilwant on 9 September, 2016 - 17:37

लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.

" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "

Pages

Subscribe to RSS - लेखन