लेखन

प्यार का पहला ख़त - भावानुवाद

Submitted by प्रसन्न अ on 6 November, 2012 - 00:31


प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता हे |
नए परिंदो को उड़नेमे वक्त तो लगता हे ||

परमेश्वरा , अरे अनादी अनंत बसला आहेस तिथे .. हजारो , कोटी कोटी रूपे तुझी
प्रेमात पडलोय तुझ्या .. किती रुपात पाहू ? कसाही तुला जाणून घ्यायचा प्रयत्न केलास तरी तू अपूर्णच भासतोस रे
तुझ्या प्रेमात पडायची हिम्मत केलीये ... जिथे तुकाराम, ज्ञानेश्वर , मीरा , शबरी यांचा कस लागला .. तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा
तुझी भक्ती करायची.. कशी.. काय .. काहीच ठावूक नाही रे .. मी अगदी नवखा आहे ..
तू नक्की आहेस तरी का , माझी प्रार्थना ऐकतोस का हे हि ठावूक नाही

(अ)स्फुट

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

भूतकाळाची राख सावडत
सुखी क्षणांच्या अस्थी शोधते
आयुष्याच्या उजाड गावी
मी स्वप्नांची वस्ती शोधते

विषय: 
प्रकार: 

दिवाळीत किल्ला का करतात?

Submitted by Prajakta C. Kulkarni on 5 November, 2012 - 08:00

दिवाळीत किल्ला का करतात याबद्द्ल जर कोणाला महिती असेल तर सांगा.किंवा दिवाळीचे आणि गड -किल्ल्यांचे काय संबंध असावा ,तशी काही परंपरा / कथा आहे का ? आणखी एक एखाद्या किल्ल्याच्य चित्रावरुन
जर त्याची प्रतिक्रुती करायची असेल तर कशी करावी?

विषय: 

कोंबडा कट

Submitted by तुमचा अभिषेक on 4 November, 2012 - 12:41

गरमी फार झालीय ना हल्ली.. दोनचार दिवस थंडी आलीय, थंडी आलीय अश्या अफवा काय त्या उठल्या, पोरांनी एकमेकांना हॅपी थंडीचे मेसेजेसही पाठवून झाले.. पण पुन्हा परिस्थिती जैसे थे..

ऑफिसमध्ये असताना काही जाणवत नाही.. थॅंक्स टू वोल्टास एअर कंडीशनर.. पण बाहेर पडले की पाचच मिनिटांत पाण्याच्या धारा लागतात अंगाला.. नुसती चिकचिक चिक चिक वैताग आलाय..

आधीच माझ्या गोळ्या चालू असल्याने अंगातली हीट वाढलीय.. त्याचा परीणाम डोक्यावर व्हायला सुरूवात झालीय...

डोक्यावर परीणाम म्हणजे... नकोच्या नको ते अर्थ घेऊ नका... वाढलेल्या केसांच्या आत छोट्या छोट्या पुळ्या जमायला सुरुवात झालीय..

विषय: 
शब्दखुणा: 

मसाप मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा जंगी सत्कार

Submitted by अ. अ. जोशी on 3 November, 2012 - 10:34

मसाप मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा जंगी सत्कार

डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची ८६व्या अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष्यपदी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळी कोत्तापाल्लेन्चा सत्कार पुण्याच्या मसापच्या सभागृहात झाला.

त्यावेळी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. त्यातही रावसाहेब कसबे आणि अनंत दिक्षित हे विशेष. त्याचबरोबर उल्हास पवार, न.म.जोशी ई. उपस्थित होते.

कोत्तापल्ले यांचे स्वागत करण्यासाठी खास चौघडा वादन झाले. चौघड्यातील विविध तालांनी वादकांनी कमाल केली. स्वत: कोत्तापल्लेही त्यामुळे भारावून गेले.

कार ट्युनिंग - परफॉरमन्स

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

तुम्हाला कधी आपली गाडी रेस कार सारखी चालवावी असे वाटते का?
तुम्ही कधी फास्ट मुव्हींग कार्सचा थ्रिल घेतला आहे का?
स्टॉक कार रेस मध्ये आपली कार चालवावी असे वाटले का?

उत्तर हो असेल पण तश्या कार्स तुम्ही विकत घेऊ शकत नसाल आणि तुमच्या कडे कार असेल तर मात्र इंजीन ट्यूनिंग किट एकदा वापरून बघाच. पेट्रोल व डिझेल दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

कारचे स्टॉक इंजिन (म्हणजे गाडीत लावून आलेले) हे आपल्याला हवे आणखी ट्युन करता येते जेणे करून त्याचा शक्ती आणि प्रति लिटर क्षमता अजून वाढेल. (परफॉर्मन्स आणि मायलेज)

ट्युनिंग हे दोन प्रकारे करता येते.

विषय: 
प्रकार: 

गॉड लविंग पीपल .. ??

Submitted by अंड्या on 1 November, 2012 - 13:11

खूप दिवसांनी एक विचार करायला भाग पाडणारा चित्रपट पाहिला. ओह माय गॉड ..!!

वादाने उत्सुकता वाढवली होतीच, तसेच मी देखील सतत सोयीनुसार आस्तिक नास्तिक असे पारडे बदलत असल्याने मला या चित्रपटात मांडलेले विचार माझ्या विचारांशी मेळ खातात का? किंवा माझे विचार चुकीचे आहेत आणि ते बदलायला हवेत का? हे जाणून घ्यायची उत्सुकता जरा जास्तच होती.

विषय: 

दोन क्षणांचा प्रवास जीवन...

Submitted by हर्षल_चव्हाण on 1 November, 2012 - 05:56

आपण आपले भले बुरे,
हवे कुणाला हार तुरे?

उभ्या रहिल्या भिंतीना,
प्रेमाचा आधार पुरे...

घरट्यामधले पिलू मोकळे,
आभाळाची कास धरे...

रोख कुणाचा कसा असावा,
कुणी सांगावे; काय बरे?

गोंधळ जगती फार जाहला,
कानी कोण हे गूज करे?

अफलातून ही दुनिया रे,
खोट्याचेही करे खरे...

दोन क्षणांचा प्रवास जीवन,
जगता जगता सहज सरे...

म्हणून जगणे समजून घ्यावे,
सरल्यावरती काय उरे?
------------------------------------------------------------------------------------
हर्षल (१/११/१२ - दु. ३.२०)

शब्दखुणा: 

घुंगूरवाळ्या पागोळ्यांना थेंबांची नक्षी

Submitted by प्राजु on 1 November, 2012 - 01:51

मेघमल्हाराची धून

घुंगूरवाळ्या पागोळ्यांना थेंबांची नक्षी
कौलारांच्या वळचणीला भिजलेला पक्षी
गुंता सुटला, भेगा विरल्या ढेकुळ सैलावून
मातीमधुनी घुमली मेघ मल्हाराची धून

भिंताडावर अंकुरणारा पिंपळ इवला इवला
रखरखणार्‍या फ़त्तरावर हिरवट थर जमला
हिरवा शिरवा ठिबकत राही पानापानातून
हिरव्या अंगी सजली मेघ मल्हाराची धून

सुरसुर सरपण जाळत आता चुलीही भगभगल्या
मुसमुसणारा धूर निघाला प्रवासास ओल्या
माजघराच्या भिंतींमध्ये ऊब पसरवून
धुरकट गंधित झाली मेघ मल्हाराची धून

सभोवताली दगडी कुंपण ओले लाल चिर्‍याचे
कडू कारले, भव्य भोपळा, फ़िरले वेल मिर्‍याचे
परसू सजला जुई मोगरा, कांचन फ़ुलवून

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन