लेखन

अंतिम सत्य ___ ८२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 December, 2016 - 16:31

साधारण पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट. सोमवारची सकाळ. रविवारचा हॅंगओवर उतरायला तयार नव्हता. ऑफिसला जायचे की नाही या विचारांत बिछान्यातच लोळत पडलो होतो. जसा दिवस चढत होता तसे ऑफिसला जायचा उत्साह अजून मावळत होता. ऑफिसमध्ये फारसे महत्वाचे काम नव्हते. गेलेच पाहिजे असे गरजेचे नव्हते. सुट्ट्या देखील बर्‍याच शिल्लक होत्या. थोडक्यात चादर झटकून उठण्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज होती. ईतक्यात अलार्म वाजल्यासारखा फोन खणखणला. रात्री अवेळी वाजलेल्या फोनपेक्षा भल्या सकाळी वाजलेला फोन मला जास्त धडकी भरवतो. कारण तो फोन ऑफिसचा असण्याची शक्यता असते. काहीतरी अर्जंट काम निघाले असणार.

विषय: 
शब्दखुणा: 

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी . . . .

Submitted by स्वीट टॉकर on 6 December, 2016 - 02:08

एकोणनव्वद सालची गोष्ट. स्वीट टॉकरीणबाई आणि आठ महिन्याच्या पुनवला घेऊन मी बोटीवर रुजू होण्यासाठी कलकत्त्याला गेलो. (हल्ली मूल दोन वर्षाचं झाल्याशिवाय बोटीवर नेता येत नाही. तेव्हां नियम वेगळे होते. आम्हीही young and stupid होतो.) मात्र खराब हवामानामुळे बोट काही दिवस बंदरात येवू शकणार नव्हती. मी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. कलकत्त्याला आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथे आमची राहाण्याची सोय केली गेली.

उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर फिरणं अवघड होतं. गेस्ट हाऊसचा मॅनेजर बोलका होता. अन् धार्मिक देखील. त्यानी तिथल्या काली मंदिराचं खूप छान वर्णन केलं.

कथा एका दिवसाची

Submitted by सुहृद on 2 December, 2016 - 22:59

कथा एका दिवसाची

वेळ -, सकाळी 9.30
आज सकाळी जरा लवकर आवरले सगळे... विचार केला खुप दिवस बँकेची कामे अपूर्ण आहेत.. आज वेळ आहे तर पुर्ण करावीत ... ब्रांच नवीन घरापासून लांब होती. ती पण बदलायची, पीन घ्यायचा वै वै. घरातून निघाले.. बसला तुफान गर्दी.. एक तास फिरुन स्टॉप आला माझा. पटकन बँकेत शिरले, सहज मनात आले ATM कार्ड हातात ठेऊ, फारच सुधारली असेल बँक तर बरं हाताशी असलेले. सगळी बॅग उलथीपालथी केली पण पर्स सापडली नाही. मग माझी खात्री पटली आज आपली पर्स खरचं हरवली आहे (जवळपास मला रोजच असे वाटते की गेली वाटते पण डब्याखाली, डायरीमागे, फोल्डरच्या फ्लॅपमध्ये अडकलेली परत सापडते)

विषय: 
शब्दखुणा: 

स्मृती काढा (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 2 December, 2016 - 06:04

"आणि तुला तो नंबर आठवला?"

"हो, मी बघितला होता, पण नंतर मी विसरलो, हा काढा पिल्यावर मला नंबर आठवला"

"कसे काय?"

"सोप आहे, पाला पाण्यात टाकायचा, ते पाणी उकळायच, पाणी गाळून घ्या, पिऊन टाका, बस एवढच"

"तुला मग सगळच आठवल असेल?"

"सगळ नाही रे, तुझ्या जवळची आठवण असायला हवी, माझ्या जवळची आठवण, त्या चारचाकीचा नंबर होता"

"पण ही आठवण दुःखद होती"

"फक्त जवळची आठवण, मग ती सुखद असो किंवा दुःखद"

विषय: 

कमिशन ___ २२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 December, 2016 - 02:57

ईस्टॉलवर आज नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. सगळ्यांचाच सेम प्रॉब्लेम. मी खिसे चाचपले. २० रुपयांची खुल्ली चिल्लर आणि पाचशे पाचशेच्या दोन कायमच्या बंद नोटा सापडल्या. नाही म्हणायला मागच्या खिशात दोन हजारांचे कडक बापू होते. पण ते नुसता वडापाव खायला म्हणून बाहेर येणार नव्हते.

जंबो वडापाव साधा पंधरा रुपये. त्यावर बटर आला तर वीस रुपये. आणि चीज आले तर आपल्या औकातीच्या बाहेर.. साला पाच रुपये शिल्लक ठेवायचे की बटर बोलायचे.. आरे हाड, आपण खाणार तर तुपाशी! एका फटक्यात निर्णय झाला. हातातला वडापाव पोटात जात होता आणि खिशातले बिनकामाचे बापू हसत होते.

विषय: 
शब्दखुणा: 

तुझ्या आठवणी पुन्हा नव्याने आठवताना

Submitted by राम पाटील on 30 November, 2016 - 19:12

तशी सायंकाळ ची वेळ असेल , मन खूप थकलेलं होत. रोज रोज तोच दिनक्रम करून  कंटाळा आला होता.म्हणून कुठेतरी  फिरायला जायचा विचार आला म्हणून निघालो , बाहेर पडल्यावर कायम सोबत असणारी जोडीदारींन होतीच (बाइक)..एखादं शांत वातावरण हवं होतं जिथं माझ्या मनाला शांतता लाभेल, विचारांचा काहूर थांबेल,लांब असा दूरवर आलो ..रस्त्याच्या वळणावरून एक कच्च रस्ता होता....दूरवर पहिलं तर एक छोटंसं मंदिर दिसलं ,गाडीला तशीच किक मारली नि त्या रस्त्यानं निघालो ,पाच दहा मिनिटातच माझी स्वारी पोचली तिथं.बसण्यासाठी छानशी एका झाडाखाली जागा पहिली.

विषय: 
शब्दखुणा: 

आशा ___ ३७५

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 November, 2016 - 17:26

ही तीच तर नाही?
नताशा ! टी वाय बी कॉम, ब्यूटीक्वीन ..
ह्मम, तीच तर दिसतेय .. बाहेरची ती लाल गाडी, तिचीच असणार. आजही चेहर्‍यावरचा अ‍ॅटीट्यूड काही कमी दिसत नाही.. प्रदीप स्वत:शीच बोलत होता,

विषय: 
शब्दखुणा: 

मुर्ख फाॅरवर्ड आणि ते आवडुन फाॅरवर्ड करणारे मुर्ख

Submitted by अनिश्का. on 30 November, 2016 - 01:33

आज सकाळीच एक मॅसेज आला. मागे १० महिन्यांच्या बाळाला पाळणाघरात मारहाण झाली.. . मग ती आई टिव्ही वर रडुन रडुन सहानुभूती मिळवत होती.. मग लोक पैश्याच्या मागे ईतके लागलेत की मुलांना असं लोकांकडे टाकुन जातात... मग सासु सासर्यांचं लचांड सुनांना नको असतं...

अर्थात हा मॅसेज बनवणारा माणुस बिंडोक आहे... पण तरी असे मॅसेज येतात आणि लोक ते फाॅरवर्ड करतात.

१. १०० पैकी ९५% बायका नोकरी करतात.
२. सर्वांचीच आर्थिक परिस्थीती चांगली असते असं नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

‘प्रसारमाध्यमांत सर्व भाषांचा बळी जातोय, ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ - मुलाखत - श्री. दिलीप पाडगांवकर / श्री. आनंद आगाशे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री. दिलीप पाडगांवकर यांचं परवा पुण्यात निधन झालं. पॅरिसमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं त्यांची तेथील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. १९७८ ते १९८६ या काळात त्यांनी 'युनेस्को'त बँकॉक आणि पॅरिस इथे काम केलं. पुढे १९८८ साली 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या संपादकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. सहा वर्षं ते या पदावर होते. पुढे या ना त्या स्वरूपात त्यांचा 'टाईम्स'शी असलेला संबंध कायम राहिला. डॉ.

प्रकार: 

परिणाम

Submitted by भागवत on 27 November, 2016 - 03:28

पंखा खडखड आवाज करत फिरत होता. मुग्धाला दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. स्नान गृहात जाऊन आल्यावर तिला कुठे आल्हाददायक वाटलं. आणि आत्ता कुठे वाटल की पोट साफ झाले आहे. हुश्श! आत्ता परवा पासून दिनचर्याला सुरुवात करायला हरकत नव्हती. परत तेच ऑफिसच कार्य, आणि घर यात मुग्धा गुरफटणार होती.

Pages

Subscribe to RSS - लेखन