लेखन

बंड्याचे अदभुत प्रकरण

Submitted by Suyog Shilwant on 3 January, 2017 - 12:10

शिक्षणमंत्री शाळेच्या दौऱ्यावर आले होते.
एका वर्गात जाऊन ते गुरुजींशी बोलले.
" मास्तर, तुमच्या वर्गात सर्वात हुशार विद्यार्थी कोण आहे?"

मास्तरांनी तिसऱ्या रांगेत बसलेल्या बंड्याकडे बोट दाखवले.
त्याला पुढे बोलवण्यात आले.

शिक्षणमंत्र्यांनी कोतुहल म्हणुन त्याला एक प्रश्न विचारला.

" बर..मला सांग बाळा...
सहा सक किती?"

बंड्या एका क्षणाचा बिलंब न लावता म्हणाला.
" 65"

शिक्षणमंत्री मास्तरावर खसकले.
" काहो, मास्तर तुम्ही तर म्हणालात कि हा सर्वात हुशार आहे...?"

मास्तर हसतच म्हणाले.

विषय: 

आणि त्याने माझा पोपट केला होता कि हो!

Submitted by सचिन काळे on 2 January, 2017 - 22:41

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा रेल्वेच्या प्रवासाची तिकिटे काढण्याचे संगणकीकरण झाले नव्हते. बाहेरगांवच्या प्रवासाची अनारक्षित तिकिटे हि तिकीटखिडकीवरच रांग लावून मिळत.

शब्दखुणा: 

छानसे काही वाचलेले

Submitted by वृन्दा१ on 2 January, 2017 - 13:20

अजून,अजूनही मला परत फिरायला जमेल
प्रश्न हा आहे की
तुला हाक मारायला जमेल?

विषय: 

मैत्री

Submitted by Suyog patil on 2 January, 2017 - 11:41

(ते पाच सहा जण होते. बहुतेक जन्माचे उपाशी. आयुष्यात कधी एखाद्या स्त्रीला पहिलेच नव्हते बहुधा. अशा त्या क्रूर नजरा. ती रात्र त्यांचीच होती. बाहेर गावचे होते. गरीब असतील... माहिती नाही पण एकूण चित्र पाहता हेच जाणवत होते. मात्र खरच ते गरीब होते... कि त्यांना पाहिजे असलेली उब आधीच मिळाली होती पण तरी देखील त्यांची भूक.... हो ते भूकेलेच होते. आता त्या लांडग्यांची पुढची शिकार मी होणार..... नाही मी.... या कल्पनेनेच मी घाबरून गेले आणि गाडी थांबत्या क्षणी गाडीतून उतरले. तडक स्टेशन मधून बाहेर येऊन आता या वेळी मिळेल ती गाडी पकडून पळेन.

विषय: 
शब्दखुणा: 

तुम्ही

Submitted by वृन्दा१ on 1 January, 2017 - 11:00

मातीचं मडकं किंवा सोन्याचा हार
घडवणारा कधीच दिसत नाही
पण घडवणाराचं अस्तित्व आणि अभिरुची
काळसुद्धा कधी पुसत नाही

विषय: 
शब्दखुणा: 

"मला मनापासून असे वाटते की....."

Submitted by मधुरा मकरंद on 31 December, 2016 - 12:34

मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१६... ऑफिसमध्ये साजरा करण्याचे ठरले. आयत्यावेळी वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय दिला. "मला मनापासून असे वाटते की....." अशी सुरवात करून फक्त तीन मिनिटे बोलणे.

"नमस्कार मंडळीनो ...तर.. मला मनापासून असे वाटते की, आपण हल्ली आपली मराठी भाषा विसरत चाललो आहे. रोजच्या व्यवहारातसुद्धा कितीतरी अ-मराठी त्यात सुद्धा इंग्रजी शब्द सर्रास वापरतो, इतके की त्यांचे मूळ मराठी शब्द आठवतही नाही. आताशा आम्हाला डावे उजवे कळत नाही पण लेफ्ट राईट लगेच लक्षात येते. इंग्रजी आकडे कसे कळतात आणि एकोणपन्नास, पंच्याऐशी... असे आकडे म्हटले कि गाडी अडते.

विषय: 

सरतेशेवटी: भाग तीन (अंतिम)

Submitted by चैतन्य रासकर on 28 December, 2016 - 03:47

सरतेशेवटी (भाग एक): http://www.maayboli.com/node/61163

सरतेशेवटी (भाग दोन): http://www.maayboli.com/node/61187

सरतेशेवटी: भाग तीन (अंतिम)-

"माझे थोरले काका तीन वर्षापूर्वी वारले, पण ते अजूनही मला फोन करतात"

गिरीश एवढे बोलून थांबला, पण त्याचे हे बोलणे कोणाला काही झेपले नाही, कोणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, बाहेर पाऊस आता कमी झाला होता.

एखाद सेकंदानंतर, रिक्तमांना तो काय बोलतोय हे कळले, रिक्तम एकदम हसायला लागले, संजय ही त्यांच्या हसण्यात सहभागी झाला, गिरीश त्यांच्या हसण्याने दचकला, संपादकाने त्यांच्याकडे बघून स्मितहास्य केले, परत नजर गिरीशकडे वळवली.

Pages

Subscribe to RSS - लेखन