लेखन

अंगाई.... चांदोमामा

Submitted by पुरंदरे शशांक on 12 May, 2017 - 03:03

चांदोमामा गोरा पान.... बाळ किती नाजूक छान

चांदोमामा ढगांमागे..... बाळ अजून कसे जागे

चांदोमामा गोल गोल .... बाळा बाळा डोल डोल

डोल डोल डोलताना
बाळ मुठी मिटताना
गाई गाई करताना
वळवळ चळवळ थांबताना

डोळे गेले मिटून
बाळ गुर्कन झोपून.....

अनुभव (भयकथा)

Submitted by prasad inamke on 12 May, 2017 - 02:08

या कथेतून मी अंधश्रधेला बढावा देत नाही किवा कुणाच्या भावनांसोबत खेळत नाही हा एक मला आलेला अनुभव मी कथन करत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

जिंदगी या बायकांची राळ आहे का?

Submitted by सत्यजित... on 11 May, 2017 - 18:40

वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का?
बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का?

शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?

वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे
तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का?

फुंकली जाते तरी गंधाळते रे ती...
जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

आजही तो त्या विटेवर थांबला आहे
त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का?

—सत्यजित

कसे या मनाला कसे जोजवावे!

Submitted by सत्यजित... on 11 May, 2017 - 18:37

कसे या मनाला कसे जोजवावे?
जरा दुःखही शांत व्हावे,निजावे!

कुठे भागते आपलेही खरेतर?
सुखांनी सुखांना कितीदा गुणावे!

कधी ओल जाते कधी ऊल जाते
कळेना कसे या मनाला चिणावे!

किनारा कधी सांगतो का कुणाला?
किती सागराने दिले हेलकावे!

तिचे ओठ देतील तपशील नंतर
मुक्याने तिने जर तुला बोलवावे!

विसरणे तसे फार असतेच अवघड
उगां एकमेकां कधी गुणगुणावे!
(असे या मनाला,असे जोजवावे!)

—सत्यजित

प्रवासी

Submitted by पुरंदरे शशांक on 9 May, 2017 - 06:45

प्रवासी

ट्रेनमधे शिरल्यावर मोकळे बाक मिळाल्यावर जो काय आनंद होतो तो त्यासमच. जरा स्थिर स्थावर झाल्यावर आसपासचे प्रवासी कसे आहेत हे बघत असतानाच समोरचा फकीरासारखा माणूस मला एकदम विचारता झाला - आपका इस्मेशरीफ ?

शब्दखुणा: 

स्वराली : नंदिनी सहस्त्रबुध्दे (मुलाखत)

Submitted by मंजूताई on 9 May, 2017 - 02:28

भरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्‍यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं! दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय!

शब्दखुणा: 

जिद्द

Submitted by Prshuram sondge on 8 May, 2017 - 11:44
तारीख/वेळ: 
8 May, 2017 - 11:40
ठिकाण/पत्ता: 
पाटोदा बीड

कथा आणि व्यथा
. . . . . . जिद्द . . . . . . . . . . . . . .
विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.

माहितीचा स्रोत: 
अनुभव
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

ब्राह्मण -एक मुक्त(क्ता) चिंतन ...

Submitted by अदित्य श्रीपद on 7 May, 2017 - 00:57

पुण्याच्या विद्यमान महापौर मुक्ता टिळक ह्यांनी आरक्षण आणि ब्राह्मण तरुण ह्यासाम्बंधाने मध्यंतरी जे विधान केले त्यामुळे मी मागे म्हणजे २०१२-१३ साली लिहिलेला लेख आठवला. ह्या लेखात शेवटी शेवटी वर्णन केलेला माझा नातेवाईक तरुण आता परदेशी-जर्मनीत चांगला स्थिरावलाय.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन