लेखन

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

Submitted by तुमचा अभिषेक on 24 January, 2013 - 13:47

रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते.

विषय: 

मालवण चित्र-स्वरूपात.

Submitted by Sano on 24 January, 2013 - 09:55

'काय रे, कधी निघाचय ?' राहुल चा फोन वरचा प्रश्न.

हल्ली त्याचा फोन आला की पहिला प्रश्ना हाच आसतो. बरेच दिवस आमचा मलवाणला जायचा प्लान चालू होता (इथे 'बरेच दिवस' म्हणजे शुद्ध मराठीत 'बरेच महीने'). पण सगळ्यांचे जुळुन येत नव्हते. जिप्सी, मी आणि जीवेश च्या ह्या ना त्या कारणाने प्लान पूढे जात होता. 31st चा वीकेंड पण जवळ आला होता आणि राहुल ची आतुरता शीगेला पोहोचलेली.

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

Submitted by सुज्ञ माणुस on 24 January, 2013 - 06:49

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य
( हे छायाचित्र दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा.)

bus123.jpg
हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे.

मला खुप आवडते त्याचे जगणे...

Submitted by मुग्धमानसी on 23 January, 2013 - 00:49

मला खुप आवडते त्याचे जगणे...

तो जगतो म्हणजे कधीही फक्त जिवंत नसतो... फक्त श्वास घेत नसतो...
तो खरोखर जगतो!
त्याच्याही जगण्याला आकार-उकार, काना-मात्रा, वेलांट्या वगैरे सगळं आहे. तुम्हाला आम्हाला असतं तसं.
त्याच्याही जगण्याला आहेच की दुःखाची किनार, सुखाची झालर... वगैरे वगैरे..

पण तरिही त्याचं जगणं उन्हात चमकणार्‍या भरजरी वस्त्रासारखे सुंदर वाटते...
आणि माझं जगणं त्याच्या जगण्यापुढे एखादा मलमलीचा तुकडा सावलीत वाळत घातल्यासारखं... स्वच्छ, शुभ्र,... पण तरिही त्याला भरजरीची सर नाही!

कुठून आणत असेल तो ही उर्जा?
कुठून शिकला असेल तो हे... जगणे?

शब्दखुणा: 

एक गाणं...

Submitted by मुग्धमानसी on 22 January, 2013 - 23:42

मी क्षणा क्षणावर कोरत जाते एक गाणं...
शब्द कुणीतरी कानात सांगत जातं. चालही कुणीतरी आधीच ठरवलेली.
ताल, सूर, लय, ठेका... माझ्या मालकीचं काहीच नाही!
मी फक्त लिहीत जाते...
एक एक क्षण... भिरभिरत निसटणारा...
शिताफीनं पकडते अन् कोवळ्या नाजूक नखांनी एक एक शब्द त्यावर कोरत जाते.
काही क्षण निसटून जातात...
काही क्षण तुटतात, फाटतात, मिटतात, नासतात..
एवढं नुकसान गृहीत धरलंच पाहीजे नाही का?
पण तरिही... न थकता...
मी माझं गाणं पुरं करायच्या मागे लागते.
किंवा कुणीतरी त्याचं गाणं माझ्यामार्फत पुरं करायच्या मागे लागतो.
सुंदर आहे! खरोखर फार सुंदर आहे!!

शब्दखुणा: 

घुसमट

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

आत्ममग्न हुंदक्यांचे
मखमली काळे कोष
कोणाचा पाय मोकळा
कोणाच्या कपाळी दोष

भावनांची सालपटे
अविश्वासाचा आसूड
रान सुकलेही नाही
पेटली उन्मादी चूड

धुमसत्या निखार्‍यांचा
गर्भ गोठलेला पार
वाटा हजार दिशांच्या
बंद एकुलते दार

जीवघेणी तटस्थता
आत धुमसे वादळ
सुखी भविष्याची आस
रिती काळाची ओंजळ

विषय: 
प्रकार: 

हट्ट!!!

Submitted by मुग्धमानसी on 21 January, 2013 - 07:21

’ती’ आजही नेहमीसारखीच बसली होती खुर्चीत... खिडकीच्या बाहेर डोळे लावून.

थंडीतली उबदार दुपार होती. खिडकीबाहेर अंथरलेला रस्ता थोडासा सुतावल्यासारखा निवांत उन खात पहूडला होता. हा रस्ता एरवीही तसा निवांतच असायचा. हे घरच तसं आडवाटेला. शांत, निवांत परिसर. येणारे जाणारे या ’एरिया’चं कौतुक करायचे. पण शांततेतलाही गोंगाट ज्यांना ऐकू येतो... त्यांनी कुठे जावं?

शब्दखुणा: 

लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (पूर्वार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 20 January, 2013 - 08:06

...सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या माथ्यावरून असंख्य डोंगरवळया, घळी, ओढे, झुडपं, कारवीचे टप्पे अश्या मार्गावरून खडतर भटकंती चालू होती. ६-७ तासांच्या सलग चालीनं, चढ-उतारानं पाय कुरकुरताहेत, पाठीवरच्या हॅवरसॅकचं वजन चांगलंच जाणवतंय आणि आजच्या मुक्कामाच्या जवळपासही पोहोचलो नाहीये. अश्यावेळी पुढच्याच वळणाआड दडलेला एक ओहोळ खळाळत सामोरा येतो. थंड पाण्यानं, दाट झाडो-यानं आणि सगळा आसमंत प्रसन्न करणा-या रंगीबेरंगी फुलपाखरांनी आम्ही सुखावतो. जुन्या ट्रेक्सच्या आठवणी निघतात, हास्यकल्लोळात स्थळ-काळ-वेळेचं फारसं भान राहत नाही अन भटकंतीची रंगत वाढतच जाते...

असं वाटत नाही..

Submitted by Manasi R. Mulay on 20 January, 2013 - 06:29

“तसा इकडे दुष्काळच पडलाय आता..
काळे ढग फक्त कधीकधीच दाटून येतात..
आपल्या गावातली नदी दुथडी भरून वाहत असायची कधीकाळी..
आता मात्र किनाऱ्यावर फक्त आठवणींचे शहारे वाहून येतात.
तिच्यामध्ये चिंब भिजणाऱ्या दगडगोट्यांना पोरकं करून नदी आटून गेलीये केव्हाच..
खळाळत्या पाण्याचे आभास फक्त स्मृतींमध्येच डोकावतात.
तसं कधीमध्ये आलेले कृष्णमेघ बरसतातही...
सूर्याच्या साक्षीने रिमझिमता इंद्रधनू अचूक वेधतोही वसुधेला..
पण काही झालं तरी नदी आता पूर्वीसारखी दुथडी भरून वाहत नाही हेच खरं..!
मध्ये एकदा असाच पाऊस रुसला होता..तेव्हा तलावात, कुठे खोलवर विहिरींमध्ये साठलेल्या पाण्यावर निभावलं गावाचं..

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन