लेखन

गुलमोहोर

Submitted by योगितापाटील on 4 February, 2013 - 02:25

डोळ्यांसमोर असणारा गुलमोहोर
दिसला कसा नाही मला इतके दिवस?
त्याचा लाल,भरगच्च बहर आजच का येउन भिडला डोळ्यांना?
बरोबर.....
आजच ऐकवलस ना तू मला गाण...
गुलमोहोर गर तुम्हारा नाम होता....
तेंव्हापासून प्रेमातच पडलेय बघ त्या गुलमोहोराच्या
तू नसलास ना तरी....तो असतो रोज डोळ्यांसमोर
तासन तास गप्पा चालतात माझ्या त्याच्याशी
सुखावत राहतो त्याचा बहर डोळ्यांना
आणि तू आल्यापासून तसाच बहर
माझ्याही आयुष्यात आलाय याचीपण जाणीव करून देत राहतो बघ
तू मनात भरून राहतोस ना तसाच.....
अगदी तसाच
तोही भरून राहतो मनात
देत राहतो मला उर्जा तशीच ....
जगण्याचा दिलासा.....
थोडासा गारवा....

विषय: 

गणेशोत्सव-बुखारेस्टमधला !

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 2 February, 2013 - 12:32

"अगं मारिया, उद्या अनंत चतुर्दशी. दयाळ काकान्कडे जायचंय उद्याचे नैवेद्याचे मोदक करायला. येतीयेस ना?" माया फोन वर आपल्या चेक मैत्रिणीशी बोलत होती (चेकोस्लोवाकिया ह्या देशाचे स्लोवाकिया व चेक रिपब्लिक असे विभाजन झाले.)

"आटोपलं आहे माझं, माया. आता निघतेच आहे. मोदक झाल्यावर मुलींना शाळेतून आणायला जाऊ." असं म्हणत मारियाने रिसिव्हर ठेवला. बुखारेस्टला आल्या पासून गेली चार वर्षे ती नैवेद्याचे मोदक करायला दयाळ काकांकडे जात असे.

विषय: 

"रानमोगरा - माझी वाङ्मयशेती" दूरदर्शनवर

Submitted by अभय आर्वीकर on 2 February, 2013 - 09:42

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

Submitted by तुमचा अभिषेक on 2 February, 2013 - 02:54

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खरे तर नावातच ऑर्कुट असल्याने हे वेगळे सांगायला नकोच, तरी साधारण २००७ सालाची असावी. नक्की महिना आठवत नाही पण वातावरणनिर्मितीसाठी थंडीचा पकडून चला. मी २००६ साली कॉलेज पासआउट होऊन माझा पहिलाच जॉब करत होतो, ज्याला साधारण वर्ष झाले होते आणि आयुष्यात बर्‍यापैकी आर्थिक स्थिरता आल्याने सामाजिक गरजा भागवायला म्हणून ऑर्कुटवर पदार्पण केले होते. त्यामुळे तसा मी ऑर्कुटवर अगदी नवाकोराच होतो. आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो, पण तेव्हा दोन कवडीचा सामान्य ऑर्कुटर्सही नव्हतो.

विषय: 

प्रेम करणं सोपंच असतं...!!!

Submitted by मुग्धमानसी on 1 February, 2013 - 00:23

प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतं एक मन
मनात थोडं ओलं काही
बीज कुणाचे रुजेल सहजी
अशी कोवळी जमिन काही
नातं रुजणं, उमलुन येणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतो एक पाट
पुजेचं ताम्हण नी नैवेद्य ताट
रिकामा गाभारा करावा स्वच्छ
सोवळ्या आशेची तेवावी वात
देवाचं येणं, श्रद्धेचं रुजणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतं एक घर
भिंती नसल्या तरी चालेल
घरापुढच्या अंगणात
कुणीही येऊन रोप लावेल
घर भरणं, बहर फुलणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतं एक आभाळ
गद्गदणारं, गुदमरणारं
फक्त एका हाकेसाठी

शब्दखुणा: 

उपाय

Submitted by छायाचित्रकार on 31 January, 2013 - 23:53

पहाटे सारं शहर
चांदण्यांची चादर लपेटून
निपचीत पसरून गेलेलं
...
त्याची पावलं मात्र त्या जीवघेण्या थंडीत
आसरा शोधत पुन्हा पुन्हा
स्वतःची समजूत घालत होती...
अखेर थोडीशी उब मिळालीच त्याला
एक एक चित्र राख होत राहिल
सुर्य ऊगवे पर्यंत .....

विषय: 
प्रांत/गाव: 

लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (उत्तरार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 30 January, 2013 - 20:18

दुर्ग रायगडाच्या दुर्गमत्वाचं कोडं सोडवण्यासाठी, आसपास दाटीवाटी केलेल्या अजस्र सह्यरांगांतून आडवाटेच्या घाटवाटांचा वेध घेण्यासाठी भटकंती चालू होती. पहिल्या दिवशी काळ नदीच्या खो-यातील पाने गावातून ट्रेकर्सना अनोळखी अशी ‘निसणी’ची वाट चढून, सह्याद्रीच्या अस्पर्शित भागांना देत घाटमाथ्यावर सिंगापूर गावी पोहोचायला तब्बल एक दिवस लागला होता. रायलींग पठारावरून दिसणा-या विराट दृश्यानं खुळावलो होतो..
वाचा पूर्वार्ध: http://www.maayboli.com/node/40397

गुपित

Submitted by rmd on 29 January, 2013 - 00:27

( माझ्या मैत्रिणीची कविता इथे पोस्ट करत आहे अर्थात तिची परवानगी घेऊनच! Happy )

आकलनाच्या पलिकडले
पण अनाकलनाच्या अलिकडले
आयासाच्या पलिकडले
पण अनायासाच्या अलिकडले
विचारांच्या क्षितीजावरचे
आचारांच्या डोहाखालचे
एक गुपित सांगते सख्या...

रात्री घोरणे बंद कर!

विषय: 

कपाची कैफियत

Submitted by सुरेश शेठ on 28 January, 2013 - 15:36

कप म्हणाला बशीला
चहाचे चटके बसतात मला
शिक्षा असते धरून कान
सारे करती बशीने चहापान ।।१।।

कप म्हणाला बशीला
नाजूक करांनी धरती तुला
प्रेमाची फुंकर तुझ्या नशीबाला
युवती तुला लावती ओठाला ।।२।।

कप म्हणाला बशीला
घाण साचे माझ्या तळाला
धुतल्यावर देखील मी टांगलेला
तुझा देह मात्र ऐटीत विसावलेला ।।३।।

कप म्हणाला देवा देवा
मला आता बदल हवा
कपाचे कामी आले कष्ट
बशीचे राज्य झाले नष्ट ।।४।।

विषय: 

बालक पालक आणि मी

Submitted by तुमचा अभिषेक on 28 January, 2013 - 10:38

बाप हे दोन प्रकारचे असतात...!!

एक बाप तो असतो जो घरी यायची वेळ होताच मुले त्याच्या धाकाने खेळमस्ती दंगागाणी बंद करून अभ्यासाचे पुस्तक उघडून बसतात.
तर एक बाप तो असतो जो घरात शिरताक्षणीच त्याची मुले आनंदाने नाचत बागडत येऊन त्याला बिलगतात.

शेवटी आपले स्वत:लाच ठरवायचे असते की आपल्याला यातला कोणता बाप बनायचे आहे....!!

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन