लेखन

मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम एस टी वाय : कथा २ . चेन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्नई एक्स्प्रेस्स..!

Submitted by संयोजक on 12 September, 2013 - 04:49

एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्टं थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखिका: नंदिनी

कथा: चेन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्नई एक्स्प्रेस...

चेन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्नई एक्स्प्रेस... सार्‍या आसमंतात तोच एक आवाज निनादून राहिला.

विषय: 

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-४

Submitted by अत्रुप्त आत्मा on 11 September, 2013 - 14:05

भाग-३ http://www.maayboli.com/node/45079 >>> पुढे चालू..

आणखि एक गमतीदार,चवदार,व लज्जतदार विषय.संपूर्ण विषय ऐकल्यावर ,यातल्या गमती कोणत्या?चव कोणती? लज्जत कोणती? आणी या गोष्टी चाखणार्‍यांची नक्की दारं कोणती? हे न कळल्यामुळे तुमचीही अवस्था विधानसभे सारखी त्रिशंकू होइल,यात शंका नाही.............

=============================

जखमे सारखं

शब्दखुणा: 

कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!

Submitted by मुग्धमानसी on 11 September, 2013 - 07:28

सांधायला गेलं की तुटतंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!

डोळ्यांच्या आत... बाहेर जगात...
ढगातल्या पाण्याला नसतेच जात!
बघावं तेंव्हा काळीज फोडून
आत आत कुणीतरी रडतंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!

मनात तसंही नसतंच काही
अगदिच नसतं असंही नाही
मनाच्या गाळात खोल खोल तळात
जीवात काहितरी रुततंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!

सगळंच तसं चाललंय छान
नियमित बहरून येतंय रान
मातीच्या खाली ओल्या पावली
हळूहळू रान सारं जळतंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!

स्पर्शानं आताशा मोहरत नाही
ठरवून सुद्धा काही आठवत नाही!
सोबत नी गप्पा नी वाट नी धुकं...
सगळंच अलवार झालंय मुकं.

शब्दखुणा: 

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

Submitted by डॉ अशोक on 10 September, 2013 - 12:23

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

रोगावर उपचार करतांना पेशंटला टेन्शन असतं तसंच डॉक्टरवर ही असतं. कालांतरानं डॉक्टरांना याची संवय होते. पण समजा की पेशंटला मुळातच काही आजार नाही तर मग? तुम्ही म्हणाल मग काय प्रॉब्लेम आहे? टेन्शनचं कारणच काय? तर मग ऐका :आजारच नसलेल्या पेशंटची कहाणी.

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ६ (प्राची)

Submitted by संयोजक on 10 September, 2013 - 09:22

मायबोली आयडी : प्राची
पाल्याचे नाव : मिहिका
वय : नऊ वर्षे

MBupkram.jpg

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ५ (प्राजक्ता३०)

Submitted by संयोजक on 10 September, 2013 - 02:03

मायबोली आयडी : प्राजक्ता३०
पाल्याचे नाव : श्रीया
वय : ६ वर्षे

Shreeya letter2-001.jpg

पत्रातला पूर्ण मजकूर श्रीयाचा आहे. मराठी अक्षरे कशी काढायची ते सांगण्याची आणि तिने पेन्सिलने लिहीलेले पत्र पेनने ट्रेस करण्याची मदत माझी आहे. पत्र पूर्ण लिहून आणि सजवून झाल्यावर आठवले की गणपतीचा माऊस काय खातो आणि त्याला चीज आवडते का, त्यामुळे असलेल्या थोड्यशा जागेत ताजा कलम लिहीलेला आहे. मी गणपतीला पत्र लिहील्यावर मला त्याचे उत्तर येईल का हा प्रश्ण सध्या सतावतो आहे.

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ४ (डेझी)

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 16:18

मायबोली आयडी : डेझी
पाल्याचे नाव : ऋचा भट
वय : साडे आठ वर्षे

Bappa-Letter-Marathi.jpg

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ३ (अवना)

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 08:34

मायबोली आयडी : अवना
पाल्याचे नाव : अवनीश
वय : सहा वर्षे तीन महिने

IMG_7363.JPG

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. २ (जयु)

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 08:21

मायबोली आयडी : जयु
पाल्याचे नाव : प्रांजल
वय : साडेसहा वर्षे

DSC_0405(1).jpg

पत्राचा मसुदा मुलीचाच आहे. मी फक्त जोडाक्षरे लिहायला मदत केली.

हा प्रांजलच्या सीक्रेट खजान्याचा फोटो :-

secret khajana.jpg

- जयश्री

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. १ (अल्पना)

Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 06:03

मायबोली आयडी : अल्पना
पाल्याचे नाव : आयाम देपुरी
वय : सव्वापाच वर्षे

Aayam (Alpana)_letter to Bappa.JPG

या पत्रातले शब्द, वाक्य पुर्णपणे मुलाचे आहेत. त्याला पत्र नक्की काय असतं हे माहित नव्हतं. त्यासाठी मी त्याला गणेशोत्सवाची जाहिरात वाचून दाखवली होती. तसेच पत्राचे मायने काय काय असतात, शेवटी काय लिहितात हेही सांगितले होते. त्याने पत्राचा मजकुर मला सांगितल्यावर मी आधी पत्र लिहून काढले आणि मग त्याला डिक्टेट केले. त्यासाठी त्याला कुठे काना /मात्रा/ वेलांटी द्यायची हे सांगितले.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन