लेखन

अजून चालतोची वाट !

Submitted by किंकर on 7 March, 2013 - 21:38

आजही प्रवास सुरूच आहे. त्याला अंतच नाही. क्लारा झेटकिन ते ऑंग सान सू कि ,झाशीची राणी ते मलाला युसुफझाई ,माया त्यागी ते ज्योतीसिंग पांडे अजूनही वाट बिकटच आहे.

८ मार्च १९०८ रोजी मतदान ह्क्कासाठीचे न्यू यॉर्क मधील महिलांचे आंदोलन असो किंवा दोन दिवसांपूर्वीचे तरन तारण येथील एका पिडीत महिलेचे एकाकी आंदोलन असो,जगण्याच्या प्राथमिक हक्काची लढाई स्त्रीला अजूनही लढावीच लागत आहे.आणि हाच आपला सर्वात मोठा पराभव आहे.

'तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई'....

चंद्र हरवला आहे

Submitted by kaushiknagarkar on 7 March, 2013 - 11:29

चंद्र हरवला आहे

चेहेरा गोल, उजळ वर्ण.
चेहेऱ्यावर काळे वण, पण एकंदरीत देखणा अाहे.
तरणाबान्ड दिसत असला तरी वय बरेच अाहे.
स्वभाव जरा एककल्ली अाहे.
एकच गोष्ट परत परत करण्याची आणि एकटयानेच फिरायची सवय.
अाहे तसा रात्रींचर पण दिवसाही कधी कधी दिसतो.
मात्र तेंव्हा त्याची ही ऐट, ही चमक उसनी आहे हे समजून येते.

तर हरवला आहे काल संध्याकाळ पासून.
परवा शुक्राच्या चांदणी बरोबर फिरायला जायचे त्याने कबूल केले होते.
पण तो आलाच नाही.
मग ती रूसली, रागाने लखलखली. आणि आता ढगाच्या पडद्याआड गेली आहे.

आणून देणारास येण्याजाण्याचा खर्च अाणि योग्य ते बक्षिस देऊ.

शब्दखुणा: 

श्रवणभक्ती -सध्यस्थिती

Submitted by पुग on 7 March, 2013 - 03:10

॥ "श्रीराम" ॥

श्रवणभक्ती -सध्यस्थिती

दासबोधात रामदास स्वामींनी नवाविधाभक्ती सामान्य मनुष्यास कळेल अशी सांगितली आहे.

समर्थांना काय अपेक्षित होते व आज आपल्याला समाजात आज बहुतांशी काय दिसते याची तुलना करण्याचा हा प्रयत्न आहे

प्रथम भजन ऐसें जाण| हरिकथापुराणश्रवण |
नाना अध्यात्मनिरूपण| ऐकत जावें ||७||

स्मरणिका आवाहन

Submitted by eliza on 6 March, 2013 - 15:28

BMM अधिवेशनाचा अविभाज्य भाग म्हणजे 'स्मरणिका'. स्मरणिका साहित्यासाठी आवाहन हे BMM संकेत स्थळावर येथे http://bmm2013.org/conventionactivities/bmm-smaranika.html उपलब्ध आहे. आम्हाला आतापर्यंत साहित्य मिळालेले आहे पण जूनही दर्जेदार साहित्याची नितांत गरज आहे. आपण स्मरणिकेसाठी साहित्य पाठविले तर आम्हाला मदत होईल. ह्याबरोबरच काही व्यंगचित्रे पण हवी आहेत.

आयटी कंपनी मधील कामाची माहिती हवी होती

Submitted by Prajakta C. Kulkarni on 5 March, 2013 - 00:24

मोठ्या आणि मध्यम software / IT कंपन्यांमधुन कोणत्या प्रकारची , लहान मोठ्या स्वरुपाची कामे बाहेर करण्यासाठी दिली जातात का? या बद्दल सखोल माहिती हवी होती.
माझे MCS झाले आहे , म्हणजे काही कामे मला देखिल करता येतील.

विषय: 

स्त्री ????

Submitted by Trushna on 3 March, 2013 - 23:38

download.jpgमी या पुरुषप्रधान समाजात वावरणारी आजची स्त्री , हुंडाबळी,विनयभंग ,अत्याचार, छेड-छाड, बलात्कार ,स्त्री-भ्रूणहत्या , अश्या अनेक समस्यांशी झुंजणारी , सहनशिल्तेचा अंत होईपर्यंत सहन करणारी आणि शेवटी स्वताला संपवणारी .पण याला जबाबदार कोण ? या कोल्ह्या-लांडग्यांच्या ,गावगुंड पातळीवर उतरलेला समाज कि स्वतः स्त्री ? हे प्रश्न मनाला वेड लावतात. म्हणूनच स्त्रीयांचे प्रश्न मांडण्याचा हा एक प्रयास

विषय: 
शब्दखुणा: 

बोल बच्चन बोलः सिंडरेला

Submitted by संयोजक on 28 February, 2013 - 02:36
Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: सिंडरेला
पाल्याचे नावः इशान
वयः ५.८ वर्ष

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन