लेखन

आस

Submitted by पुरंदरे शशांक on 27 September, 2017 - 01:09

आस

चित्ती असो द्यावा येक
बरवा वैकुंठनायक ।।

नाम मुखी वसो सदा
लोपो ऐहिक सर्वदा ।

संतसंगती लाभावी
बुद्धी गोविंदी वसावी ।

हरीरूप व्हावे सारे
नयो मागुते अंधारे ।।

अास हीच जागो चित्ती
दान द्यावे रखुमापती ।।

........................................

आस = इच्छा

अवचित भेटलेलं देऊळ..

Submitted by सनव on 26 September, 2017 - 16:28

रविवारी देवळात जायचं आहे..' काकांनी आधीच आम्हाला बजावून ठेवलं होतं. आम्ही फार नियमितपणे देवळात जात नाही. पण काकांनी सांगितलं होतं म्हणून सगळी गँगच निघाली. नन्तर सगळे एकत्रच जेवणारही होतो. रविवारी देवळात पोचलो, गाड्या पार्क करून देवळात प्रवेश केला. सुटीचा दिवस असल्याने भारतीय भाविकांची एकच गर्दी देवळात झाली होती. लोक खास भारतीय पोशाख करून आले होते. देवळात प्रवेश करणे व दर्शन घेणे यासाठी काही चार्ज नव्हता. पण काही स्पेशल पूजाअर्चा करायची असल्यास पैसे लागत होते. काही प्रसाद मोफत होते. काही स्पेशल प्रसाद विकत घ्यायचे होते. एकूण काहीतरी transaction चालू असल्याचे फीलिंग वातावरणात येत होते.

कविता

Submitted by मी मीरा on 26 September, 2017 - 05:44

कुटुंब / फॅमिली

काळोखी नकारात्मक रात्र पार करून मिळणारी सुखाची रम्य पहाट
म्हणजे फॅमिली
रणरणत्या उन्हातून परतून प्रेमाच्या सावलीत मिळणारा निवांतपणा
म्हणजे फॅमिली
तहानलेल्या घश्याला गोड थंडगार पाण्याने मिळणारी शांती
म्हणजे फॅमिली
थंड हवेच्या झोकात कधी तरी हवी असणारी मऊ ऊबदार जाणीव
म्हणजे फॅमिली
बाहेरच्या कटकटीतून सुटल्यावर मनाचा आवडता विरंगुळा
म्हणजे फॅमिली
पैश्याच्या मागे धावून दमल्यावर पाहिजे असणारा एकमेव निवारा
म्हणजे फॅमिली
काहीही न मागता सगळे मिळणारे खात्रीचे हक्काचे ठिकाण
म्हणजे फॅमिली

विषय: 

विवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-२

Submitted by अतरंगी on 25 September, 2017 - 10:22

The following content may contain the elements that are not suitable for some audiences, viewer's discretion advised.

भाग १ :- https://www.maayboli.com/node/63974

"तुला किती वेळा सांगितलं की तू धुतलेली भांडी ओट्यावरच ठेवत जा. त्या कप वर डाग अजून तसेच आहेत. "

मुलाचे खेळणे दुरुस्त करण्यात रमलेला मी आणि चहाच्या कपात अडकलेली बायको..."दाग अच्छे होते है।" वगैरे डायलॉग मारण्याचा मोह आवरून मी खेळण्यावर लक्ष केंद्रित केले.

" पण चहा कोणासाठी केला होतास ?"

फोन बूथ

Submitted by अविनाश जोशी on 25 September, 2017 - 05:57

फोन बूथ
मला अचानक जाग आली.
मी दचकून जागा झालो.
मी म्हणजे सुहास जावडेकर.
आजूबाजूला बघितलं तर मी रस्त्याच्या मधेच झोपलो होतो. उठून बाजूला गेलो. रस्ता निर्मनुष्य होता. मी इथे कसा आलो मला आठवेना. सकाळी घराबाहेर पडलो तेव्हा पॅन्ट, शर्ट, सॉक्स आणि बूट अशा कपड्यात होतो. आता मात्र वेगळेच कपडे होते. खिशात हात घातला तर खिसाच नव्हता. नाही म्हणायला पॅन्ट मात्र माझीच होती आणि त्यात दोन तीन रुपयाची चिल्लर होती.
दुपार झाली हे कळत होत पण किती वाजले हे कळायला मार्गच नव्हता हातातले घड्याळही नव्हते.

विषय: 

विखंची ज्ञानवर्धक शब्दअर्थावली

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 25 September, 2017 - 03:32

मायबोलीकर मित्र मैत्रिणींना सप्रेम नमस्कार.

आधुनिक जगात बऱ्याच गोष्टींचे संदर्भ बदललेले आहेत. डिक्शनरीत असलेले अर्थही चुकीचे ठरत आहेत, त्यांना समानार्थी पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपणासही समाजात वावरताना सहाय्यक ठरावेत असे काही ज्ञानवर्धक शब्द त्यांच्या खऱ्या अर्थांसकट टाकत आहे.
(Italics मधे लिहलेला पहिला शब्द डिक्शनरीतील पारंपरिक अर्थ आहे. आधी तो वाचावा.)

चुंबन :
> कलेचा एक प्रकार
> थिएटरमधे चित्रपट सुरू असताना कोपऱ्या - कापरऱ्यांमधे सुरू असलेला गंमतपट
> वादळाची सुरुवात

'जे अ-क्षर असेल, ते टिकणारच!' - मुलाखत - श्री. अरुण साधू / श्री. आल्हाद गोडबोले

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे दिला जाणारा २०१६ सालच्या साहित्य जीवनगौरव पुरस्कार श्री. अरुण साधू यांना दिला गेला. त्यानिमित्त श्री. आल्हाद गोडबोले यांनी घेतलेली श्री. साधू यांची मुलाखत या वर्षीच्या जानेवारी महिन्यातल्या 'साधना'मध्ये प्रकाशित झाली होती.

अरुण साधू यांची ही कदाचित शेवटची मुलाखत असावी.

श्री. अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.

***

maharashtrafoundation2016PDF-14.jpg

विषय: 
प्रकार: 

‘मनी रुतले क्षण………..’

Submitted by निर्झरा on 23 September, 2017 - 05:40

‘मनी रुतले क्षण………..’
खुप वैतागले होते आज. दिवसभर नुसती चिडचिड. बरं ती का होतेय ते पण कळेना, त्यावरून अजून चिडचिड. घरात असते तर राग बाहेर काढायला हक्काच माणूस तरी मिळाल असत. ईथे ऑफिस मधे कुणाला धरू……. शेवटी पर्स उचलली आणि तडख कोणाला काही न सांगता ऑफिस मधून बाहेर पडले. घर गाठल. पण तिथही मन लागेना. मला शांतता हवी होती. कोणी नको होत आजू-बाजूला. मी खोलीचा दरवाजा बंद केला. नवरा घरातच होता. त्यालाही माझ्या या वागण्याची सवय झाली होती. त्यामुळे तोही मला डिस्टब करयाला आला नाही.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन