लेखन

कुणास्तव.. कुणीतरी.. (कथा)

Submitted by डीडी on 19 March, 2013 - 00:37

भर दुपारची वेळ. डोक्यावर तळपता सुर्य आग ओकत होता. शिवाने आपला मोर्चा एका वस्तीकडे वळवला.

शिवा… मध्यम वयाचा, गरीबीनी गांजलेला इसम. सतत उन्हातान्हात फिरल्यामुळे रापलेला निबर वर्ण, पायात जुनाट स्लिपर्स, अंगात कळकट्ट कपडे, डोक्यावर जीर्ण टोपी, हाताशी मोडकळीला आलेली सायकल, सायकलच्या हॅंडलला दोन्ही बाजूला लटकवलेली गोणती, कॅरियरला बांधेलेली ट्यूब आणि तोंडात ठराविक पद्धतीने घालायची साद “ए भंगार बाटली रद्दीSSSSS”

आज काही मनासारखी भंगार खरेदी झाली नव्हती. संध्याकाळी आदिलशेठला काय विकणार, आणि गाठीशी पैसा कसा साठणार हिच चिंता. आदिलशेठ म्हणजे भंगार खरेदी करणारा दलाल.

विषय: 
शब्दखुणा: 

अंड्याचे फंडे ३ - छंद

Submitted by अंड्या on 17 March, 2013 - 11:24

"क्या दगडूशेट, सुबह सुबह लॉलीपॉप.."

ह्यॅं ह्यॅं ह्यॅं अंड्या, तू नाही सुधारणार बघ बोलत दगडूने शेवटचा झुरका मारत दातात खोचलेल्या बिडीचे थोटूक रस्त्याकडेच्या गटारात फेकले आणि अण्णाला कटींगचा आवाज देतच आमच्या दुकानात एंट्री मारली.

विषय: 
शब्दखुणा: 

स्त्रियांचे राज्य

Submitted by सचिन पगारे on 16 March, 2013 - 06:14

काळ झपाट्याने बदलत चालला होता बघता बघता ३००० वे साल उजाडले. ह्या एवढ्या वर्षात बरेच बदल झाले होते.आपल्या भारतात आता स्त्रियांचे राज्य आले होते.सर्व प्रमुख पदांवर स्त्रिया कार्यरत होत्या. पुरुषांनी त्यांच्यावर हजारो वर्षापासून केलेल्या अत्याचारांची सव्याज भरपाई करत होत्या.

गायात्रीबाई ह्या देशाच्या मुख्य होत्या. त्या अत्यंत सनातनी वृत्तीच्या होत्या.त्यांनी सत्तेवर आल्या आल्या समस्त पुरुषांची पंचाईत करून ठेवली होती. ‘वंशाचा दिवा’ हि पुरुषांची पदवी जाऊन त्या एवजी ‘वंशाची टूबलाईट’ हि नवी पदवी स्त्रियांना मिळाली होती.

विषय: 

ब्रम्हदेवाची पृथ्वी

Submitted by सचिन पगारे on 16 March, 2013 - 00:21

आपली हजारो वर्षाची झोप पूर्ण करून ब्रह्मदेव नुकतेच उठले होते.ब्रह्मदेव जागे झाल्याची बातमी जशी त्रिलोकात पसरली, तसे त्यांना भेटायला देवगण हे ब्रह्मलोकात जमा झाले.जग बनवण्याच्या कामात अत्यंत श्रम पडल्याने त्यांनी हि हजारो वर्ष झोप घेतली होती.

विषय: 

ती आली

Submitted by आपटे सुरेखा on 15 March, 2013 - 06:03

ती आली
स्वप्नांचे पर लेऊन आली
फुलांची उधळण उधळत आली
ती आली ती आली
स्वच्छंदी पाखरं अधिकच बिलगली
शीतल चांदणं पांघरून राहिली
निर/भ आकाश अनुभवताना
प्रसन्न पाहाट मोकळं हसली
ती आली ती आली
दंवाची कोमलता तिच्या मनांत
अना/घात कळीची मोहकता तिच्या डोळ्यात
वा-याची हाळी तिच्या शब्दात
मखमाली ॠजुत तिच्या स्पर्शात
ती आली ती आली
सोनेरी सूर्य सागरकिनारी
तृप्तीचा आनंद अंतरी बाहेरी
उंच भरारीची जय्यत तयारी
अन् नजर मात्र घरटयावरी
ती आली ती आली.

विषय: 
शब्दखुणा: 

हाडळीचा मुका

Submitted by बाबूराव on 14 March, 2013 - 03:29

हाडळीचा मुका

मानसं मस जमलि व्हति. म्हनजि तसं कारन घडलं व्हतं. शुंगार टेलर वाल्या का़का टेलरचं पोरगं घर सोडुन गेल्तं. काका टेलर अन त्याच्या बायकुचं रोजचं कडाक्याचं भांडान असायचं म्हनुन कोनच त्येंच्या घरच्या भानगडित पडायचं नाय. पण काल रातच्याल काकीचा लैच येगळा आवाज आला अन तिनं हांबरडा फोडला का, तवाच पब्लिक जमा झालं.

बालमजूर

Submitted by psajid on 13 March, 2013 - 06:34

बालमजूर
श्री. साजीद यासीन पठाण

आठ तासांच्या चक्रात बाबा
माझं बालपण हरवून गेलं,
अकाली प्रौढत्व दिलंत तुम्ही
माझं खेळायचं राहून गेलं ........!

दारिद्र्याचा बजावण्या खड्डा
लहान भावाला संगती न्हेलं,
हुशारीची मलाच वाटली लाज
दप्तर फेकून हाती खोरं घेतलं ........!

यशाची माझ्या देऊन हमी
मास्तरांनी हुशारीचं दिलं दाखलं,
म्हणालात तुम्ही त्यानला
“ पोटी माझ्या चार मुलं - ...........

इतक्या मोठ्या दुनियेत मास्तर
माझं पोरगच का अडाणी ऐकलं,
शिकूनच का भाकरी मिळते
किती अडाणी उपाशी मेलं ........?

माझं हातपाय थकलं आता

विषय: 
शब्दखुणा: 

जल्ला मेला फेसबूकच्या आवशी चो घो (मालवणी फोडणी)

Submitted by सत्यजित on 12 March, 2013 - 18:36

गाव वाल्यान्नू फेसबूकान लई वात आणलेलो असा, ह्याचा काय कारुचा मका सुचाक न्हाय म्हणुन ह्या गाणा. ह्या कोळी गीताच्या (हिच काय गो) चालीवरचा मालवणी गीत असा, कसा वाटता ता नक्की कळवा बरे..

हाडलाय गो कुठुनशी मोबाईल, मारता मेलो स्टाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल

फोटोंका करता लाईक
टाकता फाल्तू कमेंट
मोबाईलचो माज इलो
व्हयी कशाक इतकी घमेंड?
लाळ गाळता बघुन आयटम चेडवांचे प्रोफाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल

काय करतंय देता हो
कशाक स्टेटस अपडेट?
परसाक गेल्यार थयसुन
केल्यान लोकेशन अपडेट
मित्रांनी इचारला ह्याका बरो असा का रे पाईल?

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन