लेखन

तू लिही तू लिही

Submitted by रोहितगद्रे१ on 2 April, 2013 - 11:22

तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
खांद्या वरून डोकवून
नाहीतर तिरप्या नजरेतून
पण ठाव त्यांच्या शब्दांचा
लागल्यावरच लिही
तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
तसं येत नसेल तर असही चालेल
अरे मीटरमधे असेल तर हेही चालेल...!
ते तिकडे काय पडलाय ते दाखव की
अरे हेच ते...हेच शोधत होतो मी...!
बाकी असू दे...नंतर वाचू
इथे खपत नाहीत रे माणिक अन पाचू
चल येतो...चाल लावायची आहे
शब्दांना पांघरायला शाल विणायची आहे
गप गुडूप झोपतील शब्द ओढून उबदार शाल
हिशेबाच्या युद्धामध्ये सूरच होतील ढाल

नव्हतास कधी तू जेव्हा...

Submitted by अमा on 2 April, 2013 - 06:14

नव्हतास कधी तू जेव्हा
मी जगून मोकळी झाले.

तुझी वाट पाहता पाहता
सगळेच भोगून जाहले.'

हे जगणे माझे आहे
ह्या वस्तू, ह्या अनुभूती.

शोधुनी ना सापडती
एकत्र क्षणांच्या स्मृती.

मृगजळापरी ते जगणे
अव्यक्त वेदना होते.

आता खर्‍या मनाने
मी माझे विश्व सजविते.

विषय: 
शब्दखुणा: 

...येणे झाले!

Submitted by मुग्धमानसी on 2 April, 2013 - 01:47

कधी अलवार पायांनी असे स्वप्नात येणे झाले
कधी बिजलीप्रमाणे तळपुनी निमिषात येणे झाले
जशी यावी फिरूनी ओठी नवथर ओळ गाण्याची
तसे माझे कितीदा फिरूनी या जगण्यात येणे झाले!

प्रवासी मीच होते, वाट मी अन् मीच मंझिल
सभोती किर्र तम मी, मीच हातातील कंदिल
तरिही या ’मी’पणाला वेचताना सांडलेल्या
क्षणांचे नकळता डोळ्यांतल्या पाण्यात येणे झाले!

दुरूनी ते शब्द आले भेटण्या... नवखेच होते
जरी मी आपले म्हटले तरी परकेच होते
सूरांना धाडले बोलावणे, डिवचले वेदनेला...
जरा तेंव्हा कुठे त्यांचे असे गाण्यात येणे झाले!

अताशा मी मलाही सोडलेले या प्रवाही
प्रवाहाला तसाही कोणता आकार नाही

शब्दखुणा: 

पुस्तक परिचय- 'द मिसमेजर ऑफ मॅन'

Submitted by लसावि on 1 April, 2013 - 23:48

सामान्य माणूस सहसा विज्ञान, वैज्ञानिक आणि एकंदरीतच शास्त्रीय प्रक्रिया याकडे एकतर जादूची कांडी (पुराणमतवादी असतील तर यक्षीणीची वगैरे!) किंवा अतीविशेष बुद्धी असलेल्या मोजक्या लोकांचे काम अशा दोनच टोकाच्या भूमिकेतून पाहतो. यात भर म्हणून ’सायन्सला तरी सगळे कुठे कळले आहे’ आणि ’आमच्या लोकांनी हे सगळे आधीच शोधले होते’ हे दोन आत्यंतिक पवित्रे आहेतच. या सर्वांमुळे विज्ञानाकडे पाहण्याची स्वच्छ नजर तयार होण्यास अडथळे येतात. ’विज्ञान हे मानवी कार्य आहे- सायन्स इज ह्युमन एंडेव्हर’ या दृष्टीने सर्व शास्त्रीय व्यवहाराकडे पाहिले जाणे फ़ार गरजेचे आहे.

तृष्णा

Submitted by rmd on 1 April, 2013 - 12:25

तुझ्या हातांच्या आंचेने
अलवार मला वितळू दे
तुझ्या स्पर्शाच्या ओढीने
स्पंदनांना पळू दे

भान सुटू दे सगळ्याचे
उन्मळू दे, तोल ढळू दे
विखुरण्यासाठीच आसरा
तुझ्या मिठीत मिळू दे

नको दुराव्याची शपथ
श्वासात तुझ्या मिसळू दे
सोसू दे धग देहाची
आज तुझ्यासवेच जळू दे!

विषय: 
शब्दखुणा: 

सांजवेळ

Submitted by सचिन पगारे on 31 March, 2013 - 08:22

दिगूअण्णा खिडकीच्या बाहेर बघत बसले होते. खाली जी मुले खेळत त्यांना बघणे, दिवसभर रहदारी बघणे. हा त्यांचा नेहमीचा क्रम होता .दिवस तर कसाबसा ढकलला जात असे पण संध्याकाळ मात्र उदासवाणी असे. ह्या सांजवेळी दिगूअण्णा नेहमीच अस्वस्थ असत.

आतल्या खोलीत मालतीबाई जपमाळ ओढत बसे. ह्या जोडप्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हते. घरात पैसा होता पण मायेच कुणी नव्हत. दिगूअण्णाना मालतीबाई नि मालतीबाईना दिगूअण्णा इतकेच त्यांचे विश्व.

विषय: 

अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद

Submitted by अंड्या on 31 March, 2013 - 05:29

जेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे "मीच तुझी रे चारोळी" नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. "तुला रं गण्या कधीपासून हा छंद?" या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, "अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं..

ऐन दुपारी.. नदी किनारी..
फेसाळलेल्या.. लाटांना पाहूनी..
तुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने..
घेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे..

विषय: 
शब्दखुणा: 

एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?

Submitted by लिलि के. on 30 March, 2013 - 07:26

आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का?

आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे.

Pages

Subscribe to RSS - लेखन