लेखन

जळ्ळं मेलं लक्षण ते..

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझी एक खुप जुनी कविता परत एकदा नविन मायबोलीवर..
Thursday, March 01, 2001 - 02:12 pm

जळ्ळं मेलं लक्षण ते..

चकाट्या पिटण्यात मित्रांबरोबर
तुमचं जिवन सार्थकी लागते
चला जरा माझ्याबरोबर म्हंटल
तर नाक ते लगेच चढते
असेल लागत वेळ थोडा

विषय: 
प्रकार: 

वृक्षवेलींच्या अन इतर आठवणी

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

लहानपणापासूनच वृक्षवेलींबद्दल मला जरा जास्तच माया. आजोळी, पणजोळी भरपूर झाडं. पणजोळी तर घरामागे छोटीशी आमराईच. एक भली थोरली विहीर देखील. भर दुपारी उन्हाच्या झळा मारतात, तेह्वा आमराईत जाऊन बसणे म्हणजे निव्वळ स्वर्गसुख!! एखादं पुस्तक घ्यावं अन कोणत्याही झाडाखाली बसून वाचत दिवस घालवावा! कोणी सोबत खेळायला नसलं तरी चालायचं अश्या वेळी. सख्ख्या नाही, पण सख्खे मामाही करणार नाहीत अशी माया करणार्‍या मामांबरोबर आणि घरच्या गडीमाणसांबरोबर आंबे पाडायला जायचे. पणजोळी पतवंडांचे कौतुक चालायचेच. गडी माणसेही आम्हांला अगदी लहानपणापासून पाहिलेली अशी होती.

विषय: 
प्रकार: 

ठिपक्यांची न बनलेली रेषा.....

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पांढर्‍याशुभ्र कोर्‍या कागदांपेक्षा त्या हॅन्डमेड पिवळसर रंगाच्या कागदांबद्दलचं माझं फॅसिनेशन खूप आधीपासूनचं.
त्यांचं ते फिक्कटसर खडबडीत अंग पाहिल्यावर त्यावरुन बोटं फ़िरवण्याचा मोह आवरता येत नाही.

विषय: 
प्रकार: 

ठळक बातमी???

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आज सक्काळी सक्काळी 'एक प्रतिष्ठित वर्तमानपत्र' वाचताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. अगदी 'मुख्य पानावरचीच, ठळक' बातम्यांमधली बातमी!! आणि सक्काळीच असली बातमी वाचून मला धन्य, थक्क, आश्चर्यचकीत आणि तत्सम जे काही असतं ते सगळच व्हायला झालं!! ही ती बातमी, तुमच्याही वाचनासाठी.....

विषय: 
प्रकार: 

गुणसुत्र

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

गुणसुत्र..

शृंगार रसाने ओतप्रोत भरलेल्या
अनेक रात्रीच्या मिलनानंतर
आपल्या प्रेमाचे फलित म्हणून
तुझा एक शुक्राणू अन्
माझा एक बिजाणू
येऊन भेटलेत परस्परांना
आणि रुजू लागले इवलूसे अंकूर
ह्या उदराच्या चिमुकल्या पिशवीत..

प्रकार: 

गगनी उगवला सायंतारा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

आमच्या इथे एक 'ज्येष्ठ नागरिक संघ' आहे. म्हणजे साठीच्या पुढच्या व्यक्ती एकत्र येऊन तयार झालेला एक ग्रुप आहे. सदस्यत्त्वाची किमान पात्रता वयाची साठ वर्ष पूर्ण.
त्यांच्या सभासदांची यादी ठेवणे, वर्गणी वगैरे काढायची असेल तर त्याची यादी, आलेल्या देणग्यांची यादी, हिशेब, फंड वगैरे कामं ते वाटून घेऊन करतात. नेमाने एकत्र येऊन मिटींगज्, परिसंवाद वगैरे कार्यक्रम करतात. कधी काही निमित्ताने तर कधी असंच नुसत्याच गप्पा मारायला म्हणून ते जमतात.

विषय: 
प्रकार: 

पुण्यातलं माथेरान

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पुणे शहराजवळ कोथेरूड जवळ एक टेकड्यान्ची रांग आहे. त्यातल्या एम.आय.टी. मागच्या टेकडीला वेताळ टेकडी म्हणतात. ही माझी आवडती जागा. तिथे गेलं की कसं प्रसन्न वाटत.

प्रकार: 

नव्याने लिहू लागलेल्या प्रत्त्येकाला..

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

(October 27, 2006)
सन्दर्भ :
अर्ध्या वाटेवर..
by , अरुणा ढेरे.
प्रकरण १३.
नव्याने लिहू लागलेल्या प्रत्त्येकाला:

विषय: 
प्रकार: 

आवाज

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझा आवाज हरवलाय असं कळल्यावर
ते सर्व गोंगाटवादी धावत आले.
त्यांच्या डोळ्यांत चिंता होती,
त्यांच्या आवाजात सहानुभूती होती.
मी काही बोलायच्या आतच त्यांनी
माझ्या आवाजाला शोधायला सुरूवात केली...

विषय: 
प्रकार: 

वेळ कुठाय?

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

वेळ कुठाय मला?
रोजचा हाच एक प्रश्न.. हेच एक उत्तर
मी किनई खूप बिझी आहे.
का?
का म्हणजे काय? खूप खूप काम आहे,
नक्की काय काम आहे..
माझं काम तुला सांगून समजणार आहे का?
बरंच काही करायचय. बर्‍याच ठिकाणी धावायचय.
अजून थोडं अडखळायचय.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - लेखन