लेखन

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ७ : कार्टा - mrinmayee

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 20:43

प्रवेशिका ७ : कार्टा

मूळ कविता : कविता

घासूनही न चमकलेले दात
पुसूनही न स्वच्छ झालेलं तोंड
विंचरूनही न बसलेले केस
ह्या सगळ्यांचं दिवसाच्या शेवटी
जेव्हा कळकट वाण होईल
तेव्हा तुझ्या पोटातल्या गुरगुरणार्‍या भुकेचं
काही एक न चालता, तुझ्या अकलेच्या उजेडातही
मी हाणू शकेन तुझ्या पाठीत
हाताला कधीपासून शिवशिववणारा सणसणित
रट्टा.....

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ६ : बिलंदर - slarti

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 20:39

प्रवेशिका ६ : बिलंदर

मूळ कविता : कविता

सुचूनही न लिहीलेले रसग्रहण
साथीच्या रोगातही न मारलेल्या राउंड्स
उंचावर नसूनही असणारी हिल स्टेशनं
या सार्‍यांचं शेवटी एकदाचं
जर अर्काइव्ह झालंच,
तर तुझ्या बिलंदरी असण्याचं
इंगित सापडेल आणि त्या अर्काइव्ह्जमध्ये
आम्ही पाहू शकू थेट तुझ्या पोस्टांत
आम्ही कधीच न ओळखलेला तुझा
मूआय (अर्थात, मूळ आयडी).......

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ५ : ओझ्याचा बैल - kavita.navare

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 20:34

प्रवेशिका क्र. ५ : ओझ्याचा बैल

मूळ कविता : कविता

नकाराच्या भीतीन मी न लिहीलेल प्रेमपत्र
रोझ डेला माझ्या हातून गळून गेलेला गुलाब
आमंत्रण येऊनही चुकवलेल तुझं लग्न
हे सारच आयुष्याच्या वळणावर
जेव्हा पुन्हा सामोरं येईल
तेव्हा ओझ्याच्या बैलासारखा;
वाकलेला नवरा मला दिसेल आणि त्या प्रसंगीही
मी वाचू शकेन थेट त्याच्या डोळ्यात
"साल्या, तू सुटलास नी मी झालो
फक्त ओझ्याचा बैल"

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ४ : हिशेब - Girish Kulkarni

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 20:30

प्रवेशिका ४ : हिशेब

मूळ कविता : कविता

शिकुन-सवरुनही न गिरवलेले धडे
ओढुन्-ताणुनही न आणलेल अवसान
मारुन्-मुटकुनही न सावरलेली घडी
या सार्‍यांची जेव्हां शेवटी
गोळा-बेरीज होईल.....
तेव्हां तुझ आळसात आयुष्य बुडवण्याच
एक मोठ्ठ वजाबाकीच गणित होईल अन त्यातही
मला करावेच लागतील...अगदी माझ्याच घरात
मी आयुष्यात कधीही न केलेले
हिशेब ......

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका २ : यमकांचं गमक - mkarnik

Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 20:55

प्रवेशिका २ : यमकांचं गमक

मूळ कविता : कविता

ना सुचूनही लिहिलेल्या त्या कविता,
खोडूनही ना फाटेल असा तो कागद,
फिरफिरून तासली तरि नाही जी झिजली
ती पेन्सिलही नि:शब्द अशी पडलेली.
जेव्हा….
तारीख दिलेली उलटुन गेलि असेल
तेव्हा त्या कागदावर….
काव्यप्रसववेदनांचे वांझोटे बिंब पडेल
अन् त्यातूनच मग वाचू शकेल वाचक
मज कधी न जमलेल्या यमकांचे गमक

कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका ६ : मुख्य पाहुण्यांचे भाषण - mkarnik

Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 20:44

प्रवेशिका ६ : मुख्य पाहुण्यांचे भाषण

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

रंग सभेचे क्षणाक्षणाला बदलत होते
सभाध्यक्ष अस्वस्थ असावे समजत होते

हे काय अचानक मुख्य पाहुण्या झाले आहे?
जे भांग चढवल्यापरी कसेही बरळत होते

याचीच लोक किति करीत होते चर्चा तेथे
कोणालाही न कुणाचे म्हणणे उमगत होते

पाहुणे पाजळत होते अक्कल आपली सारी
’भगिनींनो’ मधल्या ’भ’ वर टिंब उठवत होते

पहिल्या धारेची दारू रात्री कडकच होती
साध्या शब्दांवरही म्हणुनच अडकत होते

नव्हते झालेले पाठ तयांचे भाषण म्हणुनी

मंडळ - भाग २

Submitted by हायझेनबर्ग on 25 August, 2009 - 23:56

धुमसत्या युद्धभुमीवर, मांडीत रूतलेल्या बाणाची जखम भळभळत असतांना एखाद्या अज्ञात दिशेने कुठल्यातरी धूसर आशेवर निग्रहाने खुरडत खुरडत रांगणार्‍या जखमी सैनिकासारखा पाय उचलत तो मंडळाकडे चालत होता. तिरवड्याहून परतल्यापासून भयंकर त्रासदायक कल्पना आणि प्रश्न मनात, समुद्रात उठणार्‍या वावटळीसारखे थैमान घालत होते. प्रश्नांच्या उंचचउंच लाटा आणि उत्तरांचे भोवरे, फक्त एकातून दुसर्‍यात अडकत रहाणे, सुटका नाहीच.

कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका ५ : गुलमोहोर - tanyabedekar

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 12:06

प्रवेशिका ५ : गुलमोहोर

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

रुप माबोचे वर्षावर्षाला बदलत होते
कुणीतरी जुने असावे, नवे असे हे समजत होते

आज अचानक इथे मिळेना प्रतिसाद जनाचा
ह्याच चित्राला काल तिथे पण भरगोस होते

कशास होती सुरु तिथे ती चर्चा नक्की
बघाता बघता सगळेच काही(तरी) बरळत होते

मी काही ठरवून कंपूंना जूडत नाही
जे होते ते उपेक्षितांचे अंतरंग होते

प्रतिसादाचा रोख टिकेचा असेल तर मग
'वा, वा छान छान'चेही बहरात शिकरण होते

असेच हळवे उत्कट होते काव्य कालचे
जुळवत होते, पाडत होते.. पण यमकत नव्हते

कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका ४ : रंग मत्सराचे - girish kulkarni

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 11:58

प्रवेशिका ४ : रंग मत्सराचे

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

रंगढंग रोज तुझे नव-नवे बरसत होते
मत्सराचे आम्लपित्त असावे...समजत होते

का हा अचानक उलटे उसासे सोडू लागला
का त्याला रदीफ्-काफीया एव्हढेच अवगत होते?

त्याचा राग होता कशावर कोठे काही कळेना
त्याचे ताळतंत्र सुटले यावर मात्र सार्वमत होते

तो स्वताला यौवनाचा जालीम जाणकार म्हणवतो
घरच्या घरीच हाय त्याची केव्हढी फसगत होते

त्याचे विचारणे-बोलणे-लिहीणे बेलगाम इतके
साध्या सौजन्याचीही चटकन केव्हढी फारकत होते

बरे झाले त्याचा कुठेही संचार मोजकाच असतो

कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका ३

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 11:53

प्रवेशिका ३

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

घडोघडी अस्वस्थ मी रीफ्रेश मारत होते
काही नवे नाही ..सर्व्हर का निद्रिस्त होते

मायबोलीचीच पहावी का कुंडली कोणी
सगळेच असे का प्रेमकविता पाडत होते ?

कशास होती सुरू तिथे ती चर्चा नक्की?
कुडमुडे व्यासंगी धबाबा पोस्टत होते

खरेच का कळती कविता यांना
वाहवा! जे नित्यही म्हणत होते

कितीक परोपकारी शंकासूर येथे
मित्र मैत्रिणींच्या अडचणी विचारत होते

वैभवा तुझ्यासारखे कवी क्वचितच नशिबी
बरेचसे बिचारे! कळत नव्हते, बरळत होते

सुरेख तुझी ही गजल पाहता

Pages

Subscribe to RSS - लेखन