लेखन

पण होउ दे पागल मला

Submitted by satish_choudhari on 19 November, 2017 - 03:18

" पण होउ दे पागल मला "

एक एक दगड फेकून मार डोक्यावरती माझ्या
मनात येतील शिव्या दे तू
तोंडावरती माझ्या
पण होउ दे पागल मला
लोक म्हणतील मजनू झाला ...

ये कुत्र्या ये डोम्बळया
आरशात बघून घे तू
कुठून आला मेला साला
काहुन माग लागला
अश्याच गोड़ गोड़ शिव्या दे तू
अड़वु नको मला
पण होऊ दे पागल मला
लोक म्हणतील मजनू झाला ..

शब्दखुणा: 

Making of photo and status : ७. गोलुमोलु

Submitted by सचिन काळे on 18 November, 2017 - 21:57

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

https://www.maayboli.com/node/64155

21231995_1623345441071268_7052962705107384335_n.jpgकाय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला. टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!

विषय: 

पहिला स्पर्श......

Submitted by हेमंत on 18 November, 2017 - 00:38

पहिला स्पर्श... पावसानंतरचा
बघ ना आज पण पाऊस पडला न तुझी आठवण आली ,
आठव ना, आपण सोमेश्वरला गेलेलो तू आली होतीस एक दीड तासाने college road वर तुझ्या मैत्रिणीला railway स्टेशन वर सोडून मी वाट पाहत होतो तुझी पाऊस पडून गेलेला होता नुकताच...
तो एक दीड तास पण मला एखाद्या जन्मासारखा वाटला कोणतीही activa येवो चालवणारी तूच आहेस का बघत होतो, पण तू आलीस न ठरले जाऊ सोमेश्वर...सोमेश्वर ला पोहचल्यावर आपण घेतलेली गुलाबाची फुले (अजून पण आहेत का ग ते तुझ्याकडे) ..

विषय: 
शब्दखुणा: 

दीक्षितांचं राज्य

Submitted by अविनाश जोशी on 16 November, 2017 - 00:31

दीक्षितांचं राज्य
इंदोर च्या पाण्यात काय विशेष आहे माहित नाही. ओकानंतर आता राजे सुयश दीक्षित. इंदोर चा तरुण संगणक अभियंता.
१. बाजीरावने अटकेपार झेंडे लावले तर सुयशनी इजिप्त आणि सुदान पलीकडे जाऊन झेंडा रोवला.
२. इजिप्त आणि सुदानच्या सीमेवर कुणाचाच नसलेला बीर तवील नावाचा २००० स्केवर किलोमीटरचा उजाड प्रदेश आहे. सुयश दोन्ही बाजूंच्या सैन्यांना चुकवून ७ नोव्हेंबर त्या प्रदेशात गेला आणि त्यांनी तिथे झेंडा रोवला.
३. त्या प्रदेशाला त्याने दीक्षितांचे राज्य (Kingdom of Dixit ) म्हणून घोषित केले आणि अर्थातच स्वतःला त्या प्रदेशाचा राजा म्हणून घोषित केले

विषय: 

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ३ )

Submitted by अनाहुत on 15 November, 2017 - 22:37

" अग म्हणजे अशी प्रत्येक गोष्टच नाही कळत पण तरीही आपण समजतोच ना एकमेकांना . "

" म्हणजे selective गोष्टी समजतात आणि बाकीच्या नाही . पण कोणत्या समजतात आणि कोणत्या नाही ? "

" अग काय हे ? असं असत तुझं , मी काय बोलतोय आणि तुझं काहीतरी वेगळच . understanding आहे ना आपल्यात . "

" कसलं understanding जे कळायला हवं ते तर नाही कळत आणि बाकीचं समजून काय फायदा "... ती अस्पष्टसं ओठातल्या ओठात काहीस बोलली .

" काय ते ? मी ऐकलं नाही . "

" तू राहू दे तुला न बोलता सगळं कळत आणि बोललेलं ऐकूही येत नाही . "

" अगं असं का सांग ना काय ते ? "

विषय: 

भोज्या (अंतिम भाग)

Submitted by अतरंगी on 15 November, 2017 - 00:22

चूक आणि बरोबर यात निवड करणे कायमच सोप्पे असते. अवघड असते ते दोन चुकीचे पर्याय समोर असताना त्यातला कमीत कमी हानिकारक पर्याय निवडणे.

माझ्या समोर जे दोन पर्याय होते दोन्ही मध्ये रिस्क होतीच, पण कमी रिस्क होती ती तिथे थांबून राहण्यात. दिवसभर वारं वाह्यल्याने रात्र जरा सुसह्य झाली. जुलाबाची फ्रिक्वेन्सी पण जरा कमी झाली होती. वाळवंटातली चौथी रात्र !

थोडं फार असलेलं त्राण एकवटून टूल बॉक्स पासून चार पावलावर थोडी वाळू बाजूला करून एक खड्डा करणं आणि त्यात गाडीतलं एक फूट मॅट त्यात नेऊन टाकणं एवढं सोडून काही डोकं चालवण्याच्या मी पलीकडे गेलो होतो.

वडील

Submitted by वृन्दा१ on 13 November, 2017 - 11:48

शब्दाचं स्पेलिंग ठरवूनसुद्धा
एकदाही चुकत नाही
हात थरथरला तरी
अशुद्ध लिहिणं जमत नाही
पण नजरेतली अबोल शाबासकी नसेल
तर सारंच ठरतं व्यर्थ
बदलून गेलेत आता
सगळ्या शब्दांचेच अर्थ

विषय: 
शब्दखुणा: 

Making of photo and status : ६. च्यामारी !!!

Submitted by सचिन काळे on 11 November, 2017 - 22:33

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

https://www.maayboli.com/node/64155

21761987_1644832735589205_268294796060116008_n.jpgच्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय. तिकीटाला एवढे पैसे दिलेत ते काय असलं वाकडंतिकडं चित्र बघायला ?

विषय: 
शब्दखुणा: 

जोतिष वैद्यक २

Submitted by अविनाश जोशी on 11 November, 2017 - 01:37

जोतिष वैद्यक २
गेल्या लेखात असे दिसते की बऱ्याच जणांना विषय कळला नाही. काही बाबी खालील प्रमाणे ..
१. या विषयाचा आणि भविष्याचा सबंध नाही.
२. प्रत्येक वैद्यकीय पद्धतीत चिकित्सा, अनुमान आणि उपचार असे भाग असतात. जोतिष वैद्यक हे चिकित्सा प्रकारातील आहेत उपचार पद्धतीतील नाही. ज्या प्रमाणे रेनल प्रोफाइल किडनीची चिकित्सा करते, किडनीवर उपचार करत नाही.
३. कुठल्या गोष्टींचा परिणाम कुठे कशावर होईल हे सांगणे अवघड असते. मागे लिहिल्याप्रमाणे हवामानातल्या बटरफ्लाय इफेक्ट सारखे असते. हवामान शास्त्रातील बटरफ्लाय इफेक्ट फारच प्रसिद्ध आहे. तो खालील प्रमाणे ...

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन