लेखन

बत्तिशी!

Submitted by मोहना on 27 November, 2017 - 08:20

भल्या पहाटे कळा सुरु झाल्या. सुमुखी दाते आय ओय करत कुशीवर वळली. नवर्‍याला गदगदा हलवलं तर तो तिच्याहून जोरात ओरडत एकदम दारच उघडायला निघाला. त्याचं हे नेहमीचंच. आधी दाराकडे धावणार काही झालं तरी. पळपुटा कुठला. सुमुखी ’झोप तू’ असं फणकार्‍याने पुटपुटली आणि आय, ओय जोरात आळवत दुसर्‍या खोलीत डोकावली. चिरंजीव आडवे पडलेले. ते ढिम्म हलले नाहीत. सुमुखी तिसर्‍या खोलीत गेली. पलंग रिकामा. पळाली की काय? कुणाबरोबर? कशी? कधी? आता सुमुखी दोन वेगवेगळ्या कारणांसाठी ओरडायला लागली. पलंगाच्या पलीकडच्या बाजूला पडलेली तिची तरुण कन्यका उठून शांतपणे पलंगावर झोपली.

शब्दखुणा: 

मायबोलीवरील वर्षपूर्तीनिमित्त मायबोली सदस्य होण्यामागची कहाणी

Submitted by आरू on 26 November, 2017 - 01:15

२५ नोव्हेंबर, २०१७ मला मायबोलीचं सदस्यत्व घेऊन एक वर्ष झालं. आतापर्यंत काही लिहिलं नाही, पण इथलं वाचत असते आणि कधी- कधी प्रतिसाद देत असते.

वर्षभरापूर्वी गुगलवर वेल यांची आधुनिक सीता या कथा/कादंबरीचा एक भाग दिसला उत्सुकता वाटून वाचला छान वाटला. मग बाकी भाग वाचतच गेले. त्यानंतर आठवणीतलं कपाट ही कथा वाचली, दोन्ही कथा आवडल्या होत्या पण सदस्य नसल्याने प्रतिसाद देता येत नव्हता. तोपर्यंत सदस्य व्हायचा अजिबात विचार नव्हता. मायबोलीवरचं लेखन मात्र वाचतच होते. बेफिकीर यांच्या कथा-कादंबर्या वाचण्यात आल्या. उत्कृष्ट लेखनशैली. पण अन्या आणि सनम वाचून खूप वाईट वाटलं, अर्धवट होतं म्हणून.

Making of photo and status : ८. वाळूवरच्या रेघोट्या!

Submitted by सचिन काळे on 25 November, 2017 - 21:08

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

https://www.maayboli.com/node/64155

विषय: 
शब्दखुणा: 

रेशीमगाठी -२

Submitted by सुर्वेप्रतीक on 25 November, 2017 - 10:49

Reshimgathi 2.jpg
भाग १ वरून पुढे )
(शीतल च्या रूम मध्ये शीतल आणि ख़ुशी गप्पा मारत बसल्या असतात )
शीतल - काय मॅडम ,तुमचं सध्या काय चालय समजतंय आम्हाला . इश्क़ कि धुनि रोज़ जलाए उठता धुंआ तो कैसे
छुपाएं..काय बरोबर ना ?
ख़ुशी - हे बघ असं काय नाही आहे . मी आणि मानस आम्ही फक्त मित्र आहोत .
शीतल -(हसून ) अग, मी कुठे मानस च नाव घेतल. मी फक्त सहजच म्हंटलं आणि असल तरी काय वाईट नाही
आहे मानस. मी ओळखते त्याला लहानपणापासून .तुमची जोडी खूप छान दिसते .

विषय: 

न लिहलेलं पत्र...

Submitted by अजय चव्हाण on 23 November, 2017 - 16:08

प्रिय ..............

माहीतेय मला तुझ्या आयुष्याच्या डायरीतून माझं पान तु कधीच फाडून टाकलं आहेस आणि परत तुला ते कपटे जमा करून चिकटावावं असं वाटणारही नाही आणि कदाचित मलाही जोडून जोडून चिकटावासं वाटणारं नाही.....
गेलेले दिवस परत येत नाही आणि आलेल्या दिवसांत मला आठवणी सोडता आल्या नाहीत.
लेट ईट बी,मुव्ह ऑन स्वतःशीच बोलत खुप पुढे आलोय मी पण मनातल्या त्या छोट्याशा कोपर्यात अजुनही तु आहेस मेय बी तुझी ती जागा घेणारं कुणी भेटलचं नाही मला आणि परत असं कुणी भेटेलं असं वाटतं नाही आता...

विषय: 
शब्दखुणा: 

आपल्यावर हिंदुत्व लादले गेले आहे काय?

Submitted by अविनाश जोशी on 21 November, 2017 - 06:26

आपल्यावर हिंदुत्व लादले गेले आहे काय?
आपण सतत आपण हिंदू आहोत असे ऐकत असतो पण आपण हिंदू आहोत हे कोणी ठरवले? आपण हिंदू केव्हा झालो? असे बरेच प्रश्न मला नेहमीच पडतात. त्याच बरोबर शीख, बुद्ध, जैन हे हिंदू नाहीत हे कोणी ठरविले? आपण या शब्दांच्या उगम स्थानांचा विचार करू.
१. वेदात देव आहेत ऋषी, राजे आहेत पण हिंदू हा शब्द कुठेही नाही.
२. ऋग्वेदात सप्तसिंधू चा उल्लेख आहे. या नद्या इंद्राने वृत्र राक्षसाच्या ताब्यातून सोडविल्या अशी कथा आहे. या नद्या गांधार ते करुक्षेत्र पसरल्याचाही उल्लेख आहे.

विषय: 

अबिद

Submitted by अविनाश जोशी on 20 November, 2017 - 07:28

अबिद
एक छोटा मुलगा.
खरं म्हणजे शाळेत जायचे , खेळण्याचे वय.
पण अम्मी गेल्यापासून अबूला मदत करायला त्याला घरीच थांबावे लागे.
आटपाडी तस छोटं गाव होत. हजार बाराशेचा उंबरठा असेल. बहुतांशी मुस्लिम,
अबू दफन भूमीचा रखवालदार होता. आठवड्यातून २-३ तरी मयत व्हायच्याच.
दफनभूमीवर बरेच काम असायचे खड्डे तयार ठेवायचे, प्रेत ठेवल्यावर बुजवायचे माती चापून चोपून बसवायची आणि असलेतर थडग्यावर दगड बसवायचे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन