लेखन

माझी सैन्यगाथा (भाग १३)

Submitted by nimita on 6 August, 2018 - 21:41

देवळाली च्या त्या एक वर्षाच्या कालावधीत मी खूप काही शिकले, नव्या मैत्रिणी मिळाल्या...त्याच बरोबर आमच्या वैवाहिक जीवनात देखील नव्या पर्वाची सुरुवात झाली. मार्च १९९४ मधे आमची मोठी मुलगी ‘ऐश्वर्या’ जन्माला आली.
देवळाली ला आमच्याबरोबर कोणीही मोठी आणि अनुभवी स्त्री नव्हती आणि माझ्या माहेरीही तीच परिस्थिती असल्यामुळे मी डिलिव्हरी साठी माझ्या सासरी-सिकंदराबाद ला जायचं ठरवलं

"करुणा" : भाग ०२ (अंतिम भाग)

Submitted by दिपक. on 5 August, 2018 - 04:31

लग्नानंतरचा एक–दीड वर्षाचा काळ आमच्यासाठी खूप सुखावणारा होता. माझ्या पुस्तकाच्या यशानंतर त्याचं वर्षी माझी आणखी दोन पुस्तकं प्रकाशित झाली. पुण्यातच एका चांगल्या ठिकाणी मी आमच्यासाठी घर घेतलं. त्यात करुणा आणि मी अगदी आनंदाने आपलं जीवन जगत होतो. करुणेची धाकटी बहीण चंदा आणि तिचे वडील दर एक–दोन आठवड्यातून करुणाला आणि मला भेटून जात होते. आणि नेहमी प्रमाणेच एक दिवस सकाळी १० च्या सुमारास चंदा आमच्या घरी आली आणि येताच तिने बडबड सुरू केली –

विषय: 

माणूस

Submitted by महादेव सुतार on 3 August, 2018 - 11:41

माणसातील माणुसकी आता बघायला
कमीच मिळते 
स्वतःच्या  मनाची भावना महत्वाची
दुसऱ्याची भावना कोणाला कळते 
काहींना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते
खरंच  माणसातील माणुसकी बघायला कमीच मिळते  गरिबांना त्रास देणारा श्रीमंतांचा खास असतो कारण तो व्यक्ति पैशासाठी माणुसकी विसरत असतो
गरीब मात्र बिचारा लाजार होऊन बसतो
नशिबी  येतं दुःख सारं 
हाक मारून उघडत नाही कोणी दारं 
स्वतःचं घर बांधताना
दुसऱ्याचं घर मोडणारी माणसं
घरात नात्यात भांडण लावणारी माणसं
का कोणाच्या आयुष्याशी खेळतात ही माणसं

विषय: 
शब्दखुणा: 

वाडा (संपूर्ण कथा)

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 3 August, 2018 - 03:27

वाड्याचे दरवाजे उघडेच होते....कोनाड्यातले दिवे टिमटिम करत जळत होते..आता संध्याकाळ रात्रींकडे झुकत होती... सहसा असं होत नाही पण आज मला अवेळीच झोप लागली..इतकी गाढ झोप मला लागत नाही आणि एरवी माझ्या पलंगाशिवाय मी झोपत नाही पण आज जाग आली तेव्हा चक्क माईच्या पलंगाशेजारी जमिनीवर पसरलेला होतो...सारवलेल्या जमिनीवर झोप छान लागते. ती फरशी वगैरेची सोय अगदीच नावापुरती वाटते...त्यापेक्षा आपली जमीनच बरी..कमीतकमी १०० वर्षाचा आहे आमचा वाडा..आत्ताही ठणठणीत आहे..त्यावेळची बांधकामच तशी होती म्हणा...

विषय: 
शब्दखुणा: 

i care for u

Submitted by अनाहुत on 1 August, 2018 - 10:16

" कसा आहेस ? "
" तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . "
" आपल्यात काही नव्हतं "
" तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील "
" बाय द वे माझं लग्न झालं "
" माहित आहे मला "
" तू केलस कि नाहीस लग्न "
" जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही "
" ओह्ह कोण आहे ती "
" तू आणि कोण ? "
" माझं लग्न झालय "
" माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही "
तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं
" तुला काय करायचं आहे ? हा माझा वैयत्तिक प्रश्न आहे "
" तुझी काळजी आहे ना "

शब्दखुणा: 

पश्चात्ताप

Submitted by Asu on 31 July, 2018 - 23:45

पश्चात्ताप

चाहूल तव पदस्पर्शाची
लावी वेड माझ्या मना
अंतरीच्या तुझ्या वेदना
एकांती मज सांग ना

झाले गेले विसरून जाऊ
प्रेमाचे नित गीत गाऊ
झाल्या माझ्या चुका बहु
विसरून सारे पुढे पाहू

झाडे गाळुनि पाती पाती
वसंत येता पुन्हा बहरती
युगायुगांचे आपुले नाते
क्षणात एका का मिटते

जगणे माझे मिटणे झाले
तुझ्या विना झुरणे आले
अंधारी मी प्रकाशण्याची
वाट पहातो तव स्पर्शाची

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)

शब्दखुणा: 

मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार.

Pages

Subscribe to RSS - लेखन