प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - देवीका

प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - देवीका

Submitted by देवीका on 28 February, 2014 - 17:34

म्हणींची ओळख म्हणाल तर आजीमुळेच... म्हणी म्हणजे आजीच हेच समीकरण. तिच्या म्हणी खूपच वेगळ्या असत. बहुधा अनुभवाचे बोल असत असे आता वाटतं.

आजी आणि म्हणी ह्यांचे एक नातंच होतं. हि आजी माझ्या आईची आई.
सरळ असं बोलणंच नाही. जे काही बोलायचं ते म्हणींतून किंवा कोडयात. आमच्या घरी ती शक्यतो रहायची नाही. तिच्या जुन्या समजुतीप्रमाणे, मुलीच्या घरी फार काळ राहु नये, मान जातो. 'जावयाचं घर म्हणजे परक्याचं दार, तिथे राहु नये फार' असे तिचे म्हणणं.

विषय: 
Subscribe to RSS - प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - देवीका