संगीत

कलाप्रयाग - सई परांजपे आणि झाकीर हुसैन

Submitted by आशयगुणे on 10 August, 2013 - 13:55

मला आठवतंय १९९८ साली जेव्हा दूरदर्शन वर सुपरहिट मुकाबला लागायचं तेव्हा एक गाणं नेहमी १७ व्या किंवा १८ व्या नंबर वर असायचं. सुपरहिट मुकाबला हा काय प्रकार आहे हे माझ्या पिढीतल्या दूरदर्शन पाहणाऱ्या मुलांना लगेच लक्षात आलं असेल. तर हे गाणं होतं 'साज' ह्या पिक्चर मधलं. हिरोईन शबाना आझमी आणि हिरो उस्ताद झाकीर हुसैन. ' क्या… तुमने ये केह दिया' हे त्याचे शब्द. मला त्या वेळेस ह्या दोन्ही दिग्गज कलाकारांबद्दल काही विशेष माहिती नव्हती.' ही शबाना आझमी' एवढीच माहिती होती. ( मला वाटतंय दूरदर्शन वर शुक्रवारी रात्री ९ ला पिक्चर लागायचे त्यामुळे.

आधुनिक पाश्चात्य शास्त्रिय संगीताचा एक सर्जनशील निर्माता- आन्द्रे रियू

Submitted by रेव्यु on 4 August, 2013 - 02:11

आंद्रे लीयाँ मारी निकोलास रियू हा पाश्चात्य शास्त्रीय व उपशास्त्रिय तसेच इतर पारंपारिक संगीतात अविष्कार करणारा २०व्या व २१व्या शतकातील अत्यंत यशस्वी कंपोजर समजला जातो. संगीताच्या शुचितेस धक्का न लागू देता ( यावर वाद आहे) भव्य सेट्स व स्थानिय व त्याबरोबरच देशोदेशीच्या तरुण कलाकारांना प्रोत्साहन देत त्याने पाश्चात्य संगीतात ( विशेषतः) ऑर्केस्ट्रा, ऑपेरा,वॉल्ट्झ, सोप्रानो अशा प्रकारांना जनमानसापर्यंत पोहोचविले आहे.

विषय: 

आता जिणे बास झाले...

Submitted by राजेंद्र देवी on 22 July, 2013 - 02:39

आता जिणे बास झाले...

आता जिणे बास झाले
पावलो पावली उपहास झाले

वाट पाहतो रोज तुझी
तुझे येणे महामास झाले

झोंबता वारा सहीला परी
झुळुक येणे त्रास झाले

तरळते डोळ्यात पाणी
तुझ्या आठवांचे भास झाले

आपल्यांनीच छळीले आता
वैरीच आता विश्वास झाले

झेलले वार किती तरी
जखमांचे व्यास झाले

सजवले होते फुलांनी तरी
कफनाचे निमित्त खास झाले

राजेंद्र देवी.

शब्दखुणा: 

'एक मी अन् एक तो'

Submitted by लोला on 8 July, 2013 - 07:45

मदनमोहन एक संमोहन ....

Submitted by मी मी on 1 July, 2013 - 13:16

संगीत हि कला नाही ती जादू आहे किंवा मग चमत्कार…. संगीत माणूस इथे येउन शिकत नाही ती उपजत एखाद्यात भिनलेली असायला लागते…. शिकणारे गाणी गायला शिकतात … गातातही… पण संगीतप्रेमींच्या काळजाला काही त्यांना हात घालता येतोच असे नाही … ज्यांच्या ज्यांच्या जवळ हि अशी काळजापर्यंत पोचायची जादू होती ती माणसं खरच अनेकांच्या मनापर्यंत आपसूक पोचती झाली …. …. याची अनेक उदाहरणे देता येतील …. पण एखादा जादुगार नुसती जादू करत नाही तर त्याच्या कलेच्या माध्यमाने तुमच्या मनावरच राज्य करू लागतो……

'रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे ' ......
'आपकी नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे ...'

विषय: 

अनवट आशा

Submitted by दिनेश. on 19 June, 2013 - 10:56

अनवट हा शब्द सहसा अप्रचलित रागांसाठी वापरतात. गुणक्री, रायश कानडा असे काही राग आपण नियमित
ऐकत नाही, आणि त्या रागांतील रचना कानावर पडल्या तर काही खास ऐकतोय असे वाटते.

पं. मालिनी राजूरकरांचे "चाल पहचानी", जयमाला शिलेदारांचे " कोपला का ", रामदास कामतांचे "संगीतरस सुरस" अशा काही रचना ऐकल्या, कि असेच हरखून जायला होते.

पण आपली आशा ( आशा भोसले, आपलीच ती ) पण काही कमी नाही. पण होतं काय, अशा अवघड रचना ती
इतक्या सहजतेने गाते कि आपल्याला वाटतं, फारच सोप्प आहे कि हे, पण ज्यावेळी आपण गुणगुणायला जातो
त्यावेळी मात्र, त्यातले अनवटपण जाणवते. तर अशा काही रचना, मला आठवतात त्या. आणि अर्थातच

कर्ट कोबेनचे मित्रास पत्र

Submitted by अश्विनीमामी on 13 June, 2013 - 04:33

निर्वाण, ह्या ग्रंज रॉक गृपचा लीड गिटारिस्ट, कवि आणि गायक असलेला कर्ट कोबेन ह्याने वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी आत्महत्या केली. तो सात वर्षाचा असताना त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता व त्याच्या मनावर ह्या घटनेचा परिणाम झाला होता. त्यानंतरचे कौटुंबिक अस्थैर्य, कुणाचाच फारसा भावनिक आधार नसणे ह्यामुळे त्याची मानसिक अवस्था कायमच नाजुक होती. प्रसिद्धी, क्रिएटिव सॅटिस्फॅक्षन इत्यादी मिळूनही तो आतून प्रचंड अस्वस्थ असे आणि त्यातूनच शेवटी आत्महत्येचे पाउल उचलले गेले. बॉडा ह्या आपल्या काल्पनिक मित्राला त्याने हे शेवटचे पत्र लिहीले आहे. पितृदिनाच्या निमित्ताने त्याचा मराठी अनुवाद केला आहे.

विषय: 

गाण्याचे नोटेशन कसे काढावे? आणि Obligato's कसे सेट करावे?

Submitted by sulu on 6 June, 2013 - 13:20

गाण्याला scale चे महत्त्व काय?
नोटेशन कसे काढतात?
Obligato कसे बनवावेत? काही सल्ले?

कुणाला माहित आहे का? काही माहिती, दुवे मिळले तर बरे होईल.

विषय: 

सांस्कृतिक बोधकथा

Submitted by खटासि खट on 18 May, 2013 - 00:25

एकदा देव प्राण्यांवर प्रसन्न झाला. प्राण्यांनी देवाकडून माणसासारखं आयुष्य मागून घेतलं. मग त्यांनी गावं, नगरं वसवली. पक्की घरं बांधली. माणसाप्रमाणेच प्राणीही लिहू वाचू लागले. विविध कलाविष्कार सादर करू लागले, आत्मसात करू लागले. खरंतर या गोष्टीलाही आता बरीच वर्षं उलटून गेली होती.

शब्दखुणा: 

दिल पडोसी है - सातो बार बोले बन्सी ..गाण्याचा अर्थ - रसग्रहण - जाणकाराना विनंती

Submitted by mansmi18 on 11 May, 2013 - 05:02

नमस्कार,

हे गाणे गुलझार-पंचम-आशा च्या दिल पडोसी है या अल्बम मधले आहे.
http://www.youtube.com/watch?v=lO8mIOzdEyk
(मी हे गाणे किती वेळा ऐकले याची गणतीच सोडुन दिली आहे).

२००९ पासुन मी या गाण्याचा भावार्थ शोधत आहे अजुन मिळाला नाही. एकदा नेटवर गुल्झारफॅन्स या साईटवर एकाने पुढील अर्थ सांगितला होता तो बर्‍यापैकी ऑन ट्रॅक आहे असे वाटतेय.
I think Gulzar Saab is comparing flute with basic nature of the female. Like
a flute, females are not shy to complain when they are physically hurt. But when
it comes to emotions they are as cryptic as they can be. Every time I listen to

विषय: 

Pages

Subscribe to RSS - संगीत