संगीत

मातीचा किल्ला : भाग एक

Submitted by अंकुरादित्य on 31 October, 2013 - 00:45

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!

उदीत नारायण

Submitted by ऋयाम on 28 October, 2013 - 11:07

'सवय' हा जो काही प्रकार असतो, त्याच्यापुढे काहीही बोलता येत नाही. सवयीचा लाम असणं चांगलं समजलं जात नाहीच, पण ती सोडणं किती अवघड असतं हे ज्याचं जळतं त्यालाच...

'तो' खरं सांगायचं तर शास्त्रीय कळपात वगैरे जाऊ पहात नाही. "त्यानं जाऊही नये!" असं आमचे मा. भाऊसाहेब (कानाला हात) म्हणतात. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, "अरेऽ! त्याला आणि सोनू निगमला शेजारी शेजारी उभं करून गाणं म्हणायला सांगा! सोनू निगमचं कसं आहे, की त्याला कसलंही गाणं द्या, जमतं. आता, अगदी शंकर महादेवनपुढं उभं केलं तर मग अवघड होईल कदाचित. पण आहे. तयारी आहे!" भाऊसाहेब विषय सोडून सोनू निगमवर जातात.

चला अनुभवूया एक संगीतमय सकाळ - "रे सख्या" चा प्रकाशन सोहळा

Submitted by कविन on 21 October, 2013 - 06:36
तारीख/वेळ: 
27 October, 2013 - 01:30 to 04:30
ठिकाण/पत्ता: 
कार्यक्रमाचे ठिकाण: सावित्रीबाई फुले सभागृह, डोंबिवली (पूर्व) (स्टेशनपासून तसं लांब आहे पण रेल्वे स्टेशन मधून कल्याण दिशेच्या पुलाने बाहेर पडल्यास, तिथून सभागृहा पर्यंत रिक्षा सहज मिळतात)

------------

रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी, डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृहात रंगणार आहे सुरांची मैफल आणि कौतुकाची बाब म्हणजे ह्यात "वैभव जोशी, नचिकेत जोशी, ज्ञानेश पाटील, मयुरेश साने" हे चार मायबोलीकर मित्र आपल्या शब्दांनी आणि "केतन पटवर्धन" हा आपला मायबोलीकर मित्र स्वरांनी रंगत आणणार आहे.

केतनचं ह्या सुरमयी जगातलं पदार्पण मायबोलीकर मित्रांच्या साथीने होतय हे आपल्या मायबोली परिवारासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.

ते पाच जण स्टेजवर एक "मैफल गटग" करणार आहेत, आपण त्यांचं कौतुक करायला उपस्थित राहून आपलंही एक गटग करुयात. काय म्हणता?

कार्यक्रमाची संपूर्ण माहिती खाली देत आहे:-

विषय: 

भैरव ते भैरवी : नादब्रम्हाच्या प्रवासाला नेणारा एक अनोखा अनुभव

Submitted by अजय on 9 October, 2013 - 09:02

"ब्राम्हमुहुर्ताच्या आधीपासून ते उत्तररात्रीच्या नंतरपर्यंत" असा एक अनोखा अनुभव देणारा, शास्त्रीय संगीतावर आधारीत गाण्यांचा एक सुंदर कार्यक्रम सध्या उत्तर अमेरिकेच्या दौर्‍यावर आहे. तुमच्या रा़ज्यात हा कार्यक्रम असेल तर आवर्जून पहा. हा कार्यक्रम काही ठिकाणी हिंदीतून तर काही ठिकाणी मराठीतून होतो.

नुकताच हा कार्यक्रम बोस्टनमधे कलावैभव या संस्थेतर्फे आयोजीत करण्यात आला होता.

निश एंटरटेनमेंट निर्मित
भैरव ते भैरवी
संकल्पना: विवेक दातार
संहिता: डॉ समीर कुलकर्णी
दिग्दर्शन, निवेदनः मिलिंद ओक

संगीत संयोजन: आशीष मुजुमदार
तबला : प्रसाद जोशी
व्हॉयलीन : राजेंद्र भावे

विषय: 

निर्गुणी भजन- रूप अरूपी

Submitted by संयोजक on 17 September, 2013 - 17:52
मायबोलीकर रैनाकडून आलेले हे भजनः
विषय: 

गणपती स्तोत्रः अथर्व (मायबोली आयडी-अवंतिका)

Submitted by संयोजक on 16 September, 2013 - 10:00
अवंतिका यांनी त्यांच्या मुलाच्या आवाजातील गणपती स्तोत्र उस्फुर्तपणे इमेलने पाठवले. ते मायबोली गणेशोत्सव २०१३ मध्ये देता येईल का? अशी विचारणा केली. यंदा गणेशोत्सवात स्तोत्र विभाग काढलाच नसल्याने, ते कुठे अपलोड करावे असा प्रश्न पडला. मग वेगळा धागा काढूनच ते मायबोलीकरांसमोर ठेवावे, असा विचार आला. तर तीन वर्षाच्या छोटुकल्याचे हे स्तोत्र तुम्हाला सादर. :)
विषय: 

जलतरंगी रंगले मन ...!

Submitted by संयोजक on 15 September, 2013 - 07:50

अर्धगोलात ठेवलेले लहानमोठ्या आकाराचे चिनी मातीचे बाउल, त्यात कमीअधिक प्रमाणात असलेलं पाणी आणि दोन नायलॉनच्या स्टिक्स एवढी सामग्री तुम्हाला जग विसरायला लावू शकते ! याचा अनुभव आम्ही परवा घेतला. निमित्त होतं गरवारे प्रशालेच्या ढोलवादकांच्या पथकासमोर श्री. मिलिंद तुळाणकर यांनी सादर केलेल्या जलतरंगवादनाच्या कार्यक्रमाचं. जलतरंगाबरोबरच त्यांनी काष्ठतरंग, नलिकातरंग, मोर्चंग (मुहुचम्) आणि मेडिटेशन बाउल यांचीही झलक दाखवली. कार्यक्रमानंतर मिलिंदजींशी गप्पा मारायचाही योग आला. त्या गप्पांमधून मिळालेली जलतरंग आणि त्याचे वादक श्री.

शास्त्रीय संगीतातील काही मूलभूत बाबी (Basics).

Submitted by षड्जपंचम on 12 September, 2013 - 06:52

मी शास्त्रीय संगीतातील मूलभूत बाबी (Basics) नवीन ऐकणार्या माणसाला कळाव्यात म्हणून एक लेख लिहिला होता . लेख इंग्रजी मध्ये आहे. परंतु कुणाला उपयोगी पडेल म्हणून लिंक शेअर करतोय. मी शक्यतो audio/video चा वापर करून काही गोष्टी समजावयाचा प्रयत्न केला आहे. उद्देश हा आहे की थोड्या उदाहरणांचा आधार घेऊन काही छोट्या छोट्या गोष्टी लोकांना समजावाव्यात.

inamdarnilesh.blogspot.in

आधी मी मायबोली वर लेखन केले आहे. मायबोली वर मी आमिर खान साहेबांच्या गायकी विषयी एक लेख लिहिला होता. त्यानंतर पहिल्यांदाच काहीतरी लिहितोय.

गणेशवंदना: मातंग वदन आनंद सदन

Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 14:03

Pages

Subscribe to RSS - संगीत