चित्रपट

आम्ही तारे हॉलीवूड चे.....

Submitted by यशू वर्तोस्की on 28 February, 2012 - 04:57

काल टीव्ही वर ऑस्कर सोहोळ्याचे प्रक्षेपण पहिले. आणि अनपेक्षितपणे मेरील स्ट्रीप ला " द आयर्न लेडी " करता सर्वोत्तम अभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले. मेरील स्ट्रीप पुन्हा जिंकली . क्रेमर वर्सेस क्रेमर मध्ये डस्टीन होफ्फ्मान समोर तिने उभी केलेली भूमिका तिला हॉलीवूड च्या समर्थ अभिनेत्रीन मध्ये स्थान देवून गेली. त्या नंतर तिचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास जोमाने सुरु राहिला . तिचे गेल्या काही वर्षात आलेले सिनेमे असेच लक्षवेधी होते डेथ बिकेम हर , मामामिया , ड डेव्हिल वेअर्स प्रादा असे एका पेक्षा एक सरस चित्रपट तिने दिले.

विषय: 

इमान धरम

Submitted by श्रद्धा on 22 February, 2012 - 01:25

हा चित्रपट अमिताबच्चन आणि शशीकपूर यांच्या बालपणापासून सुरू होत नाही. पहिल्याच सीनमध्ये ते थेट मोठेच्यामोठे आणि कामाला लागलेले दिसतात. खरंतर चित्रपटातली सगळी परिस्थिती 'निरुपा इन व्हाईट सारी'ला इतकी अनुकूल आहे की, तिची उणीव फार जाणवली. तर ते असो.

विषय: 

लोकेशन रे लोकेशन !

Submitted by मनीषा- on 15 February, 2012 - 11:32

लोकेशन रे लोकेशन !
हिंदी सिनेमा मधली गाणी म्हणजे आवडीची गोष्ट एकदम . त्यातून ती ५०-६०-७० च्या दशकातली म्हणजे तर गाणे दहा वेळा बघितले असले तरी नजर जराही हटायला तयार होत नाही .
स्टुडीओच्याबाहेर चित्रण झालेली , काही गाणी बघताना एकदम जाणवले की अरे हे मागे दिसते आहे ते तर आपण पाहिलं आहे . आणि मग सुरु झाला एक वेडगळ छंद , ज्यात गाण्यापेक्षा, हिरो आणि हिरविणीपेक्षा, मागच्या इमारती , बागा वगैरे निरखून बघण्याचा .

अशीच काही नमुने दाखल गाणी तुमच्या साठी . आपल्या ओळखीच्या ऐतिहासिक स्थळा ची एक चक्कर घडवून आणणारी ..

महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

Submitted by मनीषा- on 13 February, 2012 - 09:34

नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत

दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल

युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना

'हा भारत माझा" खेळासाठी स्वयंसेवक हवेत.

Submitted by Admin-team on 13 February, 2012 - 01:32

'हा भारत माझा' या चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी दिनांक २३ फेब्रुवारी, २०१२ रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे, इथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी काही स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. स्वयंसेवकांना कार्यक्रमाच्या दिवशी, म्हणजे २३ तारखेला, संध्याकाळी ५.४५ वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल. आलेल्या प्रेक्षकांच्या रांगा लावणे, तिकीटे तपासणे, आलेल्या कलाकार आणि पाहुण्यांचे स्वागत तसेच ओळख इत्यादी कामांत मदत लागेल. सर्व कामे चित्रपट सुरू होण्याआधी असल्याने सर्व स्वयसेवकांना पूर्ण चित्रपट पाहता येईल.

विषय: 

गोळाबेरीज अर्थात पुलंची पुण्याई भागिले सर्व काही

Submitted by nikhilmkhaire on 12 February, 2012 - 10:11

झारापकर अभिनंदन
पु.ल. देशपांडे नावाच्या अवलियावर सिनेमा काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल!
--समाप्त--

झारापकर महाराष्ट्राची माफी मागा!

विषय: 

’हा भारत माझा’ - २३ फेब्रुवारी खेळ - हाऊसफुल!!

Submitted by admin on 11 February, 2012 - 01:42

’हा भारत माझा’ चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी!!! हा धागा तुम्ही पाहिलाच असेल. पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (National Film Archives of India) येथे हा खेळ होणार आहे. मायबोलीच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा खेळ मायबोलीकरांसाठी प्रदर्शीत करत आहोत. चित्रपटाचे दिग्दर्शक, कलावंत तसेच अनेक मान्यवरांसोबत हा चित्रपट पाहाण्याची संधी तुम्ही नक्कीच चुकवणार नाही याची खात्री आहे. तुम्ही स्वतः पुण्यात सध्या जरी नसलात तरी तुमच्या आप्तस्वकीय आणि मित्रमंडळीना जरूर कळवा.

प्रवेशिका वाटप :

विषय: 
शब्दखुणा: 

’हा भारत माझा’ चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी!!!

Submitted by Admin-team on 9 February, 2012 - 23:53

ठिकाण - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI), लॉ कॉलेज रस्ता, पुणे

अधिक माहिती - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ’हा भारत माझा’ या चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी आयोजित केला आहे. या प्रसंगी दिग्दर्शक सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर व चित्रपटातले कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित राहून मायबोलीकरांशी संवाद साधणार आहेत. मायबोली.कॉम हे या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.

विषय: 

अग्निपथ

Submitted by मंजूडी on 30 January, 2012 - 01:28

सूडकथाच दाखवायची होती तर करण जोहरने सुहास शिरवळकरांची कुठलीही 'दारा साम'ची कथा निवडली असती तरी चित्रपट चांगला झाला असता.

ऋषी कपूर छान. सिनेमातल्या छोटी काली (प्रियंका चोप्रा) आणि शिक्षा (हृतिकची बहिण) खूप गोड आहेत.

प्रियंकाताईंना फारसा वावच नाहीये. एकच मुख्य गाणं होतं तेही कापलं गेलंय.

क्लायमॅक्समध्ये करण जोहरने 'असली हिरो ऐसा होता है'चा एकही सीन हृतिकला न देऊन त्याच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट