चित्रपट

चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.

विषय: 

कातिलों के कातिल

Submitted by श्रद्धा on 14 October, 2009 - 11:04

'कातिलों के कातिल' हे अ नि अ सिनेम्यांच्या इतिहासातले एक गौरवशाली पान आहे. अशा सिनेम्याची निर्मिती केल्याबद्दल हिंगोरानी बंधूंना दंडवत घालून हे पुराण पुढे सुरू करते.

प्रदीप कुमार आणि निरुपा रॉय हे एक सद्गुणी, श्रीमंत, दोन मुले असलेले जोडपे. त्यांच्याकडे एक रथ असतो. रथामुळेच सिनेमा घडतो म्हणजे रथाची किंमत आकारमानाच्या व्यस्त प्रमाणात असणे ओघाने आलेच. छोट्या पाटाइतका परीघ असलेला आणि घरी बसवायच्या गणपतीच्या मूर्तीएवढ्या उंचीचा रथ 'करोडों का' असतो.

विषय: 

सामना....!!!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

महाराष्ट्रदेशी घमासान शाब्दिक युद्ध चालु असताना आमचा सामना चित्रपट पाहणे झाले......! मागच्या महायुद्धाच्या वेळी सिंहासन बघितला होता!
तिकडे गांधी जयंती अन उपोषण, उपवास असे अन्ना इषयी बोलणे चालु असताना अन्ना चे उपोषण अशी ही एक बातमी आली.... त्यावर सुपारीमॅन कोण? हा प्रश्न ही अनेकांना पडलाय.......
सामना मध्ये पण एक उपोषण आहे..!

प्रकार: 

द परस्युट ऑफ हॅप्पीनेस........!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

काल द परस्युट ऑफ हॅप्पीनेस हा विल स्मिथ चा ख्रिस गार्डनर या गुंतवणुक क्षेत्रातील व्यक्तीमत्वावर आधारीत चित्रपट पाहिला.
(संदर्भासाठी लिंक http://en.wikipedia.org/wiki/The_Pursuit_of_Happyness#Critical_reception)

प्रकार: 

हरीश्चंद्राची फॅक्टरी चित्रपटाची "ऑस्कर"साठी निवड

Submitted by rajasgauri on 23 September, 2009 - 07:39

या चित्र पटाला हा मान मिळाल्यावर काहीतरी करायला हवे असे सर्व म्हणाले,
नक्की काय करायचे हे मी विचारल्यावर मला आलेली ही एक ‍ईमेल :

This is what Non Indians do –

- Appoint a US distributor (that also means providing lot of prints of the film)

- Appoint a marketing firm which will arrange interviews on TV shows, radio interviews etc. (If you are not on Today, Good Morning America, Oprah, NPR you have no chance). Must have a good person associated with the film who will be able to speak good English.

विषय: 

मी : निळू फुले - अंतिम भाग

Submitted by Admin-team on 21 August, 2009 - 03:04

मी : निळू फुले - पहिला भाग

याच काळात चित्रपट बघणं, विशेषत: बंगाली, इंग्रजी, आणि चित्रपटांबद्दल वाचणं याची चटक किंवा व्यसनच लागलं खरं म्हणजे. बंगाली चित्रपट आम्ही पाहिले अमीर शेखमुळे. कारण त्याच्या ऑफिसमध्ये एक बंगाली बाबू होता. तो इथे बंगाली फिल्म्स आणायचा. ती चटक तिथून लागली, अमीरमुळे. इंग्रजी सिनेमा तर आम्ही पूर्वीपासूनच पाहायचो.

मी : निळू फुले - पहिला भाग

Submitted by Admin-team on 21 August, 2009 - 02:40

१३ जुलै २००९... सकाळमध्ये निळू फुले यांच्या निधनाची बातमी वाचली आणि मनापासून खूप वाईट वाटलं.
निळू फुले हा मराठी रंगभूमीवरचा आणि चित्रपटातला एक ताकदीचा, सशक्त अभिनेता गेल्याचं दुख: तर होतच पण त्याचबरोबरीनं ’अरेरे, निळूभाऊ गेले यार’ ही ओळखीचं कोणीतरी माणूस गेल्याची जाणीव जास्त क्लेशदायक होती. कारण माझ्या किंवा माझ्या बहिणीच्या आठवणीतले निळू फुले हे आधी - कायम काही ना काही पुस्तक वाचताना दिसणारे किंवा हातात खुरपं धरून बागकाम करणारे "निळूभाऊ’ होते....नंतर मराठी नाटय-चित्रपट क्षेत्रातले एक आघाडीचे कलाकार निळू फुले !

माझा चित्रपट सृष्टितील प्रवेश

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

दोन-तिन वर्षांपुर्वि Caltech च्या grad students नी (मुख्यतः) बनवलेला हा लघु चित्रपट (आयटम गाण्यासहीत)


Made in Heaven, arranged in Mumbai

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट