चित्रपट

शिरीन फरहाद की विजोड जोडी (Shirin Farhad ki to nikal padi - Review)

Submitted by रसप on 25 August, 2012 - 01:20

"प्यार की कोई 'एक्सपायरी डेट' नहीं होती." - असं एका दृश्यात जेव्हा बोमन इराणी म्हणतो तेव्हा म्हणावंसं वाटतं की "लेकीन, 'मॅन्युफॅक्चरिंग डेट' तो होती हैं ना ?" नक्कीच असते. किमान त्या-त्या वयात होणाऱ्या प्रेमाची जातकुळी तरी वेगळी असतेच आणि इथेच 'शिरीन-फरहाद..' कमी पडला. वयाची चाळीशी ओलांडलेल्या दोन अविवाहितांच्या भावविश्वास दाखविताना जरी एक हलका-फुलका सिनेमा बनवायचा दृष्टीकोन ठेवला असला, तरी केवळ एका दृश्याचा अपवाद वगळता - त्यातही सौजन्य, बोमन इराणी - कुठेच सिनेमा अपेक्षित भावनिक उंची गाठत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

गाथाचित्रशती विषय क्र. १ मला भावलेला शिवाजी वागळे (नाना पाटेकर)

Submitted by स्मितू on 24 August, 2012 - 07:07

मराठी, हिंदी सिनेमे आम्ही चिक्कार बघितले. मला विशेष असे काही क़ळायचे नाही. पण टुकार सिनेमे पाहाण्याची सुद्धा एक वेगळी मजा असते त्या वयात..

विषय: 

विषय क्र. १: इजाजत

Submitted by माधव on 22 August, 2012 - 06:44

"चल पिक्चरला!" माझ्या डोळ्यावर चढणारी सुस्ती भंग करत मित्राने फर्मावले. विचारणे वगैरे प्रकार हॉस्टेलवर चालत नाहीत, तिथे थेट आज्ञाच असते.

मी त्याच्याकडे एक नि:शब्द कटाक्ष फेकला.

"अरे एकच शो आहे" माझ्या नजरेतले भाव ओळखत तो थोडासा ओशाळत म्हणाला. हॉस्टेलवर रहाताना सिनेमाला जायची एकच राजमान्य वेळ असते - रात्री ९ ते १२. आणि आत्ता सकाळचे फक्त १०:३० वाजत होते.

माझी त्याच्यावरची नजर तशीच, पण आता भाव दुसरे. मित्रच तो, त्याने ते पण बरोबर वाचले.

"डेक्कनला, इजाजत, ११ चा शो आहे." रेखा आणि आरडी यांच्यापुढे मला सुस्ती गौण आहे हे त्याचे गणित बरोबर होते.

विषय: 

विषय क्र. १: तेरे घर के सामने

Submitted by नंदिनी on 22 August, 2012 - 05:31

१९५० चं दशक म्हणजे हिंदी सिनेमा सृष्टीतला सुवर्णकाळ. कृष्णधवल रंगामधे या दशकाने अनेक शिल्पं घडवली. नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याचा उन्माद होता. "काहीतरी करायचं आहे" याची जाणीव होती. फाळणीचं अपरंपार दु:ख होतं. आणि नव्याकडे घेऊन जाणारी आशा होती.

याच दशकामधे "स्टारडम" ही संकल्पना रुळत गेली. चित्रपट ही एक जादुई दुनिया आहे आणी त्यामधे काम करणारे लोक हे जादुगार आहेत असा भारतीय मानसिकतेवरती जो पगडा आजतागायत बसलाय त्याची सुरूवात पण याच दशकातली.

विषय: 

रेस्ट इन पीस - टोनी स्कॉट

Submitted by mansmi18 on 21 August, 2012 - 09:30

आजच वाचले..
टोनी स्कॉट (आठवा .. टॉप गन, बेवर्ली हिल्स कॉप २, एनीमी ऑफ द स्टेट, द लास्ट बॉय स्काउट) यानी आत्महत्या केली. कदाचित ब्रेन ट्युमरला कंटाळुन असेल.. असो..
एका स्टायलिश दिग्दर्शकाचा अंत..

श्रद्धांजली..

विषय: 

विषय क्रमांक १ : "अय स्साला...कोइ शक्क ?"

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 August, 2012 - 07:36

एक-दिड वर्षांपुर्वीची गोष्ट...

स्थळ : सोलापूरच्या भागवत थिएटर्समधील ’चित्रमंदीर’ हे चित्रपटगृह

आणि अवघे ४० रुपये बाल्कनीचे तिकीट असताना पिटातले तिकीट काढून बसलेला मी.

टायटल्स संपतात, चित्रपटाला सुरुवात होते. पिटातल्या त्या प्रेक्षकांमध्ये (माझ्यासकट) प्रचंड चलबिचल.

विषय: 

मराठी चित्रपट संगीतापासून दूर राहिलेले स्वर !!

Submitted by दिनेश. on 20 August, 2012 - 07:49

मराठी चित्रपटातील गाणी आठवताना, अचानक एक बाब मनात आली, ती अशी. अनेक गुणी आणि श्रेष्ठ कलाकारांनी, मराठी चित्रपटांसाठी गायन केले, त्यांनी गायलेली गाणी, लोकप्रिय देखील झाली, पण मग नंतर कधीही त्यांचा आवाज मराठी चित्रपटात ऐकू आला नाही, कारणे अर्थातच मला माहित नाहीत, पण सहज
आठवण काढत गेलो, तर असे कितीतरी कलाकार आठवले.
( हे सगळे उल्लेख आठवणीतूनच केले असल्याने काही चुकले माकले असेल तर अवश्य लिहा.)

१) पं. भीमसेन जोशी.

विषय: 

विषय क्र. १ -- त्याची भीती, त्याचा करिष्मा

Submitted by संदीप चित्रे on 19 August, 2012 - 23:31

"सूअर के बच्चों!”

त्या सिनेमाच्या पडद्यावर तो पहिल्यांदा दिसतो तेव्हाच कानफटात मारल्यासारखे हे शब्दही आपल्या डोक्यात घुमतात. सिनेमा पहिल्यांदाच बघणारे एकदम खुर्चीत सावरून बसतात आणि लहान मुलं घाबरून आई-बापाचे हात घट्ट धरतात!!

विषय: 

विषय क्र. ३ : माझ्या मनातला मराठी चित्रपट

Submitted by Kiran.. on 19 August, 2012 - 11:44

सह्याद्रीवर दूरदर्शनचे सुवर्णक्षण दाखवले गेले. कुणीतरी आवर्जून फोन केल्याने टीव्ही लावला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. पडद्यावर पथनाट्याच्या धाटणीचं एक नाटक सादर केलं जात होतं. वेटिंग फॉर गोदो या नावाचं ते नाटक... सुरूवातीला काही कळेचना. माझ्या मेंदूच्या आकलनाच्या सीमा ढवळून काढणारं काहीतरी समोर घडत होतं आणि सुन्न करणारा एक अनुभव घेऊन मी अवाक होऊन गेलो होतो. एक जबरदस्त संहिता ! कुणी लिहीलीये हे या क्षणाला माहीत नाही, कधी लिहीलिये हे ही माहीत नाही. पण टाईमलेस अशी ती कलाकृती होती.

Pages

Subscribe to RSS - चित्रपट