लेख

आम्ही जपानी बोलू कवतिके..!

Submitted by वर्षा on 21 February, 2010 - 22:07

त्यादिवशी युट्युबवर लेकासाठी योग्य अशी बडबडगीते शोधत असताना हे एक जपानी बडबडगीत सापडलं. "ओ-च्या ओ-च्या ओ-च्या च्या-च्या-च्या" अश्या गंमतीदार सुरुवातीने सुरु होणारं ते गीत एका लोभस जपानी चिमुरडीने मस्तपैकी डान्स वगैरे करुन छान सादर केलंय. (’जपानमध्ये सर्वात प्रेक्षणीय काय असेल तर ती मुले’ असं पुलंनी आधीच लिहून ठेवलं आहे त्याला स्मरुन त्या बाहुलीचं अधिक वर्णन करत नाही.) बडबडगीताचा अर्थ वगैरे समजून घेण्यापर्यंत चिरंजीव अद्याप पोचले नाहीयेत. पण ती चाल आणि ठेका आवडेल अशा हेतूने मी ते गाणं त्याला ऐकवलं आणि त्याला ते आवडलंही.

गुलमोहर: 

आपल्या मराठी भाषेसाठी आपण काय करु शकतो???

Submitted by ऋयाम on 9 February, 2010 - 08:55

"आपली बोली आपला बाणा" म्हणत आपण सारे "मायबोलीवर" आलो आहे.
आपण सारेजण केवळ "मराठी भाषा" या एका धाग्याने बांधले गेलो आहोत.
स्वतःचे लिखाण अथवा दुसर्‍याचे असो, आतुरतेने ते वाचुन त्याचा आनंद घेण्यासाठी आपण येथे येतो.

आत्ताच विकीपीडीयावर "हेलन केलर" यांच्याबद्दल आर्टिकल बघायला मिळाले.
इंग्रजीमधे होते, पण शेजारी "मराठी" अशी लिंक दिसल्यावर अर्थातच तिकडेच लक्ष गेले.
पण तिथे गेल्यावर निराशाच झाली. तिथे काहीही लिहीलेले नव्हते.

"हेलन ऍडम्स केलर (जून २७,१८८० - जून १,१९६८) या अमेरिकन लेखक, सुधारक व प्राध्यापक होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणार्‍या त्या पहिल्या मूकबधीर व्यक्ति होत्या."

गुलमोहर: 

एस एल भैरप्प यांचे सार्थ आणि आवरण

Submitted by कैवल्य on 2 February, 2010 - 03:06

मी पुर्विच हा लेख वाचु आनंदे मधे टाकला होता. सार्वजनीक कसा करायचा माहिती नव्हते. आता सार्वजनीक करतो आहे.

एस एल भैरप्पा यांचे सार्थ आणि आवरण
मी नुकतीच प्रख्यात कन्नड लेखक श्री. एस् एल् भैरप्पा यांची सार्थ आणि आवरण ही दोन् पुस्तके वाचून् संपवली. वाचून् सम्पवली हे म्हणणे केवळ शारीर पातळीवर आहे. कारण भैरप्पांचे कोणतेच पुस्तक मानसिक अथवा बौद्धिक पातळीवर संपत नाही. त्याचा विचार तुमच्या डोक्यात चालुच राहतो. आणि हे फक्त याच नव्हे तर त्यांच्या सर्वच पुस्तकांच्या बाबतीत होते.

गुलमोहर: 

......................

Submitted by अवल on 16 February, 2009 - 22:33

काही कारणास्तव हा धागा संपादित केला आहे, तसदी बद्दल क्षमस्व !

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख