चित्रकला

रंगीत पेन्सिल्स - "वेटिंग फॉर द स्टर फ्राय"

Submitted by वर्षा on 14 November, 2013 - 01:07

वेटिंग फॉर द स्टर फ्राय

प्रिझमा प्रिमियम आणि प्रिझमा व्हेरीथीन्स.
बॅकग्राउंडसाठी काही प्रमाणात कोकुयो कॅम्लिन प्रिमियर पेन्सिल्स.

आमची जंगलरूम

Submitted by सावली on 29 October, 2013 - 00:52

आमची जंगलरूम.

आमच्या घरात आम्ही खोल्यांना नावे दिली आहेत. ओशन रूम, जंगलरूम, स्काय रूम इत्यादी. बाकीच्या खोल्यांमध्ये नावाप्रमाणे काही सजावट नाही मात्र जंगलरूममध्ये जंगलाचे चित्र काढायचे असे बरेच आधी ठरवून ठेवले होते. या चित्रातल्या प्रत्येक प्राण्याला काहीतरी नाव आहे आणि त्या प्राण्यांच्या कथाही आहेत. कथा पुन्हा केव्हातरी इथे देईन. तोवर आमची जंगलरूम बघा.

इथे अजून टेबल, बेड इत्यादी काही केले नाही. सध्या पसारा मांडून खेळायला जागा हवीये. जरा मोठी झाली की बाकीचे करून घेणार. ते साधेच , मोठे झाल्यावरही वापरता येईल असे असणार आहे.

लाईट हाऊस - संध्यासमयी

Submitted by कंसराज on 19 October, 2013 - 23:53

हे एक आताच पूर्ण केलेल चित्र येथे देत आहे. आवडल्यास जरूर सांगा
माध्यम - ऑईल पेंट

"पैठणी" - साडी मनातली

Submitted by salgaonkar.anup on 13 October, 2013 - 09:12

दसरयाच्या शुभेच्छा ….!!!!!
साधारण चार वर्ष उलटली असतील अजूनही तशीच जशी पहिल्यांदा पहिली होती. तोच भरजरी काठ, तेच नाचरे मोर सात. अनेक साड्यांच्या गर्दीत आपले अस्थित्व जाणवून देणारी "पैठणी"
एकाच गोष्टीची खंत, सरत्या काळात वापर फक्त दोनदाच. एकूणच महिलावर्गाच गणित अजूनकाही पुरुषवर्गाला उलगडलेलं नाही. आईची हि पैठणी नवीन रूपाच्या प्रतीक्षेत असावी कदाचित ……………………

3D बूट

Submitted by केदार देशमुख on 12 October, 2013 - 04:03

नमस्कार मित्रांनो,
मी केदार देशमुख, सप्टेंबर महिन्यापासून मायबोलीवर जॉईन झालो आहे. मी पुण्यात एका IT कंपनीत जॉब करतो.
याशिवाय तबला,(थोडेफार) व्हायोलीन वाजवतो, तसेच फोटोग्राफी आणि चित्रकला (पेन्सिल स्केचेस) हे माझे आवडते छंद आहेत. त्यापैकी माझे एक आवडते स्केच इथे अपलोड केलंय, तुम्हाला आवडलं तर अजुन काही स्केचेस आहेत ते अपलोड करेन. धन्यवाद.

हा '3D बूट' समोर ठेवलेल्या फक्त एकाच पेन्सिलने काढलेला आहे.
स्केच कसं वाटलं नक्की सांगा....!

Shoe.jpg

Pages

Subscribe to RSS - चित्रकला