चित्रकला

श्रेयाचा गणेश!

Submitted by प्राजक्ता on 22 September, 2010 - 17:52

नावः श्रेया डोखळे
वयः ६ वर्ष
माध्यमः क्रेयोलाचे कलर.
पालकाची मदतः मायबोलीवर आणि आंतरजालावरिल गणपतिची चित्र दाखवणे.
काही आकार काढुन दाखवणे.

ganeshresize.jpg

सिद्धार्थ हर्डीकर - पान गणेश

Submitted by मीन्वा on 21 September, 2010 - 10:04

नाव - सिद्धार्थ हर्डीकर
वय - १० वर्षे
लागलेला वेळ - ४५ मिनीटे ते एक तास

सिद्धार्थने काढलेला पान गणेश. सध्या पावसाळा आहे म्हणून हिरवा गार गणपती म्हणे Happy

017.jpg

अभयचा - श्री गणेश

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

माझा एक छोटा मित्र आहे. अभय मिश्रा. माझ्या घरी आल्यावर मायबोलीवरचे गणपतिचे फोटो बघून, त्याला स्फुर्ती आली आणि त्याने एक छानसा गणपति रेखाटून दिला. त्याचे वय आहे ८ वर्षे.

Ganesh.JPG

प्रकार: 
शब्दखुणा: 

मुक्ताचे बाप्पा

Submitted by स्मिताके on 19 September, 2010 - 16:09

नावः मुक्ता
वय: साडेपाच वर्षे
माध्यमः Mosaic puzzle pieces
मदतः तिच्या बाबाने कागदावर बाप्पा काढून mosaic puzzle प्रमाणे चौकट आखून रंगवून दिले. मुक्ताने त्या त्या रंगाप्रमाणे puzzle pieces लावले. बाप्पाला बसायला पाट, गंध आणि मखर तिच्या कल्पनेतून. बाप्पांचा फोटो बाबाने काढला आणि मग बाप्पांना मायबोलीवर आणण्याचं काम माझं.
प्रेरणा: हर्षचा लेगो गणेश!!

किलबिल : गणपती बाप्पा - ऋचा

Submitted by राखी on 17 September, 2010 - 02:06

नाव : ऋचा दामले
वय : ४ १/२ वर्ष
चित्राचे माध्यम : पेन्सिल, क्रेयॉन्स
आमची मदत : चित्र शोधायला मदत करणे आणि इतर पालकांप्रमाणेच सतत भुणभुण Happy

Rucha-Ganapati Picture 1.jpg

किलबिल : ग्रीन गणेशा - ऋषी वैद्य

Submitted by श्रीधर्_वैद्य on 16 September, 2010 - 23:52

मुलाचे नाव - ऋषी वैद्य
वय - ७ वर्षे
माध्यम - क्रेयॉन्स
शाळेत "ग्रीन गणेशा" नावाच्या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रमासाठी हे चित्र काढले होते. पानांचे आकार मी काढून दिले आहेत, त्याने चित्र रंगवून खाली सही केली आहे.untitled1.JPG

टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र.६ - रोझा

Submitted by संयोजक on 16 September, 2010 - 13:37

TT_Roza_aai-b1.jpg
दहा पंधरा वर्ष वेगवेगळ्या प्रसंगाच्या आठवणींसाठी म्हणुन बाटल्या ठेवल्या. त्या माळ्यावर साठविल्या होत्या. नंतर नविन बंगला बाधल्यावर कंपाउंडच्या भिंतीवर लावण्यासाठी त्या सर्व नेल्या. पण त्याआधिच भिंतीचे प्लॆस्टर झाले होते, त्यामुळे त्या तशाच खालच्या कपाटात राहिल्या. भंगारवाल्याच्या एक रुपयाला एक बाटली देण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता.
TT_Roza_aai-b4.jpg

किलबिल : आले रे आले गणपती आले - मिहिका

Submitted by प्राची on 15 September, 2010 - 14:19

नाव : मिहिका
वय : ६ वर्षे

'किलबिल' ची घोषणा झाल्यापासूनच मिहिका चित्र काढून पाठवणार हे नक्की होते. त्यासाठी काही चित्रंही आम्ही सिलेक्ट केली होती. पण शाळेची परीक्षा सुरु झाल्याने जरा हा विषय बाजूला पडला. आता परीक्षा संपल्यावर शेवटी आज मुहुर्त लागला.

आमची मदत : तिला काढायला सोप्पी पडतील अशी चित्रं निवडणे. Happy

Ganapati.JPG

किलबिल - प्रांजलचा गणपतीबाप्पा

Submitted by जयु on 14 September, 2010 - 13:20

मुलीचे नांव - प्रांजल
वय - ३.५ वर्षे
चित्राचे माध्यम - पेन्सिल
मदत - प्रथम मी तिला गणपतीचे चित्र काढून दाखवले. नंतर तिच्या हाताला धरून चित्र काढायला शिकवले.मग तिला स्वतः चित्र काढायला लावले. एक ,दोन प्रयत्नानंतर तिने हे चित्र काढले. गणपतीबाप्पाला तोंड कुठंय????
म्हणून सोंडेवरती तिने तोंडही काढले. Happy

!!!! गणपतीबाप्पा मोSSSलया !!!!

किलबिल : गणपती बाप्पा मोरया!- नचिकेत

Submitted by पूनम on 14 September, 2010 - 10:24

नाव- नचिकेत
वय- सात वर्ष

नचिकेताने काढलेले हे बाप्पाचे चित्र, एक चित्र होतं, ते पाहून काढलंय. तीन रफ चित्र काढून शेवटी, 'आई हे फायनल आहे' असं ठरलं Happy

माझी मदत- लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे Proud

ganapati.jpg

Pages

Subscribe to RSS - चित्रकला