इतिहास

विषय क्र. २. : तेल क्षेत्रात भारत स्वावलंबी होण्यासाठी निर्माण झालेली भारताची मूळ राष्ट्रीय तेल कंपनी - इंडियनऑयल

Submitted by अश्विनी के on 23 August, 2013 - 02:38

१५ ऑगस्ट १९४७ ह्या दिवशी भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, परंतु त्याआधीचा १५० वर्षांपुर्वीचा भारत ते स्वातंत्र्य मिळाल्यादिवशीचा भारत ह्या कालावधीत इंग्रजांनी त्यांच्या राजकारण आणि राज्यकारण सुकर होण्यासाठी केलेले बदल ह्यामुळे भारत कित्येक बाबतीत परावलंबीच राहिला होता. कारण त्या बदलांमुळे भारतीयांचे राहणीमान बदलले होते आणि ते त्या बदलांना स्वबळावर निभावून, जनतेला पुढे घेऊन जाणे हे स्वतंत्र भारतापुढे एक आव्हान होते. अश्याच अनेक आव्हानांपैकी एक होते इंधनामध्ये स्वावलंबी होणे.

Clive ...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

Robert Clive of the British East India Company - key figure in our nation's history ... statue on King Charles St. facing into St. James Park, London

शब्दखुणा: 

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो

Submitted by नरेंद्र गोळे on 20 August, 2013 - 23:30

खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत.

भ्रमंती : यमाई देवी मंदिर, औंध संस्थान

Submitted by मुरारी on 19 August, 2013 - 12:45

चित्रगुप्त यांनी सुरु केलेल्या चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी धाग्यामुळे पाच सहा महिन्यांपूर्वी साताऱ्याजवळील औंध येथे केलेल्या भ्रमंतीची आठवण झाली .

विषय: 

दस्तावेज : "नियतीशी संकेत"

Submitted by अवल on 14 August, 2013 - 15:27

१५ ऑगस्ट १९४७, भारत स्वतंत्र झाला. येथे झालेले विचारमंथन, घेतलेले अथक परिश्रम, सोसलेल्या हालअपेष्टा या सर्वांचे चीज झाले.
पं. जवाहरलाल नेहरू - आपल्या आदराचे स्थान. स्वातंत्र लढ्यातील नेते, भारताचे पहिले पंतप्रधान, उत्तम प्रशासक, आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्दी, 'शांतीदूत', इतिहासकार, तत्वज्ञानी आणि मुलांचे चाचा नेहरू; एकाच व्यक्तिमत्वाचे किती विविध पैलू !

विषय: 
शब्दखुणा: 

अन्नं वै प्राणा: (८) - (३)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

हरदी कहाये रंगाले
अपने रंग रंगाले लालना
रंगबों देवकी के चुनरी
अपने रंग रंगाले होय

annam8.jpg
प्रकार: 

नेहमी पडणारी स्वप्ने

Submitted by विजय देशमुख on 22 July, 2013 - 23:04

माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.

१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.

आठवली की लिहितो Happy

विषय: 

ए बी पी न्यूज- प्रधानमंत्री

Submitted by श्रीकांत on 21 July, 2013 - 12:12

नुकतीच ए बी पी न्यूज चॅनेल वर प्रधानमंत्री "> ही मालिका सुरु झाली आहे. विख्यात दिग्दर्शक शेखर कपूर हे या मालिकेचे अँकर आहेत. या मालिकेच्या बद्दल पत्रकारपरिषदेत"> व ए बी पी माझा वर साक्षात "> या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलीत व अनेक प्रश्न ही मांडले आहेत.

अजिंठा: भाग २

Submitted by डोंगरवेडा on 9 July, 2013 - 23:23

अजिंठा: भाग १

अजिंठा लेणीतले १ व २ क्रमांकाचे भव्य विहार पाहून आम्ही पुढच्या लेणी पाहण्यास निघालो निघालो. पद्मपाणी आणि वज्रपाणी प्रतिमांनी मनावर अक्षरशः गारूड केले होतं आता आमच्यापुढे अजिंठ्याने काय काय आश्चर्ये वाढून ठेवली आहेत याची जाम उत्सुकता होती

पुढील ३ ते ८ क्रमांकाच्या लेण्या या ह्यासुद्धा विहार असून आत सुरुवातीच्या विहारांसारखीच त्यांची रचना आहे. ओसरी, सभामंडप, आणि गर्भगृह. ह्या विहारांमधेसुद्धा काही चित्रे आहेत पण ती बरीचशी नष्ट झालीत. या विहारांमध्ये शिल्पे कोरण्याचे प्रमाण जास्त आहे.

रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट!!!

Submitted by Discoverसह्याद्री on 7 July, 2013 - 15:02

....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत!!!

Shelarkhind1_DiscoverSahyadri.jpg
(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)

Pages

Subscribe to RSS - इतिहास