तीन वर्ष झाली असावीत त्या गोष्टीला. जपानमधून सुट्टीसाठी पुण्यात आलेला मिहीर म्हणाला, 'बिझनेस सुरू करायचा आहे.'
'अरे वा ! कसला ?'
'हॉटेल !'
आता हॉटेल हे उत्तर ऐकून आश्चर्य वाटल नाही आणि वाटलं पण.
आश्चर्य वाटल नाही कारण माझ्या माहितीच्या पन्नास टक्के मंडळींच्या मनात कधी ना कधी हॉटेल सुरू करण्याची सुप्त इच्छा आहे. अगदी माझ्या सुद्धा.
आश्चर्य वाटलं, कारण मिहीरला ते खरच सुरू करायच होतं. मिहीर पुण्यातल्या एका आयटी कंपनीतला ऑनसाईट जपानी भाषातज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापक. आमच्या मायबोलीवरच्या ट्रेकिंग ग्रुपचा धडाडीचा सदस्य. तसा त्याचा हॉटेल व्यवसायाशी काही संबंध नव्हता.
'कशा प्रकारचे हॉटेल ?'
मी nri आहे. पुण्यात flat घेण्याचा विचार आहे. पण इथुन एक महिन्याच्या सुट्टित जागा बघणे , बूक करणे इ. कामे करण्याचा कोणाला अनुभव आहे का ? जरा मदत मिळेल का?
प्रसंग -१
तो: मला काहितरी करायचंय.
मी: वा. छान. कुठल्या विषयात काय करायचंय?
तो: अमूक तमूक..
मी: मग थांबलायस कशाला?
तो: पाहतोय जरा सध्या.....
प्रसंग -२
ती: मी नेटवर्कींग सुरू करावं म्हणतेय.
मी: जरूर. मग काय केलंय त्यासाठी.
ती: अमुक तमुक ग्रूपची मेंबर झालेय.
मी: वा. छान. कुणाकुणाला भेटलीयस ग्रूपमधे? कुणाचा सल्ला विचारलास.
ती: नाही पाहतेय जरा सध्या.....
प्रसंग -३
तो: मला नवीन संकेतस्थळ चालू करायचंय. अमूक अमूक प्रकारचं.
मी: जरूर. आता संकेतस्थळ चालू करणं खूप स्वस्त आणि सोपं झालंय. आणि आता फु़कट जागा मिळते ती घेऊन सुरु करता येईल.
तो: फुकटच घ्यायचीय. पण पाहतोय मी जरा....
१९८७: फ्लॅशबॅक
१९८७ साली नववीत होतो तेंव्हा प्रथम संगणक म्हणजे काय ते शाळेत बीबीसीच्या एका प्रकल्पामुळे बघायला मिळालं. तेंव्हा भारतात पिसी हा प्रकार जेमतेम येऊ घातला होता. मुलांना संगणकाची गोडी लागावी म्हणून आमच्या शाळेला तब्बल ३२के एवढी मेमरी असलेले दोन मायक्रोसंगणक भेट मिळाले होते. कलर मॉनिटर होता, स्पिकर्स होते, पण हार्ड डिस्क असा काही प्रकार नव्हता. जे काही साठवायचे ते फ्लॉपीवर. आम्हा मुलांना गोडी लागावी म्हणून बीबीसीतर्फे एक वेलकम फ्लॉपी मिळाली होती त्यात दहा वेगवेगळे शैक्षणिक गेम्स होते. बेसिक वापरून प्रोग्रॅमिंग !!
उद्योजकांसाठी/व्यावसायिकांसाठी : जरूर वाचावी अशी पुस्तके.
RMP Infotec Pvt Ltd बद्दल माहीती हवी आहे.....
RMP ही एक दुबईची कंपनी आहे. त्यांचे काही products आहेत. त्यातले एखादे तुम्ही विकत घेऊन एक फॉर्म भरुन सभासद व्हायचे मग तुम्ही आणखी असेच २ सभासद करायचे मग ते २ सभासद आणखी २ असे प्रत्येकीअसे तुम्ही जर सभासद करत गेलात तर तुम्हाला घरबसल्या कमिशन मिळते Multi-Level-Marketing या प्रकारात मोडणारे.
"पण विकत कोण घेणार?"
हार्वर्ड विद्यापीठातल्या माझ्या प्राध्यापकांनी मला प्रश्न केला.