कर देणे हे जवळपास प्रत्येकालाच कटकट वाटत असावी. त्यात फक्त कर-कन्सल्टंटच फक्त अपवाद असावा. 
माझ्या मते, त्यात करांच्या कटकटी जास्त आणि फॉर्मस, वेगवेगळे कलमं यामुळे जास्तच त्रासदायक वाटतो. ज्याला कर प्रणाली समजते, कदाचित त्यांना ते सोपं वाटत असावं.
नुकतच रामदेव बाबांनी कर प्रणाली संपवा (किंवा सोपी करा) असं म्हटलं. त्यावरुन काही प्रश्न डोक्यात आले. मला अर्थकारणातलं काहीच कळत नाही, त्यामुळे अधिक सोपं करुन लिहिलं तर उत्तमच.
१. एकाच प्रकारचा किंवा कमीतकमी प्रकारचे कर असावे, हे योग्य आहे का?
२. वॅट चा उगम हाच होता ना? त्यातही एका वस्तूवर एक तर दुसर्यावर दुसरा % आहे ना?
गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!
ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!
नमस्कार, आज मी आपल्याशी ग्रामीण भागातील एका महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणुन संवाद साधत आहे. आमचे महाविद्यालय अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगांव या तालुक्याच्या ठिकाणी आहे. आमच्या महाविद्यालयात आम्ही पुणे विद्यापीठा द्वारे चालवली जाणारी "कर्मवीर भाऊराव पाटील- कमवा आणि शिका" योजना सुरु केलेली आहे. २०-२५ विद्यार्थी विद्यार्थीनी त्यात सहभागी होउन आपल्या शिक्षणाचा खर्च सांभाळण्याचा प्रयत्न करित आहेत. ग्रामीण आणी दुष्काळग्रस्त भाग असल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थीती बेताची आहे. आमचे महाविद्यालय त्यांना पाठबळ देत आहेच.
स्ट्रोबेरी शेतीबद्दल माहीती हवी आहे...
भांडवल कीती लागते एकरी, उत्पन्न कीती असते...जमीन कशी लागते ..आणि स्कोप कीती आहे शेतीमधे..
मला थोडीफार माहीती आहे पण अजुन कोणाला काही माहीत असल्यास सांगा...
ज्या देशात आपण जगतो, त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. ‘आपण देशासाठी असू तर देश आपल्यासाठी असेल’ ही भावना जर कृतीला चालना देऊ शकली तर काय चमत्कार घडू शकतात हे जगाला दाखवून दिलं टाटा उद्योग समूहाने. शंभरहून अधिक काळ केवळ देशाच्या प्रगतीचाच वसा घेतलेल्या या विलक्षण कुटुंबाबद्दल, उद्योग समूहाबद्दल आदर, अभिमान वाटावा तेवढा कमीच आहे. सतत दूरदृष्टी ठेवून, प्रवाहाविरुद्ध पोहत राहून प्रवाहाचीच दिशा बदलणारे ध्येयवेडे टाटा!
एखादा पदार्थ कसा खावा त्याचे काही संकेत, नियम पद्धती असतात. चुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाजा करीत इतरांच्या टेबलापाशी येणारा सिझलर्स हा पदार्थ खूप खायची इच्छा असूनसुद्धा कैक दिवस खायचं धाडस केलं नव्हतं केवळ ते कसं खायचं माहीत नसल्यामुळे. समोरच्या टेबलावरचे कसे खातात हे बघणं शिष्टाचारसंमत नसूनसुद्धा एकदा चोरून कोणी बघत तर नाहीन हे बघून समोर बघण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. अखेर आपण जसे इतरांकडे बघत नाही तसे इतरही आपल्याकडे कशाला बघायला बसलेत विचार करून खाऊनच पाहिला चूर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाजातला सिझलर्स! हॉटेलात मोठा 'आ' वासून बर्गर खाण्याचं धाडस अद्याप केलं नाही.
माझं एक लिखान चोरिला गेलं होतं. जुन्या बाडात एक कापी सापडलि. आपनासाठि त्यातला काहि भाग स्पेशल देत आहे.
- ए भाई, तु आज मला हितं काहुन बोलवले ?
- आपन हितंच भेटु शकलो अस्तो.
- काहुन ?
- हितुन पुढं तुजी हद्द चालु होते
- मंग ?
- तुझी मानसं चिन्धिचोर हायेत. माजी मानसं कापडं काडुन घेत नाहित.
- माज्या मानसानि काडून घेतल्ली कापडं आधि त्यांचिच व्हती
- हम्म्म. मंग आपुन या पुलाखालिच भेटु शकलो असतो.
- व्हय.
- आठवतं का ? हितं तू माज्या गोट्या चोरुन नेल्या व्हत्या
- आनि तु माझ्या बिड्या
- हम्म. या पुलाखालि आपलं ल्हानपन गेलं.
- हितंच आपल्या बाबाला पोलिस घेऊन गेल्ते

पी. एच. डी नंतर देखील दोन वर्षे शिक्षण घेउन आता शिकायचे काही शिल्लक राहिले नाही, असे समजुन मी भारतात आल्यावर शिक्षकाची नोकरी पत्करली! पण त्या सहा महिन्याच्या कालावधीने एकुनच शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला 
लायकी नसणारे लोक शिक्षण संस्था चालक झाले कि काय होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अन मग ठरवले, स्वतःच शिक्षण क्षेत्रात काही काम करायचे. जुने मित्र होतेच... एक प्रोजेक्ट नव्याने सुरु करत आहे!
BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३
